IslamNewsReligion

विहिंपच्या संघटन मंत्र्यांवर मुस्लीम कट्टरपंथियांचा भ्याड हल्ला

मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील मुरवास येथे विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री खगेंद्र भार्गव यांच्यासमवेत हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांवर ५०० मुस्लिम कट्टरपंथियांच्या जमावाने भ्याड हल्ला केला.

काही दिवसांपूर्वी फकीर मोहम्मद या माफियाने त्याच्या साथीदारांसह दलित सरपंच आशादेवी यांचे पती संतराम वाल्मिकी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांची हत्या केली होती. खगेंद्र भार्गव यांच्यासमेवत विहिंप आणि हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ता सदर पीडित कुटुंबाच्या भेटीसाटी जात असताना मुरवास येथील ५०० हून अधिक मुस्लिम कट्टरपंथियांनी जीवघेणा हल्ला केला. सुरक्षेच्या कारणास्तव विहिंपच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले. मात्र तेथेही जमलेल्या या कट्टरपंथियांनी पोलीस स्टेशनलाच घेराव घालून प्रक्षोभक नारेही दिले. त्यामुळे चिथावलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना जमावबंदी करावी लागली.

सदर घटनेनंतर विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ‘विदिशा येथे वाल्मिकी समाजातील सरपंच आशादेवी यांचे पती संतराम यांची मुस्लिम कट्टरपंथियांनी केलेली हत्या आणि त्यांना भेटण्यास गेलेल्या विहिंप पदाधिकाऱ्यांवर केलेली दगडफेक आणि गोळीबार निषेधार्ह आहे. या घटनेने ‘मीम आणि भीम’च्या घोषणा देणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button