IslamNewsWorld

अमंग द मॉस्क्स : भाग २

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास..

ब्लॅकबर्न (Blackburn )

बर्मिंगहम, रॉशडेल, ब्रॅडफर्ड, कीली अशा अनेक शहरांमध्ये वर्षानुवर्षं स्थायिक झालेल्या पंजाबी आणि काश्मिरी मुसलमानांच्या हातात त्या शहरांची सर्व सत्ता एकवटलेली आहे. मतांच्या लाचारीपायी राजकारणी आणि स्थानिक नेतेही लाळघोटेपणा करत इथल्या काळ्या कृत्यांकडे दुर्लक्ष करतात.

लंडन, बर्मिंगहम, ब्लॅकबर्न ही ब्रिटनमधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली काही शहरं आहेत. लुईस कॅसी कमिशनने २०१६ साली केलेल्या एका सर्वेक्षणात ब्लॅकबर्नबद्दलचे धक्कादायक निष्कर्ष सामोरे आले. या सर्वेक्षणानुसार ब्रिटनमध्ये अल्पसंख्यांक असलेले लोक (मुस्लिम) प्रत्यक्षात ब्रिटनच्या अनेक शहरांच्या उपनगरांमध्ये बहुसंख्यांक झाले आहेत आणि त्यात ब्लॅकबर्नचा क्रमांक सर्वात वरचा आहे. ब्लॅकबर्नच्या बास्टवेल आणि शिअरब्रो प्रभागांत मुस्लिम लोकसंख्या अनुक्रमे ८५% आणि ७८% झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ब्लॅकबर्नच्या एकूण एक लाख सतरा हजार लोकसंख्येमध्ये सुमारे पन्नास हजार लोकसंख्या मुस्लिमांची आहे.

अजून एक महत्वाची आकडेवारी म्हणजे याच शहरात बेकारी ही ६% आहे जी ब्रिटनच्या राष्ट्रीय सरासरीच्या मानाने खूप अधिक आहे. आणि अर्थातच त्यामुळे गुन्हेगारी देखील आपोआपच खूप अधिक आहे. तिथे श्वेतवर्णीय लोकांवर रस्त्यांत उघडउघड हल्ले केले जातात. ब्लॅकबर्नमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिमांव्यतिरिक्त अन्य लोकांना प्रवेश नाही. थोडक्यात ते No-Go Areas आहेत.

ब्लॅकबर्नमध्ये मशिदींवरच्या भोंग्यांना कुठलीही आडकाठी नाही परंतु श्वेतवर्णीय ब्रिटिश लोकांना मोठ्या आवाजात गाणी लावायला परवानगी नाही. इतकंच नव्हे तर तेथील नागरिकांना त्यांच्या देशाचा युनियन जॅक फडकवण्याचीही परवानगी नाही. सरकार मुस्लिमांना वर्णद्वेषी, जातीयवादी वाटू नये म्हणून घेण्यात आलेली खबरदारी आहे ही !!

ब्लॅकबर्नमधल्या एका मदरश्यातल्या शिक्षणाला कंटाळून मदरश्याला रामराम ठोकलेल्या एका तरुण मुलाशी बोलताना लेखकाला बरीच विचित्र माहिती कळली. खऱ्या जगातील सर्व झगमगाटापासून आणि प्रलोभनांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवून फक्त इस्लामचा अभ्यास करायला लागलेल्या या तरुण मुलाला आपल्या आयुष्यातली महत्वाची पाच वर्षं वाया गेल्याची जाणीव झाली.

कारण पाच वर्षं इस्लामचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या हे लक्षात आलं की खऱ्या जगातल्या स्पर्धेला सामोरं जाण्याच्या दृष्टीने आवश्यक असं कुठलंही शिक्षण किंवा कौशल्य त्याच्या ठायी नाही. त्याच्या पालकांना पाच वर्षं लुटण्यात आलं. संपत्ती, जमीनजुमला, ऐश्वर्य, स्त्रिया या सर्वांना नावं ठेवणाऱ्या त्याच्या शिक्षकाची स्वतःची मात्र अनेक घरं आणि अनेक बायका आहेत. नैराश्याने भरून गेलेले असे नवीन पिढीतील अनेक तरुण या शहरात आढळतात.

लेखक :- हेरंब ओक

(क्रमशः)

Back to top button