Education

एकात्मता साधणारी विद्यापीठे

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे व्यक्तिगत प्रगतीपासून आत्मनिर्भरता;  ते आत्मनिर्भर भारत आणि जगाचे कल्याण या अनुषंगाने भारताला जगात सर्वोत्तम ओळख करुन देणारी दालने खुली झाली आहेत. वास्तविकपणे या नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारताला सुपरपॉवर होण्यासाठी एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.   

**

जगात बाह्य विभिन्नता कितीही असली तरीही प्रत्येक सजीवाला ऐकणे, पाहणे, चव, स्पर्श अशा ज्या जन्मत: मूलभूत बाबी प्राप्त झाल्या आहेत. त्या एकसमानच आहेत. व्युत्पत्ती या शब्दाची वस्तुस्थिती यातून स्पष्ट होते.  

‘यूनी’  या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘एक’ असा आहे, आणि ‘व्हर्सस’ या शब्दाचा अर्थ ‘वळणे’ हा आहे.  हे दोन्ही शब्द एकत्र केल्यास ‘युनीव्हर्सस’ हा शब्द तयार होतो. याचा अर्थ सगळ्यांना एकत्र करणे. ‘युनीव्हर्सस’ चे नंतर युनीव्हर्स झाले. युनीव्हर्स म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टींचे एकत्रिकरण. सगळ्या गोष्टी या एकच आहेत या अर्थाने.   

युनिव्हर्सिटी हा शब्द देखील युनिव्हर्सिटाज या मूळ लॅटिन शब्दापासून घेण्यात आला आहे. युनिव्हर्सिटाज म्हणजे संपूर्ण, सगळं. नंतर फ्रेंच (पूर्वीचे) आणि इंग्रजी (पूर्वीचे) मधील यूनिव्हर्साइट व यूनिव्हर्स या दोन शब्दांपासून यूनिव्हर्सिटी हा शब्द तयार झाला. युनिव्हर्सिटी ही अशी जागा आहे जेथे तज्ज्ञांकडून विविधतेतून साकारलेले जगाचे खरे स्वरुप शोधले जाते.  

भारतीय परंपरा

प्राचीन काळातील गुरुकुल पद्धतीत किंवा नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ माहिती आणि ज्ञानच दिले जात नसे. तर त्यांना सूजाण करण्यात यायचे. बौद्धिक, तार्किक आणि व्यावहारिक ज्ञान हे एका संवेदी स्तरावरचे शिक्षण झाले. पण ते अंतर्ज्ञान करणे अर्थात वास्तवाचा विचार करुन ज्ञान आणि अनुभव यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची, अंदाज बांधण्याची क्षमता तयार करणे म्हणजे सूज्ञपणा, सुजाण.  अंतर्ज्ञान मिळविण्याची ही भारताची पारंपारिक पद्धत होती. ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीमधील ’विविधतेतील एकता’ अधोरेखित होण्यास मदत व्हायची. या अंतर्ज्ञानातून प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण जग हे नैतिक, आधुनिक आणि घटनात्मक मूल्यातून समानदृष्टीने पाहण्यास व अनुभवण्यास मदत मिळायची. केवळ इतकेच नव्हे तर सत्य, धर्म, शांती, प्रेम, अहिंसा, वैज्ञानिक दृष्टिकोन, नागरी मूल्ये व जीवनकौशल्ये हे देखील सार्वत्रिक मूल्यांचे उगमस्थान  आहेत. यादृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक (एनईपी) मसुद्यात एका नवीन जगाच्या निर्माणाचे धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जगाचे तुकडे करण्यासाठी तयार करण्यात आलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. येथे भारतीय असण्यामागचा खोलवर रुजलेला गौरव अधोरेखित करण्यात आलेला आहे.  

एकात्मता शोधताना, विभिन्नतेचे महत्त्व कमी होत नाही. एकात्मतेचा उद्देश हा समग्र दृष्टीतून येतो. आणि विविधता ही बहुविद्याशाखीय अभ्यासातून जाणवते. समग्र दृष्टिकोन आणि बहुविद्याशाखीय शिक्षणाचा उद्देश हा मानवातील क्षमता शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सौंदर्य, नैतिक, अध्यात्मिक आणि सामाजिक अशा एकात्मिक पद्धतीने वृद्धिंगत करण्याचा आहे.  

समग्र दृष्टिकोनातून मांडलेल्या या बाजू प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी त्याच्या प्राथमिक शिक्षणापासून ते संशोधन पातळीपर्यंत आणि त्याची यशस्वीपणे झालेली अंमलबजावणी ही वैयक्तिक विकासातून जागतिक नागरिक आणि स्थानिक पातळीवरुन राष्ट्राचा गौरव म्हणून सिद्ध होण्यास मदत करते.

बहुविद्याशाखीय अभ्यासाद्वारे विविध विषयांमधील परस्परसंबंध समजण्यास मदत होते.  पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासामुळे सजीव आणि निर्जिवांमधील परस्परसंबंध अधिक स्पष्ट होतात. पर्यावरण शास्त्र हे जीवनाच्या स्वरुपावर जैविक किंवा निर्जीव घटकांचा आवश्यक किंवा परिणामकारक प्रभाव असल्याचे स्पष्टपणे सांगते. भौतिक वातावरण (हवा, पाणी, माती, तापमान, सूर्यप्रकाश इ.) जन्म, वाढ आणि जीवनावर लक्षणीय परिणाम करतात.  

आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बाह्य वातावरणाशी संबंधित आहेत. मानवी आरोग्य (शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही) हे भौतिक पर्यावरणाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. म्हणून भौतिक शास्त्र, जीवन शास्त्र आणि सामाजिक शास्त्र हे अभ्यासाचे एकमेकांसंबंधित निगडित असलेले क्षेत्र आहेत. कोरोना महामारी आणि त्याचा आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आरोग्यावर झालेला परिणाम हे याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून सध्या संशोधन आणि विकास अर्थात रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटचा सर्वाधिक भर हा बहुविद्याशाखीय, अंतर्विद्याशाखीय अभ्यासावर  आहे.  नैसर्गिक सत्य शोधण्याचा हा अर्थपूर्ण मार्ग असल्याचे मान्य करण्यात आले आहे. हा एकात्मिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच उच्च शिक्षणासाठी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.    

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये आखण्यात आलेल्या धोरणानुसार जगाचे तुकडे न करता एका नव्या जगाची निर्मिती करायची आहे. येथे भारतीय असण्यामागचा खोलवर रुजलेला गौरव अधोरेखित करण्यात आलेला आहे.    

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारतीय शिक्षणातील  गुणवत्ता आणि प्रमाणात बदल आणण्याकरिता करण्यात आले आहे. ‘त्याकरिता, खेळ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली  शालेय शिक्षणाची शोध शैली, वैचारिक गांभीर्य, विद्यापीठांना संशोधनास प्रोत्साहन देणे, सर्व उच्च शिक्षण संस्थांना बहुविद्याशाखीय अभ्यासाचे  स्वरूप देणे,  सर्वांगीण शिक्षणावर भर, पदवीपूर्व  अभ्यासक्रमात संशोधन आणि इंटर्नशिपचा समावेश, संशोधनास महत्त्व प्राप्त करुन देणारी करिअर व्यवस्थापन प्रणाली’ इ. चा नव्या धोरणात उल्लेख करण्यात आला आहे.  याचबरोबरच  “सर्वोत्तम संशोधनासाठी तसेच सर्वोत्कृष्ट शिक्षण आणि विकासासाठी आवश्यक असणारी उत्कृष्ट संशोधनाची मान्यता”याचाही या धोरणाच्या मसुद्यात उल्लेख करण्यात आला आहे.   

बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठ  यांच्या प्रयत्नातून भारतीय शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणे उंचविण्यासाठी  यासाठी प्रयत्नशील आहे.  

 ‘ग्लोकल’ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०  चा महिमा

ग्लोबल + लोकल म्हणजेच ग्लोकल. हा सुद्धा समग्र दृष्टी आणि एकात्म दृष्टिकोनाचाच एक भाग आहे. यामध्ये शिक्षण म्हणजे स्थानिक सबलीकरण आणि जागतिक समृद्धीचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन, वैयक्तिक पातळीवर स्वावलंबन प्राप्त होते. जेव्हा एक व्यक्ती स्वावलंबी होते तेव्हा त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब गरीबी आणि निरक्षरतेपासून दूर राहते.  स्थानिक सबलीकरणाचा हा आधार आहे

व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बालवर्गापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कौशल्य आणि मूल्यांचा एक निश्चित संच समाविष्ट करणे आवश्यक आहे ’. भारतासारख्या खूप मोठी लोकसंख्या असलेल्या देशात स्थानिक आणि जागतिक गरजा पूर्ण करण्याची मदत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे होणार आहे.  जगाच्या कल्याणासाठी, शाश्वत जीवन जगणारे आणि जगातील नागरिक जागतिक नागरिक प्रतिबिंबित’ करण्याचा प्रस्ताव आहे. विश्व कल्याण, शाश्वत जीवन आणि विश्वाचा खरा नागरिक हा दृष्टिकोन या धोरणातून प्रतिबिंबित होतो.   

जगातील १९३ देशांनी शाश्वत विकासासाठी २०३० चा अजेंडा मान्य केला आहे.  या अजेंडाद्वारा सदर देशांनी जागतिक सहभागातून  शाश्वत व सर्वसमावेशक वाढ, पर्यावरण संरक्षण करणे, सर्वांगीण आर्थिक विकास आणि जागतिक सहभागाद्वारे शांतता आणि न्यायप्रदान समाज निर्माण करणे आदी सुनिश्चित करण्याचे वचन दिले आहे . राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दृष्टिकोनातून शाश्वत विकास हा राष्ट्रीय प्रगती आणि जगाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

  • डॉ. टी.व्ही. मुरलीवल्लभन

( संचालक, सेंटर फॉर इन्क्लुजिव्ह ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कुट्टीक्कनम, केरळ)

सौजन्य : https://www.organiser.org/Encyc/2020/11/26/Universality-of-University-.html

Back to top button