NewsRSS

बंगालमधील निरपराध हिंदूंच्या भीषण नरसंहाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी

विहिंपची राज्यपालांकडे मागणी

मुंबई, दि. ६ मे : बंगालमध्ये निरपराध हिंदूच्या होत असलेल्या भीषण नरसंहाराची गंभीर दखल घेऊन महामहीम राष्ट्रपती तसेच भारत सरकारने बंगाल मध्ये त्वरित हस्तक्षेप करावा, तसेच सर्व दोषीच्या विरुद्ध अविलंब कारवाई करावी, अशी मागणी. विश्व हिंदू परिषदेच्या शिस्त मंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली. या शिस्त मंडळांत वि.हिं.प. कोंकण प्रांताचे सचिव – रामचंद्र रामुका, सह सचिव – श्रीराज नायर व मोहन सालेकर, विशेष संपर्क विभाग प्रमुख (महाराष्ट्र-गोवा) – संजय ढवळीकर, तसेच कोंकण प्रांताचे विशेष संपर्क विभाग प्रमुख – अशोक शेट्टी उपस्थित होते.

देशात कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितित मा. न्यायालयाने लॉकडाऊन तसेच मा. निवडणूक आयोगाने विजयीयात्रेबाबत बंदीचे सक्त आदेश दिलेले असताना सुद्धा बंगाल मध्ये बंगाल विधानसभेचे निकाल जाहीर होताच तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विशेषत: हिंदू समाजावर भीषण आक्रमण केले.

हिंदूंच्या घरांना – दुकानांना लुटणे – जाळणे, हिंदू महिलांची छेडछाड, सामुहिक बलात्कार करून त्यांची हत्या करणे. विजयोत्सवाचा नावावर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्ताचे अमानवीय आचरण अत्यंत निंदनीय आहे. विश्व हिंदू परिषद या भीषण नरसंहारचा अत्यंत कडक शब्दात निषेध करते. गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये अनेक हिंदू संघटनांकडून मोफत जेवण व रेशन स्वीकारणारे आज त्याच हिंदूंच्या जीवावर उठले आहेत, असे विश्व हिंदू परिषदचे कोंकण प्रांत सहमंत्री / मिडिया प्रभारी श्रीराज नायर यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button