NewsScience and Technology

शास्त्रज्ञ ११
भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानाचे रचनाकार आर्कोट रामचंद्रन

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या (indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…

आयआयटी मद्रासचे (IIT Madras) संचालक म्हणून आर्कोट रामचंद्रन (Arcot Ramachandran) यांनी विज्ञान व अभियांत्रिकीच्या अनेक क्षेत्रातील मुलभूत आणि उपयोजित संशोधनाला चालना दिली.

औष्णिक अभियांत्रिकीमधील भरीव योगदान आणि सातत्यपूर्ण विकासाप्रति सामाजिक उत्तरदायित्त्वाची भावना असलेला शास्त्रज्ञ म्हणून डॉ. आर्कोट रामचंद्रन (६ एप्रिल १९२३ ते १७ मे २०१८) ओळखले जातात. ते भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे पहिले सचीव होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सेंटर फॉर ह्युमन सेटलमेन्टस चे उपमहासचिव म्हणूनही काम पाहिले. त्यांच्याच कार्यकाळात १९९० च्या दशकात संयुक्त राष्ट्रांनी १२ शहरांत सस्टेनेबल सिटी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. अशा या साऱ्या शैक्षणिक व प्रशासकीय कारकिर्दीदरम्यान रामचंद्रन यांनी सामाजिक, शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. विज्ञान व अभियांत्रिकीमधील या योगदानाबद्दल भारत सरकारने २००३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला.

कर्नाटकात जन्मलेल्या रामचंद्रन यांनी मद्रास विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीमध्ये एमएस पदवी आणि त्यानंतर पीएचडी पदवीही मिळवली. १९५० मध्ये भारतात परतल्यांतर त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिथे ते ऊर्जा अभियात्रिकी विभागात शिकवीत सहाय्यक प्राध्यापक बनले. १९५४ मध्ये ते स्कॉटलंडला बॅबकॉक अँड बिलकॉक्स रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट सेन्टरमध्ये संशोधक अभियंता म्हणून काम करण्यास गेले. मात्र, पुढच्याच वर्षी, म्हणजे १९५५ मध्ये त्यांनी आधी अमेरिकेत पर्ड्यू विद्यापीठात आणि नंतर कोलंबिया विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल संशोधनास सुरुवात केली.

रामचंद्रन १९५७ मध्ये भारतात परतले आणि आयआयएससीच्या स्मृती आहेत. यंत्र अभियांत्रिकी विभागात रुजू झाले. १९६७ मध्ये ते आयआयटी मद्रासचे संचालक बनले. आपल्या कारकिर्दीत आर्कोट रामचंद्रन यांनी तेथे विज्ञान व अभियांत्रिकीच्या अनेक क्षेत्रातील मुलभूत आणि उपयोजित संशोधनाला चालना दिली.

१९७३ मध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचीव म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले. तेथे त्यांनी पहिल्या विज्ञान व तंत्रज्ञान योजनेच्या अंमलबजावणीचे काम प्रभावीपणे केले. हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सोन्सिंग एजन्सीची स्थापना व त्याचे अंतरिक्ष विभागाकडे हस्तांतरण, पुढे महासागर विकास मंत्रालय म्हणून विकसीत झालेल्या ओशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीची (ओएसटीए) स्थापना, पर्यावरणाचे भान राखत योजना आखणी, समन्वय आणि संशोधन (आताचे पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालय), नवीनीकरणीय व अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर (आता नवीनीकरणीय व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय), विज्ञान तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय माहिती यंत्रणा आणि १९७७ मध्ये बंगळुरू येथे स्थापन केलेले संयुक्त राष्ट्रांचे एशिया-पॅसिफिक सेटर फॉर ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी (आता दिल्लीत) या त्यांनी केलेल्या कामाच्या काही चिरस्थायी

नवीनीकरणीय व अपारंपरिक ऊर्जा या विषयातील राष्ट्रीय योजनेचे ते शिल्पकार मानले जातात. त्यांची १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयावरील परिषदेच्या योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. ऑक्टोबर १९७८ मध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या नव्यानेच स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्स सेंटर फॉर ह्यूमन सेटलमेन्टसचे उपमहासचिव आणि कार्यकारी संचालक बनले.

लेखक :- रिंटू नाथ

(डॉ. रिंटू नाथ हे विज्ञान प्रसारमध्ये कार्यरत वैज्ञानिक आहेत.)

(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)

Back to top button