InternationalIslamNewsWorld

हँलो… मी युरोप बोलतोय ! :- भाग २

बेल्जियममध्ये (belgium) जन्माला येणार्‍या बालकांमध्ये पन्नास टक्के बालकं मुस्लिम असतात. बेल्जियमच्या लोकसंख्येत जवळपास २५% मुस्लिम (muslim) आहेत. २५% लोकसंख्या ही ५०% बालकं जन्माला घालत आहे! बेल्जियम आणि डेन्मार्कमधील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना फक्त हलाल भोजन दिले जात आहे.

शांतताप्रिय, सहिष्णू अँमस्टरडॅमवासीयांना एवढ्या तेवढ्या कारणांवरुन मुस्लिमांकडून होणारी मारहाण ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्यांवरुन जाणार्‍या गैरमुस्लिम तरुणी, महिला यांची टिंगल टवाळी केली जात आहे. युरोपातील मुसलमानांच्या घरात दूरदर्शनवर स्थानिक कार्यक्रम बघितले जात नाहीत, तर ते ज्या देशांमधून युरोपात शरणार्थी म्हणून आले आहेत त्या देशाचे कार्यक्रम बघितले जातात!

ज्या फ्रेंच लेखकांना, विचारवंतांना इस्लाम धर्मीय इस्लामचा गुन्हेगार समजतात, उदाहरणार्थ व्होल्टेअर, दिदरो वगैरे, त्यांचा वर्गात उल्लेख, विचार, साहित्यावर चर्चा शिक्षकांनी टाळावे अशी मागणी होत आहे. मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातात म्हणून डार्विनचा सिध्दांत, होलोकाॅस्टचा इतिहास वर्गात शिकवायला विरोध होत आहे.

इंग्लंडमध्ये आता शरिया न्यायालये ही ब्रिटीश न्यायव्यवस्थेचा अविभाज्य घटक झाली आहेत. फ्रान्समधील अनेक मुस्लिम बहुल इलाख्यांमध्ये महिलांना बुरखा घातल्याशिवाय प्रवेश करु दिला जात नाही, मग ती कुठल्याही धर्माची का असेना! मागच्या महिन्यात ब्रुसेल्समध्ये एका इसमाची मुसलमानांकडून इतकी धुलाई करण्यात आली की तो अर्धमेला झाला होता. कारण काय तर तो रमजानच्या काळात दारु पीत होता! रमजान कुणाचा, मार कुणाला!

जगात आज एवढे इस्लामिक देश असताना, त्यातले काही भूगर्भतेल संपन्न असताना, तिकडे न जाता मुस्लिमांचे जथ्थेच्या जथ्थे युरोपमध्ये येत आहेत आणि स्थानिक युरोपियन पलायन करत आहेत! बहुतेक सर्व यहुदी इस्त्रायलला निघून गेले आहेत. आज युरोपमध्ये ५० लाखाहून अधिक मुसलमान आहेत. सॅन डीयागो विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार येत्या १२ वर्षात युरोपच्या लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या २५% हून अधिक असेल! या शतकाअखेर किंबहुना त्याच्या आधीच युरोपात मुस्लिम बहुसंख्यक होतील असं भयसूचक भविष्य बर्नार्ड लेवीस या लोकसंख्या अभ्यासकाने वर्तविले आहे!

ही झाली युरोपातील(europe) मुस्लिम लोकसंख्येची आजची आणि भविष्यातली संभाव्य आकडेवारी. मुस्लिम समुदाय शांततापूर्ण सहअस्तित्व स्विकारुन अन्य धर्मीयांशी गुण्यागोविंदाने नांदायला तयार असेल तर या आकड्यांची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. पण तशी शक्यता फार कमी आहे, कारण इस्लाम धर्मीयांना अन्य धर्मावलंबीयांचे अस्तित्वच मान्य नाही! प्यूव(Pew) संशोधन केंद्राच्या अहवालानुसार ५०% फ्रेंच मुसलमानांची फ्रान्सपेक्षा इस्लामवर अधिक निष्ठा आहे. म्हणजे फ्रान्स आणि इस्लाम या दोहोत निवड करायचा प्रसंग आला तर साहजिकच ही मंडळी इस्लामला अग्रक्रम देतील! एकतृतीयांश फ्रेंच मुस्लिम हे इस्लामिक आत्मघातकी हल्ल्यांचा निषेध करत नाहीत, हरकत घेत नाहीत. म्हणजे अशा कृत्यांना त्यांची मूक संमती असते!

ब्रिटीश सामाजिक एकोपा केंद्राच्या अध्ययनानुसार एकतृतीयांश ब्रिटीश मुस्लिम विद्यार्थी हे खलिफा साम्राज्याचे खंदे समर्थक आहेत. गैरमुस्लिम देशात राहाणार्‍या मुसलमानांनी केलेल्या मागण्या तिथल्या सरकारांनी मान्य केल्या तरच तिथले सरकार चांगले, मुसलमानांना सन्मानाने वागवणारे असे त्यांना वाटते. अन्यथा सरकारकडून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून ते थयथयाट करतात! युरोपात आता इस्लाम धर्मपरंपरांनुसार अधिकृतपणे सरकारी सुट्या दिल्या जात आहेत, तरीही ते समाधानी नाहीत.

नेदरलँडमध्ये जर मुस्लिम बहुसंख्यक झाले तर देशात शरिया लागु करायला तिथले ख्रिश्चन डेमाॅक्रॅटीक अटर्नी जनरल तयार झाले आहेत. आजच नेदरलँडमध्ये मोरक्को आणि तुर्की पासपोर्टधारी मुसलमान कॅबिनेट मेंबर्स आहेत! अरे मुर्खांनो, तुमच्या देशात मुस्लिम बहुसंख्यक झाले तर ते तुमच्याकडे कशाला काही मागतील? उलट तुम्हालाच त्यांच्यासमोर हात पसरावे लागतील, देश त्यांच्या ताब्यात गेलेला असेल आणि तुमचं जगणं मरणं त्यांच्या दयेवर अवलंबून असेल!

लेखक :- सोमनाथ देविदास देशमाने

(क्रमशः)

https://brill.com/edcollbook/title/59205

Back to top button