News

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संदेशखाली घटनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने..

राज्यसरकार प्रणित आणि प्रोत्साहित महिला आत्याचाराच्या घटनांची दखल घेत राष्ट्रपतींनी पिडीतांना न्याय मिळवून द्यावा – अभाविप (ABVP)

पश्चिम बंगाल येथील २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांकडून महिलांवर सामूहिक बलात्कार व अत्याचार विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( akhil bharatiya vidyarthi parishad ) च्या वतीने आज मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस मध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली.

पश्चिम बंगाल मध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांकडून महिलांवर होणारे बलात्कार व अत्याचाराच्या घटना यांची वारंवारीता अश्या घटनांना आणि त्यातल्या आरोपींना राजकीय अभय दिल्याचे लक्षण आहे. या घटनांना आपल्या राजकीय हेतू साधण्यासाठी एका महिला मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन आणि अभय धक्कादायक आहे.

अभाविप मुंबई महानगर मंत्री निधि गाला म्हणाल्या की, “ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारच्या आशीर्वादाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांवर सामूहिक बलात्कार व कमजोर घटकांचे शोषण केले आहे. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची गळचेपी करण्याच्या घटना पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था संपुष्टात आल्याचे स्पष्ट करते.”

मुंबई महानगर सहमंत्री प्रशांत माळी म्हणाले की, “एखाद्या राज्याची महिला मुख्यमंत्री असताना राज्य सरकार पुरस्कृत महिला बलात्काराच्या घटना होणे ही शरमेची बाब आहे.”

Back to top button