ठळक बातम्या

बुंदेलखंड भागात वीस हजार कोटींची गुंतवणूक

गुंतवणूर मेकदाळाव्यात घोषणा उत्तर प्रदेशातील विकासापासून वंचित राहिलेल्या बुंदेलखंड भागात संरक्षण उद्योग मार्गिका सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. येथील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात आम्ही संरक्षण उद्योगांच्या दोन मार्गिकांची घोषणा केली आहे. त्यातील एक बुंदेलखंड भागात सुरू करण्यात येईल. त्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून अडीच लाख लोकांना रोजगार मिळेल.

'...तर भारत शेजाऱ्यांचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचा संदेश गेला असता'

डोकलाममध्ये चीनने घेतलेल्या भूमिकेमागे लष्करी किंवा वर्चस्ववादाचा हेतू नसून चीनला या माध्यमातून भारत आणि भूतानमध्ये फूट पाडायची होती. मात्र, भारताने ज्याप्रकारे चीनला प्रत्युत्तर दिले, ते कौतुकास्पद होते, असे विधान देशाचे माजी सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केले. ते बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

पाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल

भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.

२५ अतिरेक्यांना जम्मूत आणले

रुग्णालयात नेण्यात येत असताना, अतिरेक्यांनी गोळीबार करून पाकिस्तानी दहशतवादी नावीद जट उर्फ अबू हंजुल्ला याची सुटका केल्यानंतर, सावधगिरीचा भाग म्हणून राज्य प्रशासनाने काश्मीर खोर्‍यातून २५ अतिरेक्यांना जम्मूत हलविले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे

नवी दिल्ली : 'राजधानी दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाताना भारताने केलेले प्रयत्न इतरांसाठी मार्गदर्शक आहेत', असे कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्य्रक्रमामध्ये करण्यात आले. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे सोपविण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. 'प्लॅस्टिकच्या प्रदूषणाचा पराभव' ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य 'थीम' असेल.

भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार 'लिफ्ट'; २०२१ पर्यंत होणार जगातील दुसरी मोठी बाजारपेठ

मुंबई: देशभरात मेट्रो शहरांची तसेच, स्मार्ट शहरांची संख्या वाढत चालल्याने येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उंच (बहुमजली) इमारती बांधण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत एस्कलेटर्सच्या संख्येत वार्षिक सरासरी २,५०० ते ३,००० इतकी वाढ होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कौशल्य विकासाबाबत १५ संस्थांशी सामंजस्य करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.

भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या 'बॅट'चा 'खेळ खल्लास', घुसखोराला कंठस्नान

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही - नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही, असा विश्वास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केला.

अफगाणिस्तान दहशतवादमुक्त आणि सुरक्षित रहावा ही आमची इच्छा : पंतप्रधान

२०१६ मध्ये मी तेहरानचा दौरा केला होता. मात्र, आपण भारतात येऊन आपले द्वीपक्षीय संबंध आणखी घट्ट आणि मजबूत केले आहेत. आपण आम्हाला चाबहार बंदराच्या विकासात नेतृत्व प्रदान केल्याने मी आपले आभार मानतो. ईरान आणि भारताचा शेजारी देश असणाऱ्या अफगाणिस्तानला दोन्ही देशांना दहशतवादमुक्त होताना पहायचे आहे, असेही यावेळी मोदी म्हणाले.

 • भारताचे तत्वज्ञान सहिष्णुता या संकल्पनेच्या वरचे - डॉ. मनमोहन वैद्य
 • ‘वार्ताप्रसार’ पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन कार्यशाळा
 • उन्मत्तांना ताळ्यावर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजेे : संग्राम प्रभूगांवकर
 • पत्रकारांइतकीच मोलाची कामगिरी पत्रलेखक करत असतात - दिनेश गुणे
 • धारावीमध्ये सामुदायिक गणेशपूजन संपन्न
 • ‘नमस्ते शलॉम’ मासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
 • वंचितांना यमगरवाडी प्रकल्पाने मुख्य प्रवाहात आणले: भैय्याजी जोशी
 • विश्‍व संवाद केंद्र, मुंबईचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन अनंतात विलिन
 • संघ आणि छ. शिवाजी महाराज
 • हिंदुत्वाचा मुस्लिम भाष्यकार
 • फुटलेल्या काचा, तुटलेली मने
 • डोळयांत पाणी का येते?
 • ‘फुले जानकी’ सीताफळास राष्ट्रीय पातळीवर मान्यता
 • निसर्गमित्र संस्थेची कचऱ्यातून धननिर्मिती
 • विश्वविक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांची अडीच एकरमध्ये रांगोळी !
 • कोतवडे येथे गांडूळ खतातून समृद्ध शेती व समृद्धीही
 
दिन विशेष
 
तुमचे मत
‘प्लॅस्टिकच्या प्रदूषणाचा पराभव’ या यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या ‘थीम’ शी सहमत आहात का?
होय
नाही
माहित नाही