२६/११ : ५० टक्के न्याय मिळाला, पाकिस्तानची मात्र उदासीन भूमिका

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर – भारतावर २००८ साली झालेल्या २६/११च्या गंभीर जखमा देणाऱ्या भयानक दहशतवादी हल्ल्याचे हे १२ वर्ष आहे. पाकिस्तानच्या दहा शस्त्रसज्ज भाडोत्रींनी केलेल्या या हल्ल्यात बळी पडलेल्यांना अद्याप पूर्ण न्याय मिळालेला नाही.
दहशतवाद्यांच्या बाबतीत भारताने पूर्ण न्याय केला आहे. पण तेवढे पुरेसे नाही. पाकिस्तानात असणाऱ्या या हल्ल्याच्या मुख्य गुन्हेगारांना प्रयत्नपूर्वक पकडल्यावरच आपल्याला पूर्ण न्याय मिळेल, असे विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम म्हणाले.
जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या नामांकितांच्या खटल्यांमद्ये मार्गदर्शन करणारे एक सेलिब्रिटी वकील म्हणाले, लष्कर ए तय्यबा प्रमुख हाफिज सईद आणि शाकिर रहमान लख्वी सारखे कट रचणारे आणि त्याचा आराखडा तयार करणारे भारतातील आरोपी अजूनही बऱ्याच प्रमाणात आहेत. मागील पंधरवड्यात २६/११च्या खटल्याबाबत पाकिस्तानकडे भारताने मागणी केली होती की, त्यांनी अंतर्गत बंधने सोडविण्यासाठी आपले गोंधळ आणि वेळकाढूपणाचे डावपेच बंद करावेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, या दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य गुन्हेगारांबाबत योग्य तो न्याय करावा असे अन्य राष्ट्रांनीही पाकिस्तानला सांगितले आहे.
हा अत्यंत गंभीर विषय आहे. स्वतः सार्वजनिकरित्या मान्य केलेले असताना आणि भारताने दिलेल्या सर्व पुराव्यांसह आवश्यक ते पुरावे असतानाही पाकिस्तानने अद्याप या हल्ल्यात बळी पडलेल्या १५ देशांतील १६६ जणांना बारा वर्ष उलटूनही न्याय देण्याचा प्रामाणिकपणा दाखविलेला नाही.
निकम म्हणाले की, भारताच्या बाजूने अपेक्षित असलेला ५० टक्के न्याय झाला आहे. पाकिस्तानकडून उर्वरीत ५० टक्के कृती होणे शिल्लक आहे. या कृतीनेच बळी पडलेल्या १६६ जणांना आणि जखमींना न्याय मिळेल. यांत काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
ते म्हणाले की, भारताने या प्रकरणी मोठ्या प्रमाणात पुरावे पुरविले आहेत. फक्त कसाबच नव्हे तर डेव्हिड कोलमन हेडली संबंधीच्या या पुराव्यांतून लष्कर ए तय्यबा आणि पाकिस्तानी आयएसआयमधील संबंध उघड झाले आहेत. इमेलच्या माध्यमातून त्यांच्यात झालेली कागदपत्रांची देवाणघेवाण उघड झाली आहे. शिकागो कोर्टात हेडलीने दिलेली साक्ष स्वीकारली गेली आणि नंतर अमेरिकी ऍडमिनिस्ट्रेटरकडून मान्य ही केली गेली. न्यायालयाकडून हेडलीला दोषी ठरवून विनवणी याचिकेनंतर ३५ वर्षांची सजा सुनावण्यात आली. सध्या तो अमेरिकेच्या तुरुंगात आहे.
याचिकेनुसार ५९ वर्षीय हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून फेब्रुवारी २०१८मध्ये साक्ष घेण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानची त्याची साक्ष घेणे आणि भारताने दिलेले ठोस पुरावे स्वीकारण्याची पाकिस्तानची वेळ होती.
निकम म्हणाले की, २६/११च्या गुन्हेगारांविरोधातील ट्रायल पाकिस्तानने आपल्या देशात त्वरीत घ्यावी, भारताने दिलेल्या साक्षींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परीक्षण व्हावे वा न्यायिक आयोग भारतात पाठवून साक्षीपुरावे रेकॉर्ड करावे यासाठी भारताने वारंवार मागणी केली आहे. पण पाकिस्तानच्या बाजूने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकत सय्यद झबिउद्दिन अन्सारी उर्फ अबु जिंदाल या दहशतवाद्याला अटक केली. अबु जिंदालने कराचीतून लष्कर ए तय्यबाची कंट्रोल सांभाळली व दहा दहशतवाद्यांना मुंबईत २६ नोव्हेंबर २००८च्या रात्री अराजक माजविण्याचे प्रशिक्षण दिले.
अबू जिंदालने या दहशतवादी हल्ल्यातील स्वतःची भूमिका मान्य केली आहे. लष्कर ए तय्यबाचा सूत्रधार लख्वी आणि अन्य संघटनांशी असलेला संबंधही त्याने स्वीकारला. हे सगळे असूनही पाकिस्तानच्या बाजूने न्यायाच्या दृष्टीने कोणतीही प्रगती झाली नाही, असे निकम कठोर स्वरात म्हणाले.
२५ जून २०१२ रोजी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पकडण्यात आलेल्या अबू जिंदालवर मुंबई विशेष न्यायालयात ट्रायल सुरू आहे. २६/१शी संबंधित एका केसबाबत ही ट्रायल शेवटच्या टप्प्यात आहे.
या सगळ्यात सकारात्मक बाब एवढीच आहे की, २६/११नंतर महाराष्ट्रात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. भारताच्या केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणा यांच्या पायाभूत रचना अद्ययावत झाल्या असून भविष्यात कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास सज्ज झाल्या आहेत.
**
माहिती स्रोत – टाईम्स ऑफ इंडिया