Opinion

आम्हाला अजून काही प्रश्न नीट कळलेच नाहीत असं प्रश्न पडावा

आजच्या जगात विषमतेपोटी अनेक अर्थाने तुकडे होताहेत की असं वाटायला लागलं आहे. जगातील ८० कोटी लोकांना रोज उपाशीपोटी झोपावे लागते. ४०० कोटी लोकांचे उत्पन्न कसाबसा दिवस काढता येईल असे आहे. आपल्या शहराच्या परिघावर ही समस्या सेवावस्ती आणि ग्रामीण भाग, वनवासी भागात नक्की जाणवते आहे. आज तर आपण सगळेच दुष्काळी संकटाच्या उंबरठा ओलांडून आत आलो आहे. एका शहराची तहान भागविण्यासाठी रेल्वेने पाणी पोहचवायला लागले आहे.

जागतिक तापमान वाढले आहे वाढते आहे हे आता अजून वेगळ्या भाषेत सांगायची गरज उरली नाही. हवामानातील बदल हा प्रयोगशाळेच्या बाहेर पडून शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल करतोय. आज प्रत्येकाची हाव भागवण्यासाठी धरणीमाता किती सक्षम आहे असा प्रश्न पडावा. सर्वांचे कल्याण होवो असं आम्ही प्रार्थनेत म्हणतो. तर दुसरीकडे पुढच्या पिढीकडे संस्कार पोहचवण्याची आमची धडपड पाहण्यासारखी आहे.

मुठभर लोकांच्या फायद्यासाठी काम करण्यापेक्षा सगळ्यांचे हित ज्यात जपले जाईल अशा कामाची आवश्यकता आज जास्त आहे. गांधीजी शाश्वत विकासाच्या बाबतीत आग्रही होते. स्वयंपूर्ण खेडी असे सूत्र त्यांनी पहिल्यांदा मांडले. एका बाजूला आपण प्रचंड प्रगती केली आहे तर दुसरीकडे अजून सर्वांपर्यंत रोजगार, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा गरिबांपर्यंत आपण पुरेशा प्रमाणात पोहचू शकलो नाही.उपाशी पोटी झोपलेली माणसे अजूनही विकासाच्या पटलावर कुठे आहेत हे शोधावे लागत आहे.

आम्ही अजूनही सामान्य माणसांच्या मुलभूत गरजांच्या बाबतीत किती प्रामाणिक आहोत माहित नाही. आमचे गणित पक्के व्यवहाराचे आहे. तळाशी नकारत्मकता आणि निराशा ह्याची जबाबदारी नेमकी कुणाची हे निश्चित करायला हवे. आजचे प्रयत्न हे स्वतःसाठी सामाजिक कामाचे समाधान मिळावे इतके त्याचे मर्यादित स्वरुपात आहेत. हे ओझे नाही जबाबदारी आहे.

प्रामाणिकपणाचा आणि नीतिमत्तेचा मार्गही अनेक प्रश्न सोडवू शकतो. पण आम्ही त्यांना आत्मनिर्भर करण्यापेक्षा अवलंबून ठेवण्यात अधिक रस असतो. आपल्या गरजा इतक्या वाढल्यात त्या नेमकी कुणासाठी आणि कशासाठी असा समाजमन विचार करायला हरकत नाही.

डोंबारी आपल्या बायका पोरांसह शहरातील रस्त्यावर खेळ दाखवतो. एवढीशी चिमुरडी ३०-४० फुट अंतर १५ फुट उंच अंतरावरून ह्या टोकावरून दुसरीकडे जाते. डफली वाजत असते. गाणे ऐकू येते. लहान भाऊ समोर हात पसरतो. आमचे मुखवटे गिळून पडतात. आम्ही टाकतो. सटकतो. आमचे मनोरंजन संपलेले असते. गरिबी निर्मुलन हा मनोरंजनाचा कार्यक्रम असतो.

मला वाटते आमची प्रेरणा अधिक महत्वाची आहे. गांधीजीनी जागवलेली प्रेरणा आजही टिकून आहे कुठल्या ना कुठल्या स्वरुपात. ईशावास्योपनिषदातील प्रार्थना जगाच्या कल्याणाची आहे. समर्पण भावनेने अंत्योदयासाठी विसर्जित होण्याची आवश्यकता आहे. ह्यातच ईश्वराचे तत्व सापडेल. गोष्ट जाणीवेला आकार देण्याची आहे.

क्रमशः

संजय साळवे

‪#‎गाभारा‬
‪#‎SanjaySalve‬

Back to top button