EntertainmentIslamReligion

अल्पसंख्याक व फिल्मजगतही लव्ह जिहादच्या कचाट्यात – डॉ. सुरेंद्र जैन

अवैध धर्मांतरण थांबविण्यासाठी सर्व राज्यांनी कायदा करावा

नवी दिल्ली – लव्ह जिहादच्या तावडीतून आता देशातील अल्पसंख्याकही सुटत नाहीत असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. दिवंगत संगीतकार वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरूख यांनी मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याचे दुष्परिणाम समाजमाध्यमातून उघड केले. या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने देशातील मुली व त्यांच्या स्वाभिमान संरक्षणासाठी देशव्यापी कायद्याच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.  

जैन म्हणाले की, वाजिद खान यांच्या पत्नीने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल भोगलेल्या दुष्परिणामांचा केलेला खुलासा हा एखाद्याला जागरूक करण्यासाठी पुरेसा आहे. आधी मुस्लिम पतीकडून विवाहानंतर धर्मांतरणासाठी दबाव असल्यामुळे एकटेपणाचा दंश झेलावा लागला. आणि आता अधिकारांपासून वंचित असणाऱ्या कमलरूख यांना वाजिद यांच्या परिवाराकडून धर्मांतराची सक्ती केली जात आहे. अद्याप कोणताही मुस्लीम नेता वा अभिनेता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आला नाही. यावरून हेच स्पष्ट होते की, फिल्मी जगत असो वा बाहेरचे विश्व, कलाकार असो वा कथित बुद्धिजीवी, व्यापारी असोत वा बेरोजगार या सर्वांबाबत विवाह वा मैत्रीमागे लव्ह नाही, केवळ जिहाद आहे. या विवाहांमध्ये केवळ मुलीलाच धर्मांतरण करण्यास विवश का केले जाते असे एका न्यायालयानेही मागे विचारले होते.

पारशी हा भारतातील सर्वात लहान अल्पसंख्याक समाज आहे. अन्य कोणत्याही समाजाची आपल्या मुलींबद्दल जी भावना असते तीच या समाजाचीही आपल्या मुलीबद्दल आहे. ख्रिश्चन, शीख, दलित, जैन अशा सर्वच समाजांच्या मुलींची शिकार झाल्याची शेकडो उदाहरणे दर महिन्याला दिसून येतात. काही समाजांचे नेते आपल्या स्वार्थासाठी ‘मीम-भीम’ सारख्या घोषणा आपल्या स्वार्थासाठी देतात. पण जेव्हा त्यांच्या समाजातील मुली लव्ह जिहादच्या बळी ठरतात ते आपल्या मुलींना न्याय देण्याऐवजी कानाडोळा करतात. त्यांच्यासाठी त्यांचा स्वार्थच अधिक महत्त्वाचा असल्याचे यावरून स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे नेते व जिहादींबाबत समाजाला वेळोवेळी जागृत केले होते. स्वार्थी नेते व जिहादींपासून समाजाने दूर राहावे अशी विनंती विहिंपच्या वतीने जैन यांनी केली.

उत्तर प्रदेशने जिहादींपासून वाचण्यासाठी अध्यादेश काढल्याबद्दल विहिंपच्या वतीने त्यांनी अभिनंदन केले. कमलरूखला न्याय मिळावा अशी इच्छा व्यक्त करत महाराष्ट्रासहीत सर्व सरकारांना सामाजिक शांततेसाठी, जनतेच्या रक्षणासाठी तसेच अवैध धर्मांतरण थांबविण्यासाठी लवकरात लवकर कायदा करण्याची त्यांनी विनंती केली.

सौजन्य – विसंकें भारत

Back to top button