Opinion

शाहू महाराजांची राजवट भारतीय इतिहासातील एक नेत्रदीपक पर्व


सर्वस्पर्शी कामातून समतोलपण आणणारे शाहू महाराज

प्रगतीशील सामाजिक स्थित्यंतर घडवून आणणारे म्हणजे शाहू महाराज. एका अर्थाने सामाजिक स्थित्यंतराचा साठी विचार मांडण्याची धैर्य दाखवणार व्यक्तिमत्व. आपण त्यांना समाज क्रांतिकारक नेता असेही म्हणू शकतो. छत्रपती शाहू महाराजांनी राज्य कारभारामध्ये सुव्यवस्था निर्माण तर केली. पण संस्थानाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रचंड मोठी सुधारणा घडवून आणली. अनिष्ट सामाजिक चालीरीती, अंधश्रद्धा दूर केल्या. प्रजा सदासुखी व संतुष्ट असावे आणि तिचे हितसंबंध योग्य पद्धतीने जपले जावे अशी त्यांची इच्छा असायची. सावकारांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केला.

आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा दृष्टीचा योग्य तो उपयोग करण्याची हातोटी शाहू महाराजांची होती. एका अर्थाने परमात्मा जगत चालकाच्या अनुग्रहाची परिणीती, मंगल आशिर्वाद आणि स्वतःच्या आणि प्रजेच्या आकांक्षा योग्य पद्धतीने सांगड घालणारे शाहू महाराज. अगदी उदाहरण सांगायचं म्हटलं तर सरकारी अधिकारी फिरतीवर असताना त्यांनी एखाद्या खेड्यामध्ये काही वस्तू घेतल्या तर, त्याची किंमत त्याने त्या तिथेच देऊन गावकऱ्यांकडून पावती घ्यावी या नियमाची अंमलबजावणी करायचे. हे नियम इतके खडक ठळक व आदर्श आहेत आजही उपयुक्त ठरावे असे आहेत.

शेतकऱ्यांच्या गुरांचा दिवाणी न्यायालयाने लिलाव करू नये असाही हुकुम त्यांनी काढला. औद्योगिक वाढीला सहाय्य करण्याचे धोरण शाहूमहाराजांनी आरंभापासूनच ठेवले होते. ते फक्त कोल्हापूर संस्थांना पुरते मर्यादित नव्हते. शाहू महाराज आपल्या सकाळच्या भेटीच्या वेळी खेडूत आणि संवाद साधायचे. अशा वेळी त्यांचं निरीक्षण चालू असायचं. गरीब प्रजा नेमकी कुठल्या तऱ्हेचा अन्न खातात कपडे वापरतात. त्यांना कुठल्या दैनंदिन अडचणी भेडसावतात. याचीही माहिती सातत्याने करून घ्यायचे. त्यांच्या तक्रारी गहाणे शांततेने ऐकून घ्यायचे. आणि त्या दूर करण्यासाठी त्या आटोकाट प्रयत्नही करायचे. आणि त्याच्यामुळे का म्हणून की काय त्यांच्याविषयी अलोट प्रेम जनतेच्या मनात निर्माण झाले होते.

शाहू महाराजांची राजवट आणि त्याचा इतिहास हा तसा भारतीय इतिहासातील एक नेत्रदीपक पर्व म्हणायला लागेल. सहानुभूती न्याय खंबीरपणा आणि सर्वसाधारण प्रजेची उन्नति याभोवती ही राजवट वाढीला लागली. वनवासीच्या समस्या यांनी खूप जवळून अनुभवल्या आणि आवश्यक तेथे उद्योगधंदे काढण्याच्या आपल्या धोरणांचा त्यांनी अंमल केला. त्या काळात कृत्रिम जलसिंचनाच्या उपायाने कॉफीची लागवड करण्याचा प्रयोग असेल किंवा पडीक व ओसाड जमिनीवर चहाची लागवड करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यादृष्टीने एखादा कारखाना सुरू करणं हे सुद्धा शाहू महाराजांचे आगळेवेगळे प्रयत्न म्हणावे लागतील.

गारगोटीच्या लोकांनी विनंती केल्यानंतर शाहूमहाराजांनी तिथे मुलांची शाळा काढली. त्याच विभागात पिण्याच्या पाण्याची सोय केली. महाराजांचा अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल की पावसाचं प्रतिवृत्त हे जून महिन्यापासून प्रत्येक आठवड्यात नियमितपणे पाठवण्याचा आग्रह धरणारे ते होते. त्यांच्या मनात एक सातत्याने चिंता चालू असायची धान्याच्या पुरवठा विषयी. त्यासाठी त्यांना सावधगिरी बाळगायची होती.

