CultureHinduismIslamNewsRSS

ही कृपा कुणाची ना वाढलो आम्ही। लाचारी पत्करली ना कधी आम्ही।।दाविले जगून ते कसे जगायचे। संघ कार्य ना कधी विझून जायचे।।

आत्ताच एक बातमी वाचनात आली की, केरळच्या(Kerala) मंदिरांमध्ये संघ शाखा लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

केरळमधील मंदिरांचे (temple) व्यवस्थापन सांभाळणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने आपल्या अधिकार्यातील मंदिरांना परिपत्रके जारी केली आहेत. मंदिरांमध्ये केवळ धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (rashtriya swayamsevak sangh RSS) शाखेला किंवा कोणत्याही राजकीय कार्याला परवानगी देऊ नये. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

काय म्हणावे या बातमीला.. हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार… दुसरे ते काय..

खरेतर, त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (travancore devaswom board) २०१६ आणि २०२१ मध्ये देखील अश्याच प्रकारची परिपत्रके जारी केली होती; ज्यात संघ शाखेवरील कथित शस्त्र प्रशिक्षण व सरावावर मंदिर परिसरात बंदी घालण्यात आली होती. आदेशानंतरही राज्यातील काही मंदिरांमध्ये संघाचे कार्यक्रम होत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आल्याने नव्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्वप्रथम त्रावणकोर देवस्वम बोर्डाबद्दल आपण जाणून घेऊया..

त्रावणकोर देवस्वम बोर्ड (TDB) केरळ राज्यातील १२४८ मंदिरांचे व्यवस्थापन करते. हे बोर्ड म्हणजे या मंदिरांचं नियोजन करणारी एक वैधानिक आणि स्वायत्त मंडळ आहे.त्याची स्थापना त्रावणकोर कोचीन हिंदू धार्मिक संस्था कायदा १९५० अंतर्गत करण्यात आली आहे. विश्वप्रसिद्ध सबरीमाला मंदिरातील सर्व विधीही याच मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जातात. त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष सीपीएमचे (Communist Party of IndiaCPM) ज्येष्ठ नेते के अनंतगोपन म्हणतात की, “मंदिरं भाविकांसाठी असतात आणि त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये, हीच बोर्डाची भूमिका आहे”

त्रावणकोर देवस्वम बोर्डाने जो दळभद्री निर्णय घेतलाय कम्युनिस्ट राज्य सरकारच्या दबावाखाली घेतलेला आहे यात कोणतीही शंका नाही.

हा निर्णय घेतला नसता तर त्या कम्युनिस्ट राज्य सरकारने अर्थात पिनाराई विजयन यांच्या सरकारने देवस्थान बोर्डाचं जगणं असह्य करून टाकलं असतं. त्यामुळे हा निर्णय राजकीय आणि तो कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या दबावाखालीच घेतला आहे यात तिळमात्र शंका नाही. बाकी अन्य पक्षांनाही तो लागू होईल वगैरे म्हणणे ही निव्वळ मखलाशी आहे कारण राजकीय पक्षांचे कार्यक्रम हे साधारणतः निवडणूक ते निवडणूक असे असतात त्यामुळे त्यांची गैरसोय होण्याचे कारण नाही. दैनंदिन स्वरूपात कार्य करणारा फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे आणि संघाची कोंडी करण्याचे हे लाल भाईंचे षडयंत्र आहे.

कदाचित “द केरला स्टोरी”ने देशभरात लव्ह जिहादच्या षडयंत्राविरुद्ध हिंदू समाजात केलेली प्रचंड जनजागृती, चित्रपटाला मिळालेला तुफान प्रतिसाद बघून केरळच्या कम्युनिस्ट सरकारने वैफल्यग्रस्त होऊन देवस्वम बोर्डाच्या खांद्यावर बंदूक ठेवून रा. स्व. संघावर गोळी चालवली असावी अशी शंका येते… अर्थात कम्युनिस्ट सरकारने संघाच्या वाढत्या प्रभावाला दिलेली ही पोचपावतीच आहे.

केरळ सरकार जर असे समजत असेल की अशी मुस्कटदाबी करून आपण संघाच्या कामाला आपण थांबवू शकू तर हा त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे कारण संघकार्य म्हणजे ईश्वरी कार्य आहे. त्रावणकोर देवस्वम बोर्डाने घेतलेला हा निर्णय कम्युनिस्टांच्या दबावाखाली घेतला असला तरीही तो पद्मनाभस्वामींना देखील आवडलेला नसेल याची आम्हाला खात्री आहे.

हे कुटील कारस्थान हा केवळ संघावरचा हल्ला नाही तर सकल हिंदू समाजावरचा हल्ला आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे १२४८ मंदिरांचं काय घेऊन बसलात.. संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं घर हे संघस्थान आणि कार्यालय आहे. त्यामुळे कम्युनिस्ट सरकारने भलत्याच भ्रमात राहू नये. धाकाने, जबरदस्तीने किंवा सूडबुद्धीने या कारवाया करणे आता बंद करावे.

कम्युनिस्टांना आम्ही एकच सल्ला देऊ इच्छितो की, देशातील एकाच राज्यात त्यांची सत्ता उरली आहे. राजधर्म पाळून ती त्यांनी मनसोक्तपणे उपभोगावी. उगाच संघकार्याच्या आड येण्याचे न झेपणारे धाडस करू नये.

अश्या कुचकामी उपाय योजना आखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम बंद तर सोडा, कमी देखील होणार नाही उलट दुप्पट वेगाने वाढेलच यात कोणतीही शंका नाही. पण हे या पाताळयंत्री कम्युनिस्टांना समजवेल तरी कोण..?

केरळात १९५७ सालापासून कम्युनिस्ट पक्षाची राजवट आलटून पालटून सत्तेवर येत आहे. केरळ मध्ये कार्यकर्त्याचा पहिला खून १९६७/६८ साली झाला. आजही ते दुष्टचक्र चालू आहे पण केरळ मधला संघ संपला नाही उलट तो मोठ्या प्रमाणावर जनमानसात रुजला आणि आज वटवृक्षाप्रमाणे आपल्या पायावर अढळपणे उभा आहे.

अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक व भारतीय राजकारणातील सांस्कृतिक दूत पंडित दीनदयाळ जी उपाध्याय यांची अमानुष हत्या कोणत्या विचारधारेने केली आहे हे देशातील जनता चांगलीच ओळखून आहे. पंडित दीनदयाळजींना या जगातून नाहीसे करून राष्ट्रवादी अर्थात हिंदू विचारधारेला आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपण उखडून टाकू शकू या भ्रमात असलेल्या देशद्रोही विचारधारेला भारताच्या भविष्यातील इतिहासातून सकल हिंदू समाज पुसून टाकेल यात आम्हाला तरी कोणती शंका नाही…

https://hindupost.in/dharma-religion/communists-ban-rss-shakhas-in-kerala-temples/

Back to top button