EducationNews

‘आरबीआय’ची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार

नागपूर, दि. १८ मार्च : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्यांदाच मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

केंद्रीय स्तरावरील परीक्षा आतापर्यंत हिंदी वा इंग्रजीमधूनच घेतल्या जात होत्या. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी अनेक वर्षांपासून परीक्षार्थींकडून करण्यात येत होती. या मागणीला आता यश मिळाले असून ‘आरबीआय’मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे.  

‘आरबीआय’ने ८४१ हजेरीसहायक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची मंजुरी अलीकडेच दिली. त्यापैकी मुंबई विभागात २०२ आणि नागपूर विभागात ५५ पदांची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. या सर्व परीक्षार्थींना मराठीतून परीक्षा देता येईल.

मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले.

Back to top button