National SecurityNews

बाटला हाऊस एन्कांऊंटर प्रकरणातील दहशतवादी आरीज खानला फाशी

नवी दिल्ली, दि. १६ : दिल्लीत २००८ साली झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आरीज खानला न्यायालयाने दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर त्याच्यावर ११ लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणाला अतिदुर्मिळ प्रकरण म्हटले आहे.

बाटला हाऊस चकमकीदरम्यान पोलीस अधिकारी मोहन चंद शर्मा या दहशतवादी हल्ल्यातील गोळीबारात हुतात्मा झाले होते. दंड म्हणून ठोठावण्यात आलेल्या रकमेतील १० लाख रुपये रुपये तात्काळ शर्मा यांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन करावेत, असा निर्देशही न्यायालयाने दिला आहे.   

या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार व मुख्य आरोपींपैकी एक असलेला आरिज खान फरार झाला होता. २०१८ साली त्याला नेपाळमधून अटक करण्यात यश मिळाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button