National SecurityNaxalismNews

“राष्ट्रीय बसव पुरस्कार”… आणि पाताळयंत्री राजकारण

karnataka government announced award to anand teltumbde who was arrested by nia in the koregaon bhima case

कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad) प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 2020 मध्ये अटक केलेल्या राष्ट्रद्रोही आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) या तात्पुरत्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला कर्नाटक सरकारने वर्ष २०२२-२३चा “राष्ट्रीय बसव पुरस्कार” जाहीर केला आहे.

वरील बातमी वाचून आपण व्यथित झाले असाल.. देशद्रोह्याला राष्ट्रीय बसव पुरस्कार जाहीर झाला आहे आणि ३१ जानेवारीला थाटामाटात तो प्रदान देखील करण्यात येईल.काय म्हणावे याला.. छद्मी राजकारण दुसरे काय..

राष्ट्रीय बसव पुरस्कार..”

सामाजिक समरसतेचे अग्रणी असलेल्या बसवण्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक समरसतेसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. तसेच साहित्य, सामाजिक न्याय आणि सामाजिक सद्भावनेसाठी काम करणाऱ्यांना महानुभावांना कर्नाटक सरकारतर्फे दरवर्षी “राष्ट्रीय बसव पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. १० लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे या राष्ट्रीय बसव पुरस्काराचे स्वरूप असते..

आनंद तेलतुंबडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे ( पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्युमुखी पडलेला नक्षल कमांडर ) याचे मोठे भाऊ आहे. आनंद तेलतुंबडे याला बंगळुरू येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे ३१ जानेवारी रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी झाली होती अटक ..

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या हिंसाचाऱ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्याप्रकरणी एप्रिल २०२० मध्ये एनआयएनं आनंद तेलतुंबडे याला अटक केली होती. तेव्हापासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झाला आणि त्याची जेलमधून सुटका झाली

समाजाला भरकटवुन हिंसा घडवण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या माओवादी नेत्याला सामाजिक सद्भावनेचा पुरस्कार का कश्यासाठी ???

‘माओवाद्यांच्या वतीने काही वर्षांत सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर होणाऱ्या कार्यक्रम आणि आंदोलनांमध्ये घुसखोरी करण्याचे आंदोलन हायजॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरेगांव भीमा येथे मानवंदना देण्यासाठी एकत्रित झालेल्या समुदायांत काही असामाजिक घटक घुसवून घडवून आणलेली हिंसा त्यातील एक भाग होता. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनावेळी नक्षलवादी कारवायांमुळे अटकेत असलेल्या आरोपींना मुक्त करण्याची केलेली मागणी असेल किंवा देशभरातील विविध सामाजिक आंदोलनामध्ये घुसून त्याची दिशा बदलून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न या प्रयत्नांतून सलोख्याने राहणाऱ्या समाजात अशांतता पसरविण्याचे आणि हिंसा भडकविण्याचे षड्यंत्र या माओवाद्यांकडून रचण्यात आल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.’

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की ,

हिरण्यकश्यपू जगी मातले..
धर्मावरती घालती घाले..
निर्दलण्या त्या नरसिंहाचा होवू दे अवतार
हिंदू अस्मिते हिंदू देवते तव हो जयजयकार

Back to top button