NaxalismNews

JUSTICE_FOR_SAINATH

गडचिरोली येथे स्पर्धा परिक्षेची(MPSC) तयारी करत असलेल्या २६ वर्षीय साईनाथ नरोटे या वनवासी युवकाची माओवाद्यांनी त्याचे गाव मर्दहुर ता. भामरागड येथे 8 मार्च रोजी निघृण हत्या केली.

साईनाथ हा एक गरीब व होतकरू विद्यार्थी होता. तो मागील ३ वर्षांपासून गडचिरोली येथे राहून लिपीक, तलाठी, पोलीस व अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. साईनाथ सारखे हजारो तरुण आज नक्षलवाद्यांच्या दहशतीला न घाबरता विविध सरकारी नोकरीच्या परीक्षेची तयारी करत आहे. मागच्या वर्षी गडचिरोलीत झालेल्या पोलिस भरतीत फक्त 117 जागांसाठी 18000 हजार तरुणांनी अर्ज भरले, यापैकी साधारण ३५०० ते ४५०० अर्ज नक्षल प्रभावित असलेल्या दक्षिण गडचिरोली भागातील आहेत. ही सल नक्षलवाद्यांनी कुठे तरी होती. त्याचाच परिणाम म्हणून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या साईनाथ नरोटेला तो आपल्या गावी आला असता माओवाद्यांनी (MAOVADI) ठार मारले.

या प्रकरणी नक्षलवाद्यांच्या (NAXALWADI) विरोधात आवाज उठविणारे जनसंघर्ष समितीचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिकें यांच्यावर आता माओवाद्यांनी आगपाखड केली आहे.तरीही साईनाथ हत्या प्रकरणात माओवाद्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभारण्याचा त्यांचा पक्का निर्धार आहे.

सामाजिक कार्यकर्ते व जन संघर्ष समिती नागपूर चे संयोजक दत्ता शिर्के हे गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात विविध माध्यमातून तेथील पिडीत,गरीब व वंचित वनवासी बांधवांच्या विकासासाठी काम करीत आहेत. यामध्ये आरोग्य सेवा,बचत गटांच्या माध्यमातून विविध आदिवासी महिलांना रोजगार मिळवून देणे, दुर्गम भागात पूल बांधण्याच्या कामात लक्ष घालणे, माओवाद्यांनी मारलेल्या निष्पाप लोकांच्या बाजूने निर्भीडपणे उभे राहणे, तिरंगा यात्रा काढून नक्षलग्रस्त भागात लोकशाही व संविधानाचा जागर करणे, दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक आधार देण्याचे काम ते करत आहेत.

या माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या निर्दयी हत्येनंतर तरी समस्त संविधान प्रेमी जनतेने एकवटून या देशद्रोही माओवाद्यांना कायमचा धडा शिकविण्यासाठी सरकार वर दबाव आणला पाहिजे .

सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यांची हत्या करणे,विविध सरकारी योजना गावात लागू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची हत्या करणे तसेच सरकार करत असलेल्या विविध विकास कामांना अडथळा आणणे,जाळपोळ करणे ही माओवादी लोकांची लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारी कामे असून हे अरजातकतेचे काम महाराष्ट्रातील एका भागात गेल्या 40 वर्षापासून अव्याहत सुरू आहे.

व बेगडी मानवता वादी लोकं निषेध व्यक्त करतात पण माओवाद्यांचे दलित व आदिवासी बांधवांच्या चालू असलेल्या हत्यासत्राचे शहरातील तथाकथित बुद्धिजीवी (अर्बन माओवादी) तसेच तथाकथित मानवी हक्का चे रक्षक कधीही याचा साधा निषेध करत नाही.दलितांचे कैवारी, पुरोगामी विचारवंत म्हणून घेणारे लेखक ही सर्व ढोंगी लोकं अशा वेळी शांत बसून एकप्रकारे माओवाद्यांच्या या कृत्याला मूक संमती देत आहेत.

मागील काही वर्षांत नक्षलग्रस्त भागात होत असलेली विविध विकास कामे व पोलिस प्रशासनाने माओवाद्यांच्या विरोधात राबविलेली मोहीम यामुळे कंबरडे मोडलेली नक्षल चळवळ आता भरकटत असल्याचेही दिसून येत आहे. पूर्वी वनवासींवर अन्याय होतो म्हणून हातात शस्त्रे घेऊन लढणारे माओवादी आता तिच शस्त्रे गरीब वनवासींकडे वळवत आहेत. सरकार, पोलिस प्रशासनावर टीका करायची, सुरजागडच्या खाणीला वरवर विरोध करायचा आणि गरीब वनवासी बांधवांना ठार करायचे,कधी गावातीलच एखाद्या गरीब असहाय्य वनवासीला धमकावयचे हेच माओवाद्यांचे सध्याचे काम आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा/माओवाद्यांचा लढा नेमका कुणाविरुद्ध आहे,असा प्रश्न आता सामान्य नागरिक ही विचारत आहेत.

लेखक :- अशोक तिडके.

Back to top button