IslamNational SecurityNews

अघोषित ईशनिंदा ? – जिहादचा हुकुमी एक्का

श्रीनगर येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (NIT)’ मधील काही विद्यार्थ्यांनी प्रथमेश शिंदे या हिंदू विद्यार्थ्यांवर ईशनिंदा करणारा व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोप केला आहे. असे सांगितले जाते की, या व्हिडीओमध्ये हमासच्या संस्थापकाचा मुलगा इस्लामविषयी काही गोष्टी सांगतो. याविरुद्ध झालेल्या आंदोलनांत ‘लब्बैक या रसूल अल्लाह’च्या घोषणा दिल्या गेल्या. तसेच, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो लावण्यात आलेल्या आणि हमास समर्थक असलेल्या हॅण्डल्सवरून प्रोत्साहन दिले गेले.

वर उल्लेख केलेल्या NIT च्या विद्यार्थ्याचे एका काश्मिरी मुस्लिम युवतीसह प्रेमसंबंध आहेत असेही सांगितले जाते. या प्रेमसंबंधांवर मुस्लिमांना आक्षेप होता, म्हणूनही प्रथमेशच्या विरोधात रान उठवले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान प्रथमेशवर मोहम्मद पैगंबर यांचा तथाकथित अपमान केल्याप्रकरणी श्रीनगर NIT मध्ये झालेल्या मोर्चानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासणी अहवाल (FIR) नोंदवला आहे. त्याला या शैक्षणिक संस्थेतून निलंबित करण्यात आले असून आगामी सत्रासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

माध्यमांच्या वृत्तांकनानुसार, NIT मध्ये शिकत असलेल्या या विद्यार्थ्याने मुहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्या व्हाट्सअप व इंस्टाग्राम खात्यावर टाकला होता. याउलट सोशल मीडियावर अनेक लोक प्रथमेश च्या पोस्ट चा स्क्रीनशॉट टाकत दावा करीत आहेत की तो व्हिडीओ हमासच्या संस्थापकाच्या मुलाचा आहे, प्रथमेशने व्हिडिओमध्ये स्वतःहून काहीही सांगितलेलं नाही.

सोशल मीडियामध्ये आरोपी विद्यार्थ्याशी संबंधित शेअर केल्या जाणाऱ्या स्क्रिनशॉटमध्ये हमासच्या संस्थापकाचा मुलगा इस्लामविषयी काही सांगत आहे. कट्टर मुस्लिमांनी याचा संबंध मुहम्मद पैगंबरांच्या अपमानाशी जोडला व ईशनिंदेचा आरोप लावला. वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये आरोपी मुलगा आणि त्याची मुसलमान प्रेमिका यांच्याविषयी सांगितले आहे. ‘एका हिंदू मुलाची प्रेमिका मुसलमान का’ यावर स्थानिक कट्टर मुसलमानांना आक्षेप आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.

ईशनिंदेविषयी ऐकताच कट्टर मुसलमानांचा जमाव एकत्र आला. थोड्याच वेळात या व्हिडीओस ईशनिंदा म्हणत सर्व मुसलमान विद्यार्थी ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ (रसूल अल्ला आम्ही तुझ्यासाठी हजर आहोत) ही घोषणा देत प्रदर्शन करू लागले. जमावातील हे सर्व लोक विद्यापीठाचे प्रशासन व पोलीस यांच्याकडून आरोपी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करून लागले. सोशल मीडियावरही ‘ चलो NIT’ ट्रेंड चालवला गेला.

वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये आपण पाहू शकतो की, आरोपी हिंदू विद्यार्थ्यास फाशी देण्याचा ट्रेंड चालवला जात आहे. श्रीनगर NIT आवारामधील वातावरण तणावपूर्ण होत आहे असे पाहून पोलिसांनी परिस्थिती सांभाळून घेतली आणि जमावास शांत केले.महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्यास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. ” सर तन से जुदा ” ही घोषणा देत गेल्या काही दिवसात राजस्थान महाराष्ट्र या राज्यात हत्यासत्र माजवले गेले. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती सहिष्णू हिंदू मनाला वाटत आहे.

माध्यमांशी बोलताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याविरोधात खटला दाखल केला गेला असून, तपास केला जात आहे. NIT च्या निबंधकाकडून पोलिसांना या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यास येणाऱ्या सत्रांसाठी अपात्र ठरवत संस्थेतून काढले आहे.

मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या श्रीनगरमधील NIT मध्ये धार्मिक दंगे पेटवले जाण्याची ही पहिली वेळ नाही. २०१६ मध्ये झालेल्या क्रिकेटमधील भारताचा पराभव येथे साजरा केला गेला होता. यास विद्यार्थ्यांनी विरोध केला तेव्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले हॊते.

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आपण नेहमीच ऐकतो. तेथून भारतात आलेले हिंदू बांधव त्यांचा अनुभव सांगतात. पाकिस्तानमध्ये काफ़िरांवर मुसलमान होण्यासाठी जबरदस्ती केली जाते, त्यांना धमकावले जाते. यास जर ते बधले नाहीत, तर त्यांच्यावर ‘ब्लास्फेमी‘ (blasphemy)म्हणजेच ईशननिन्देचा आरोप ठेवला जातो. ईशनिंदा म्हणजेच मोहम्मद पैगंबर साहेब, कुराण, मुस्लिम धर्म, इ.ची निंदा करणे, कुराणास पायदळी तुडवणे, कुराणाची पाने फाडणे, असे आरोप केले जातात. काफ़िरांवर यासंबंधित खोटेनाटे आरोप करीत त्यांना तुरुंगात टाकले जाते. या आरोपाखाली अटक करण्यास सुनावणीची गरज नसते. तुरुंगात डांबले गेलेले हे बंदिवान मायबाप सरकारची इच्छा होईल तेव्हाच बाहेर येऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्या घरादाराची, विशेषतः स्त्रियांची किती वाताहत होत असेल, याची कल्पना करणे फार दुःखदायक आहे. भारतात मात्र ईशनिंदेविषयक कायदा नसल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे खोटे आरोप करून जर अशा पद्धतीने हिंदूंचा छळ करण्यात येण्याचे प्रकार चालू झाले असतील तर ही गंभीर दखल घेण्याची बाब आहे. मुस्लिमबहुल भागांमध्ये हा एक नवा प्रकार सुरु होत आहे.

अपने मन में जनता हूँ, महाभारत के सार को
मैं निमंत्रण नहीं दंगा कृष्ण के अवतार को ।

साभार : www.opindia.com

Back to top button