OpinionReligion

हरिद्वार कुंभ मेळा एक अनुभव….


मी आजच हरिद्वार येथून परत आलो आहे. मी हरिद्वार ला 12 एप्रिल ला गेलो उत्तराखंड येथे प्रवेश करताना RT- PCR TEST अनिवार्य होती. तसेच कुंभा साठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन RT- PCR रिपोर्ट  शिवाय डॉ. चे  मेडिकल सर्टिफिकेट ही  अनिवार्य होते.
   डेहराडून यथील विमानतळा वर आमचा नेगेटिव्ह रिपोर्ट बघूनच आम्हाला विमानतळा बाहेर पडण्यास परवानगी दिली. कॅब नी हरिद्वार कडे निघाल्यावर वाटेत नेपाली फार्म ह्या चौकापर्यंत च आमची गाडी जाऊ शकली. तेथून पुढे हरिद्वार कडे सर्व खाजगी वाहनाना प्रवेश बंदी होती. तिथे परत आमची  सर्व कागदपत्र बघितली गेली आणि आम्ही  सरकारी बसने हरिद्वार येथील मोतीचूर बस स्टॅन्ड पर्यंत गेलो.. आम्ही हॉटेल मध्ये चेक इन करताना ही आम्हाला  आमचा RT- PCR रिपोर्ट दाखवायला लागला अनेक ठिकाणी RT- PCR रिपोर्ट चेक करत होते 12 एप्रिल  ते 15 एप्रिल सकाळ पर्यंत हरिद्वार मध्ये सर्व खाजगी वाहतूक बंद होती 
      14 ता. बैसाखी च्या मुहूर्तावर आम्ही जुना आखाडा च्या साधू संतांबरोबर त्यांच्या शोभा यात्रे बरोबर शाही स्नानाला हरकी पौडी ह्या प्रसिद्ध घाटावर गेलो..पिठाधीश्वर, महामंडलेश्वर, महंत ह्यांचे रथ त्याच्या पुढे नागा साधू. भक्तगण अतिशय शिस्त बद्ध मिरवणूक  होती.. ठरलेल्या वेळी ही मिरवणूक घाटावर पोचली. प्रत्येक आखाड्या ला स्नानाची मर्यादित वेळे आखून दिली होती त्या वेळेतच  जुना आखाड्याचे स्नान झाले. आणि सर्व साधूंनी घाट रिकामा केला.. 
पोलिसांनी ही कोणीही  नागरिक घाटावर राहणार नाही ह्या साठी अतिशय चांगली रचना लावली होती काही मिनिटात त्यांनी तो घाट मोकळा केला… पुढील आखाड्याचे साधू येण्या पूर्वी सर्व घाट पाण्याने धुतला वायपर नी घाट कोरडा केला… सॅनिटाईस ही केला अन्य परिसर आणि रस्ता ही लगेचच झाडून स्वछ केला गेला अतिशय वेगाने फक्त 10 -15 मिनिटात सर्व कामे होत होती. प्रशासन इतक्या शिस्त बद्ध आणि जलद गतीने काम करताना बघून खूप च आश्चर्य वाटले…      आम्ही स्नान करून बाजाराच्या दिशेने निघालो. बाजारपेठेत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर सुरवातीलाच   सर्व नागरिकांच्या  प्रत्येक बॅग, पिशवी ही सॅनिटाईस केली जात होती. प्रत्येकाचे  हात ही सॅनिटाईस केले जात होते आपण फोटो मध्ये बघू शकता.. मास्क बद्दल खूप जागृती असल्याचे लक्षात येत होते फक्त पोलीसच नाही तर प्रत्येक जण कोणाचा मास्क नसल्यास त्याला मास्क लावण्यासाठी प्रेमाने सूचना करत होता… 
पोलीस ही अरेरावी करत नव्हते हे विशेष( आम्ही  फोटोपुरतेच  मास्क काढत होतो)
करोना संबंधात प्रशासनाकडून  खूपच काळजी घेतली जात आहे हे  पदोपदी लक्षात येत होते. एका आखाड्या मधील 25 -30 साधू करोना पॉझिटिव्ह असल्याची  बातमी होती.. हरिद्वार ला एका दिवशी 70-80 जण पॉझिटिव्ह असल्याची  बातमी  वृत्तपत्रात वाचली महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली पुणे नाशिक ठाणे नागपूर ह्या शहरांशी तुलना केल्यास ही संख्या अगदीच नगण्य वाटते.
 ऋषिकेश मधील शाळा पण सुरु असल्याचे लक्षात आले तेथील जनजीवन करोनाची काळजी घेत पण सामान्य पणे सुरु आहे एकूणच कुंभाची व्यवस्था, स्वछता, शिस्त, वाखाणण्या सारखी आहे… 
स्थानिक रहिवाशी ह्यांचे म्हणण्या प्रमाणे ह्या वर्षी 50% च गर्दी आहे  उत्तराखंड येथील रस्ते ही अतिशय छान  आहेत आज आम्ही डेहराडून येथून मुबंई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 ला आलो परंतु आमचे  RT-PCR रिपोर्ट चेक करायला मुबंई विमानतळा वर कुठलीही व्यवस्था नव्हती. एकही मनुष्य नव्हता एकाही प्रवाश्यांचा रिपोर्ट चेक केला नाही. मुबंई मध्ये एवढा करोना वाढत आहे परंतु विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाश्यांचा रिपोर्ट चेक करण्याची व्यवस्था नसणे म्हणजे….


– राजेश कुंटे

Back to top button