EntertainmentHinduism

हिंदू परंपरेचे रक्षण हिंदूंनाच करावे लागेल

NoBindiNoBusiness

लेखिका शेफाली वैद्य यांनी मागीलवर्षी ‘नो बिंदी नो बिझनेस'(#NoBindiNoBusiness) असा हॅशटॅग घेऊन एक पोस्ट केली होती, त्यात त्या म्हणतात, ‘ मी माझ्यापुरतं ठरवलं आहे की मी “दिवाळीसाठी त्या ब्रँड्सकडून काहीही विकत घेणार नाही, ज्यांच्या जाहिरातीत मॉडेल्सनी बिंदी लावलेली नाही.” पुढे त्या म्हणतात “हा मुद्दा एखाद्यानं बिंदी वापरावी की नाही, याबाबतचा नाहीये. तर काही ब्रँड हिंदू सणासाठी उत्पादने विकत आहेत, पण ते करताना हिंदूंच्या भावना त्यांच्याकडून दुखावल्या जात आहेत. तुम्हाला हिंदू लोकांकडून पैसे पाहिजे असतील, तर हिंदू धर्मातील प्रतिकांचा आदर करा. त्यामुळेच ‘नो बिंदी, नो बिझनेस’ हा हॅशटॅग चालवला आहे.”

ज्याचा मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका या ब्रॅण्डना बसला होता. त्यामध्ये फॅब इंडिया या कपड्यांच्या मोठ्या ब्रँडने दिवाळीसाठी कपड्यांची जाहिरात करताना जन्श-ए-रिवाज असे म्हणत काही मॉडेलसचे फोटो घेतले होते. यामध्ये त्यांनी घातलेले कपडे पारंपरिक होते मात्र एकीच्याही कपाळावर कुंकू किंवा टिकली लावलेली नसल्याने या वादाला सुरुवात झाली. त्यानतंर पु.ना.गाडगीळ या पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सनी पण सोनाली कुलकर्णीसोबत केलेल्या जाहिरातींमध्ये सोनालीला पारंपरिक वेशभूषा करुनही टिकली लावण्यात आली नव्हती. मात्र हा वाद सुरु झाला आणि दोन्ही ब्रँडनी बाजारातील आपले स्थान टिकवण्यासाठी आपल्या जाहिरातील मागे घेत त्यामध्ये बदल केले होते

हिंदू समाजातील कुंकवाचे/टिकलीचे महत्व

भारतीय स्त्रीची ओळख म्हणजे साडी, त्यानुसार घातलेले काही अलंकार, बांगड्या, मंगळसूत्र आणि कपाळावरचा कुंकवाचा ठिपका. हा ठीपका दोन भुवयांच्या मध्ये किंवा थोडासा वर दिलेला असतो. आता कुंकवाच्या ऐवजी टिकली वापरली जाते. ती कपाळावर चिकटून बसते.हिंदू परंपरेनुसार कुंकू किंवा टिकली हे सौभाग्याचे चिन्ह समजले जातात. म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या स्त्रीची ओळख ही कुंकवामुळे व्हायची.

आधी हे कुंकू हळदी पासून तयार केले जायचे. हळद आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण वाळवून ते कुंकू म्हणून वापरलं जायचं.वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू होती, परंतु नंतर काळ बदलत गेला. आधुनिकीकरण आपल्या देशातही आलं. तसा तसा लोकांच्या पेहरावातही बदल होत गेला. स्त्रियांच्याही शृंगाराची साधनं बदलली. त्यातही वैविध्य आलं आणि मग कुंकवाच्या जागी आली टिकली. टिकली अजून तरी टिकली आहे.

तरीही आता कुंकू किंवा टिकली लावलीच पाहिजे असं नाहीये. स्त्रियांनी बदल म्हणून, फॅशन म्हणून कुंकू किंवा टिकली लावणे सोडून दिले आहे, तरीही अजूनही मोठ्या प्रमाणात भारतात त्याचप्रमाणे श्रीलंका, नेपाळ भूतान, मॉरिशस या देशांमध्ये स्त्रिया कुंकू किंवा टिकली वापरतात.आज-काल पाश्चात्त्य देशात देखील फॅशन म्हणून टिकली लावली जाते. आता कुंकू फारसे वापरले जात नाही. कारण आता घरगुती आणि शुद्ध मिळेल याची खात्री नसते, त्यातही भेसळ आली आहे. त्यामुळेच आता टिकली सोयीस्कर वाटते.

या अशा पोकळ परंपरा आपण का पुढे चालू ठेवतोय, असाही प्रश्न विचारला जातो. शिवाय कुंकू किंवा टिकली नाही लावली तर काय फरक पडतो? असं विचारलं जातं.

कुंकू किंवा टिकली लावण्यामागे असलेलं विज्ञान किंवा शरीर शास्त्रात असलेला फायदा लक्षात घेतला तर यावरुन वाद होणार नाहीत. कुंकू किंवा टिकली लावण्यामागचे विज्ञान समजून घेऊयात.

‘योग’ साधनेमधील महत्त्व :

ज्या ठिकाणी कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये कुंकू किंवा टिकली लावली जाते त्याच्या पाठीमागे असते आज्ञाचक्र. योगगुरु पतंजलींनी योगशास्त्रात जी षटचक्र सांगितली आहेत त्यातलं हे सहावं आणि खूप महत्वाचं चक्र. मेंदूतल्या त्याच ठिकाणावरून संपूर्ण शरीराला आज्ञा दिल्या जातात. ध्यान करताना आज्ञाचक्रावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं. म्हणजे कपाळावर नाही तर कपाळाच्या मागच्या बाजूला. तसेच भ्रामरी प्राणायाम करतानाही हेच चक्र कार्यान्वित केलं जातं.

