EducationSeva

जेव्हा प्रियांका गांधी राजकारण करत होत्या तेव्हा विद्यामंदिरे कोरोनाग्रस्तांना मदत करण्यात गर्क होती

केरळमध्ये मासे पकडल्यानंतर आणि ‘सिक्स पॅक’ दाखवल्यानंतर राहुल गांधी राजकारणात परतले आहे. आल्या आल्याच आपल्या मेंदूत साचलेले विध्वंसक विष ओकायला लागले आहेत. अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ चर्चेच काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांनी विद्याभारती(संघप्रेरित संस्था) संचालित शाळांवरती हल्ला सुरू केला. राहुल गांधी म्हणाले की, पाकिस्तानात ज्याप्रमाणे इस्लामी कट्टरपंथी आपल्या मदरशांचा वापर करतात. तशाच पद्धतीने आरएसएस आपल्या शाळांत एक वेगळे जग तयार करतात.

जे पालक आपल्या मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार मिळावेत म्हणून  शिशूमंदिरात पाठवतात त्या साऱ्यांचा राहुल गांधी यांनी शिशुमंदिरांची तुलना पाकिस्तानातील मदरशांशी करून अपमान केला आहे. राहुल यांच्या डोळ्यांवरील द्वेषाचा चष्मा एवढा प्रभावी झाला आहे की के राजकीय लाभासाठी केवळ लाखो विद्यार्थीच नव्ह तर हजारो शिक्षकांचीही तुलना पाकिस्तानी कट्टरपंथियांशी करत आहेत.

राहुल गांधी म्हणतात की, आरएसएस आपल्या शाळांत एक वेगळे विश्व दाखवते

बरोबर आहे. विद्याभारती आपल्या शाळांमध्ये एक वेगळे विश्व दाखवते. या जगात आपले पूर्वज आणि संस्कृतीचा अपमान नाही, अभिमान बाळगण्यास शिकवले जाते. रॉक आणि पॉप संगीताचे नाही, तर हे संस्कारांचे जग आहे. आपले मातापिता आणि धरणीमातेला प्रणाम करण्यास शिकवले जाते. या विश्वात राष्ट्रासाठी सर्वस्वाचे समर्पण करण्याची प्रेरणा दिली जाते.

राहुल गांधी ज्या विद्यार्थ्यांची तुलना मदरशांमध्ये घडणाऱ्या दहशतवाद्यांशी करत आहेत त्या विद्यार्थ्यांचे यश आणि सेवाकार्ये यांची यादी केली तर ती राहुल गांधी यांनी संपूर्ण राजकीय जीवनात बोललेल्या शब्दांपेक्षा जास्त निघेल. म्हणून केवळ कोरोना काळात विद्याभारतीच्या विद्यालयांनी मध्यभारतात केलेल्या कार्यांची माहिती तरी त्यांनी अवश्य मिळवावी.

सेवाकार्यांसाठी जागा आणि वाहनांची उपलब्धता

कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सरकारी व्यवस्थांची पुरेशी तयारी नव्हती त्या काळात हजारो रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक होते. त्यावेळी विद्याभारतीने कंबर कसली व समाजासाठी मदतीचा हात पुढे केला. विद्याभारतीच्या मध्य भारत प्रांतातील १६ जिल्ह्यांत ८०पेक्षा अधिक विद्यालयांची जागा शासनासाठी उपलब्ध करून दिली.

लॉकडाऊनच्या काळात देशाने आणखी एका संकटाचा सामना केला. लाखो प्रवासी मजूर आपापल्या घरी परतायला लागले. लाखोंचा प्रवाह रस्त्यांवर उतरला होता, तेव्हा प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात राजकारण करण्यात व्यग्र होत्या. मध्यभारतात विद्याभारतीचे ८०० विद्यार्थी ११०० ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी तैनात झाले. विद्याभारतीने आपल्या बसगाड्यांमधून या मजुरांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवले. ८२०००हून अधिक लोकांना जेवण उपलब्ध करून दिले. १५००० लोकांना खाण्याची पाकिटे वाटली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत कोशात तीन लाख रुपयांहून अधिक रकमेची मदत केली.

जनजाती क्षेत्रांमध्ये पोहोचवले मास्क

विद्याभारती आपल्या शाळांमध्ये मानव मानवाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो असेच विश्व दाखवते. कोरोना काळात जेव्हा अचानक लाखोंच्या संख्येत मास्कची आवश्यकता निर्माण झाली तेव्हा संस्थेशी संबंधित शिक्षिकांनी निर्धन असहाय नागरिकांसाठी मास्क शिवण्याच्या कार्याला वाहून घेतले. काहींनी सेवा वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांना मास्क वितरित करण्याचे कार्य केले. सरस्वती शिशू मंदिराचेही शिक्षकही वस्त्यांमध्ये जाऊन कोरोनापासून बचाव कऱण्यासाठी जनजागृती करीत होते. विद्याभारतीच्या शिक्षिकांनी लाखो मास्क शिवले आणि वितरित केले.  

घरोघरी जाऊन मुलांना शिकवले

कोविड१९ संक्रमणाच्या काळात जेव्हा देशभरात लॉकडाऊन झाला तेव्हा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. शहरांमध्ये डिजिटल माध्यमातून शिक्षण सुरू झाले. मात्र वनवासी, ग्रामीण क्षेत्रांचे काय? जेव्हा संसर्गाच्या भीतीपोटी लोक आपल्या घरांतून बाहेर पडत नव्हते तेव्हा विद्याभारतीच्या शाळांमधील कार्यरत सुमारे २३६५ शिक्षक संपूर्ण प्रांतातील वस्ती शाळांच्या माध्यमातून ४०००० मुलांना शिकवत होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या चाचण्या४ घेतल्या गेल्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या स्पर्धाही आयोजित करून विद्यार्थ्यांचे सामाजिक आणि धार्मिक ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परंतु राहुल गांधी यांचे डोळे त्यांना साथ देत नाहीत. त्यावरील द्वेषाचा हा थर इतका मोठा झाला आहे की सेवाभावी विद्यार्थी आणि आचार्य/ताई यांच्यातही त्यांना दहशतवादी दिसत आहेत. किंवा कदाचित त्यांची समस्या, वेदना यांचे कारण वेगळेही असू शकेल. विद्याभारतीच्या संस्कारांमुळे मिशनरी शाळांचे षडयंत्र निकामी होत आहे हे तर ते कारण नाही ना? विद्याभारतीचे संस्कारक्षम विद्यार्थी त्यांच्या जाळ्यात अडकत नाही हे तर नसेल ना?

**

Back to top button