NewsRSS

हरिद्वार कुंभ मेळ्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी रा.स्व.संघाकडे मागितली मदत

हरिद्वार, दि. ५ एप्रिल : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या कुंभमेळ्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन येथील पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मदत मागितली आहे. कुंभ येथील पोलीस महासंचालक संजय गुंज्याल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तराखंडचे प्रांत संघचालक व प्रांत कार्यवाह यांना यासंदर्भात एक पत्रही लिहिले आहे.

गर्दीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि कोरोनाचे आव्हान लक्षात घेता मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याबाबत त्यांनी प्रांत प्रचारक आणि अन्य पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे सहकार्य मिळेलच ही केवळ अपेक्षाच नव्हे तर विश्वास असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.  

१ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या या कुंभमेळ्यात १२, १४ आणि २७ एप्रिल रोजी शाही स्नान असणार आहे. तसेच १३ एप्रिल रोजी असणाऱ्या गुढीपाडवा आणि २१ एप्रिलला असणाऱ्या रामनवमीच्या निमित्तानेही येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे.  

Back to top button