ChristianityOpinion

कुंक्कोळी विद्रोह १५८३ – स्वराज्य आणि स्वधर्मासाठी पोर्तुगीजांविरुद्ध उठाव

सत्तेच्या पक्षपातीपणामुळे आणि अधिकाराच्या वजनामुळे इतिहासातील खरी कहाणी एकतर्फी होते. राजकीय धन्यांना खूश करण्यासाठी लेखकांची लेखणी इतिहास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानाच्या भांडारात ठेवता कामा नये. भूतकाळातील सर्व बाबींना इतिहासाच्या अभ्यासकांनी तपासल्याशिवाय वैज्ञानिक इतिहासाचा दर्जा दिला जाऊ शकत नाही.

पराग नेरुरकर

ईस्ट इंडिया कंपनीने जारी केलेल्या एनफिल्ड रायफल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या काडतुसांवर गायी आणि डुक्करांच्या चरबीच्या कथित वापराविरुद्ध उठाव केल्यावर १८५७ मध्ये कनिष्ठ दर्जाचे शिपाई मंगल पांडे हे पाश्चात्य राजवटीविरुद्ध भारताच्या पहिल्या उठावाचे प्रेरणास्थान बनले. पण तुम्हाला कदाचित माहीत नसलेली गोष्ट येथे देत आहे.

दक्षिण गोव्यातील पाच गावे – कुंक्कोळी, आंबेली, असोल्ना, वेरोडा आणि वेली यांनी पोर्तुगीज वसाहतवाद्यांविरुद्ध – वरील संघर्षाच्या २७४ वर्षे आधी रक्तपात झाला – आणि तो सुद्धा निषेध म्हणून.

या घटनेची नोंद इतिहासात “कुंक्कोळी विद्रोह” म्हणून केली गेली.

१५१० मध्ये पोर्तुगीज ॲडमिरल अफोंसो डी अल्बुकर्कने गोवा जिंकल्यानंतर आणि पोर्तुगीज वसाहतींच्या दृढीकरणासाठी पोर्तुगालमधील सरकारी प्रशासनाच्या आदेशानुसार, नव्याने स्थापन झालेल्या सोसायटी ऑफ जीझसचे मिशनरी मुख्यतः ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी पोर्तुगालहून गोव्यात आले. स्थानिक लोकांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता.

एका ऐतिहासिक दस्तऐवजात असे म्हटले आहे- ‘उत्तर गोव्यातील बर्देझ येथे सुमारे ३०० हिंदू मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. १५८३ मध्ये, पोर्तुगीज सैन्याने असोल्ना आणि कुंक्कोळी गावांमधील अनेक हिंदू मंदिरे नष्ट केली. मंदिरांच्या विध्वंसामुळे स्थानिक लोक संतप्त झाले कारण त्यांच्या उपजीविकेचे अर्थकारण कोलमडून पडले तसेच त्यांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक असलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा खंडित झाल्या.

डॉ. टिओटोनियो आर. डीसूझा यांनी कुंक्कोळी हुतात्म्यांच्या ऐतिहासिक पुनर्मूल्यांकनात असे निरीक्षण नोंदवले आहे… “कुंक्कोळीच्या बाजाराची अर्थव्यवस्था मंदिर आणि धार्मिक उत्सवांवर अवलंबून होती. त्यामुळे पोर्तुगीज सरकारने आपली मंदिरे उद्ध्वस्त केल्याबद्दल आणि कुंक्कोळी आणि असोल्ना, वेरोडा, वेली आणि आंबेली या तिथल्या आसपासच्या गावांमध्ये ख्रिस्ती धर्माची स्थापना करू पाहणाऱ्या जेसुइट ख्रिस्ती धर्म प्रसारकांबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटली. १५८३ मधील या स्थानिक मंदिरांच्या विध्वंसामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे एक स्थापित सामाजिक संरचना आणि त्याचा मूलभूत आर्थिक आधार जो या मंदिरांनी टिकवून ठेवला होता, तो कोसळून पडला. या विरुद्ध स्थानिक हिंदू जनतेने प्रचंड संतप्त प्रतिक्रिया दिली. पाच गावांनी जे स्वीट धर्माप्रसाराविरुद्ध रक्ताचा सडा शिंपडला आणि पोर्तुगीजांना कर देणे बंद केले. इतिहासात याची नोंद “कुंकोळीचा विद्रोह १५८३” अशी आहे.

तह म्हणून, वसाहतवादी पोर्तुगीजांनी स्थानिक नेत्यांबरोबर वार्तालाप प्रस्तावित केला, जो आणखी एका रक्तपाताने संपला. कुंकोळी मधील १६ प्रमुख हिंदू नेत्यांना (जवळच्या) असोल्ना किल्ल्यावर युद्धविरामाची बोलणी करण्यासाठी बोलावण्यात आले. सुडाने पेटलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना गोळ्या घालून ठार केले. एक प्रमुख नेता पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने या हत्याकांडाची गोष्ट सगळ्यांना सांगितली. १५ जुलै १८५२ रोजी १५ प्रमुख हिंदू नेत्यांची पोर्तगीजांनी केलेली हत्या क्रूर, अमानुष आणि दुष्ट होती.

उपरोक्त ऐतिहासिक तथ्ये चर्चच्या नोंदी आणि त्या काळातील ऐतिहासिक अहवालांमध्ये नोंदलेली आढळतात.

Back to top button