सायनसचा त्रास कमी होतो

संपूर्ण चेहऱ्याच्या संवेदनांसाठी जबाबदार असणारा मज्जातंतू म्हणजे ट्रायजेमिनल नर्व्ह. हा मज्जातंतू याच भागात आहे. त्या मज्जातंतूच्या एकूण तीन शाखा आहेत. याला उत्तेजना दिल्यामुळे या भागातील सूज कमी होते आणि मार्ग मोकळा होतो.

दृष्टी सुधारते आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहते

डोळ्यांच्या महत्त्वाच्या नसा देखील याच भागात असतात आणि या नसा डोळ्यांच्या स्नायुंशी जोडलेल्या असतात. म्हणूनच याठिकाणी थोडासा दाब दिल्यास दृष्टीही चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

त्वचेचे आरोग्य सुधारते

त्वचेच्या महत्त्वाच्या नसा या भागातून चेहऱ्यावर पसरलेल्या असतात. जर कपाळाच्या मध्यभागी काही सेकंद दाब दिला, तर चेहऱ्याची त्वचा तरुण राहण्यास मदत होते, सुरकुत्या कमी होतात.

ताण तणाव डिप्रेशन कमी होते

नवीन वैद्यकीय अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे, की कपाळाच्या मध्यभागी केवळ काही सेकंद दाब दिल्याने मानसिक ताणतणाव कमी होत आहेत. अनेक प्रकारच्या चिंतामुळे येणारं नैराश्य कमी होतं.

श्रवणशक्ती सुधारते

कपाळाच्या मध्यभागी दाब दिल्याने कानाच्या ऐकू येण्याच्या महत्त्वाच्या नसेला देखील त्याचा फायदा होतो. त्यामुळे श्रवणदोष लवकर निर्माण होत नाहीत.

ताण, निद्रानाश थकवा दूर होतो

आपल्यावर जेव्हा एखादं काम करण्याचा ताण असतो किंवा कुठली चिंता सतावत असते, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर ताण येतो. कपाळावर आठ्या पडतात. म्हणजेच आपल्या शरीरातला सगळ्या गोष्टींचा ताण हा त्या बिंदूच्या ठिकाणी जमा होतो. म्हणूनच त्या बिंदूला थोडीशी उत्तेजना दिल्यास आपला ताण कमी होईल, दृष्टी सुधारेल आणि निद्रानाशही कमी होईल.योगसाधनेत बालासन करायला सांगितलं जातं, कारण त्यामध्ये कपाळाचा मध्यभाग जमिनीवर टेकवला जातो आणि ताण हलका होत जातो.

स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते

कपाळावरच्या या भागाला थोडीशी उत्तेजना दिल्यास आपली स्मरणशक्ती वाढते असे दिसून आले आहे. तसेच एखादं काम करण्यासाठी लागणारी एकाग्रताही वाढते. सर्जनशीलताही वाढते, नवीन काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होते.

केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती चांगला परिणाम होतोय याचा विचार करून टिकली लावली पाहिजे.घराची महत्त्वाची जबाबदारी ही स्त्रीच सांभाळत असते. घरात वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र असतात, त्यांना सांभाळण्याचं कामही स्त्रियाच व्यवस्थित करत असतात.आता तर पुरुषांच्या बरोबरीने ऑफिसही स्त्रिया सांभाळतात, त्यामुळे घरात आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी वावरतात स्त्रियांना मनःशांती जरुरीची असते म्हणूनच, टिकली लावली पाहिजे.

‘टिकली न लावणे’ हि विकृती बॉलिवूड पर्यंत मर्यादित होती. आता हि विकृती जाहिरात क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.देशातील हिंदू विरोधी,देश विघातक,लिबरल लोकांनी या प्रथेला हवा देऊन समाजात मोठ्या प्रमाणावर पसरवले आहे.बॉलिवूड चित्रपटातील विवाहित हिंदू स्त्रीया सहसा टिकली न लावल्या दाखवलेल्या जातात पण रस्त्यावरील गुंड मात्र टिळा लावलेला असतो किती परस्पर विरोधाभास आहे हा ?

आता हिंदू समाज हळू हळू का होईना भानावर येत आहे,आपल्याविरोधात होणाऱ्या कट कारस्थानाविरोधात आता हिंदू मोठ्या प्रमाणात एकत्र होत आहे.याचे उदाहरण आपल्याला #NoBindiNoBusiness ते #boycottlalsinghchaddha पर्यंत दिसून येईल.एकीकडे भारतात पैसा कमवायचा आणि पाकिस्तान सोबत भारताविरोधात षडयंत्र करणाऱ्या तुर्कीत जाऊन तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीसमवेत भेट करणे त्यांना मोठे सन्मानाचे वाटते आणि स्वतःची दुसरी बायको मात्र भारतात राहण्याची भीती वाटते असे म्हणते काय म्हणावे याला असा दुटप्पीपणा यापुढे कदापि खपवून घेतला जाणार नाही.

पर्चेस पॉवर इंडेक्स मध्ये ९०% हिंदू असताना आमच्यावर हा अन्याय कशासाठी ? #NoBindiNoBusiness हा हॅशटॅग सामान्य हिंदू नागरिकांनी आता उचलून धरलाय आणि ब्रॅंड्सनाही हे उमगलंय की हिंदूंच्या सणाला हिंदूंचा पैसा पाहिजे तर हिंदूंच्या भावनांचा सन्मान केलाच पाहिजे.

Back to top button