आपल्या शासनाचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सातत्याने शाहू महाराज हे कार्यक्षम अशा अधिकाऱ्यांच्या शोधात असायचे. राज्य कारभारामध्ये समतोलपणा राहावा मागासलेल्या जातीतील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आपली राज्य कारभारामध्ये हे मदत करावी यादृष्टीने त्यांनी कृती स्वरूपामध्ये अनेक प्रयोग केले. या काळात शाहू महाराजांना याच्यात थोडाफार विरोधही झाला कारण प्रस्थापितांची एक भूमिका सामान्य माणसाला प्रगतीपासून रोखणारी अशी होती. शाहू महाराजांची अशी खात्री नक्की होती ही राज्यकारभारात मध्ये अनेक जातीची लोक घेतल्यामुळे राज्यकारभाराला योग्य तो समतोल पणा येईल.

शाहू महाराजांनी स्वतःच्या दिमतीला अगदी गरीब वर्गातील लोकही प्राधान्याने ठेवले .त्यांचा हेतू या पाठीमागे असा होता गरीब लोकांसाठी ज्यांनी जे हुकूम काढले आहेत त्याची अंमलबजावणी होते का नाही ही हे त्यांच्याकडून कळावे. शाहूंना वाटे चांगल्या गोष्टी या चांगल्या माणसाकडे कळतात आणि वाईट गोष्टी अडचणीत असलेल्या माणसांकडून कळतात. समाजाच्या खालच्या थरांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचं नवीन धोरण.शाहूमहाराजांनी ठेवले. कर्नाटकच्या सर्वात जवळ कटकुळ या खेडेगावांमध्ये असलेली प्राथमिक शाळांमध्ये मराठी-कानडी असा एक प्रश्न निर्माण झाला अशावेळी त्यांनी मराठी राजभाषा आणि कानडी व्यवहाराची भाषा म्हणून दोन्ही भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाहू महाराजांनी सातत्याने प्रयत्न केले.

आपण सर्वजण शाहू महाराजांकडे एका अर्थाने आदर्श राज्यकर्ता म्हणून पाहतो आणि ज्यावेळी शाहूमहाराजांनी एखादा निर्धार व्यक्त केला त्याचं कृतीत रुपांतर नक्की केलेले आहे. आपल्या राज्यकारभाराच्या काळामध्ये विचारपूर्वक निवड केलेल्या लोकांचा भरणा हा शाहू महाराजांनी सातत्याने केला. त्या काळात मोठ्या संस्थानातील चुटकी’च्या जागा पटवण्याची पटकावण्याची स्पर्धा असायची. राज्य कारभारामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेणे यांचा शाहू महाराजांचा निर्धार असायचा. गंगाराम भाऊ मस्के यांनी त्यांना या कामात खूप मदत केली. दाजीराव विचारे यामुळे जोडले गेले. अशा प्रकारच्या नेमणुका करताना काही लोकांच्या विरोधात गेल्यामुळे वाईटपणा स्वीकारण्याची तयारी सुद्धा शाहू महाराजांनी ठेवली.

खेड्यापाड्यांचा दौरा शाहूमहाराजांनी केला. पावसाच्या अभावी दुष्काळ पडत असलेल्या भागांना भेट दिली. अवर्षणामुळे अन्नधान्याची टंचाई पडल्यामुळे शाहूंनी आपल्याबरोबर कुठलाही लवाजमा न घेता उंटावरून व घोड्यावरून प्रवास केला. पिकांची पाहणी केली. गरिबांच्या घरी दुष्काळी सहाय्य देण्याचा काम तेथल्या तेथेच करण्यात यावं असा निर्णय त्यांनी घेतला. डोंगराळ प्रदेश व दुष्काळाची परिस्थिती ही पाहण्यासाठी एक आठवड्या सहा महिन्यांहून अधिक काळ शाहूमहाराजांनी प्रवास केला त्या आणि त्यामुळे जनतेचे प्रेम हे हे शाहू महाराजांना मिळाले.

1896 साली प्लेगची साथ पसरलेली असताना, त्यावरची उपाययोजना करताना संस्थानाच्या कारभारामध्ये त्यांनी खूप अगोदर या विषयातील नियोजन केले होते. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस प्रसार कोल्हापूर संस्थानात झाला नाही. या काळामध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा राज्य कारभारामध्ये योग्य उपयोग शाहू महाराजांनी केला. दुष्काळाच्या वर्षाच्या काळात अधिकाऱ्यांना त्वरित निर्णय देता यावेत म्हणून त्यांनी पन्हाळा येथील राजवाडा आणि कोल्हापूरचा राजवाडा तसेच ब्रिटिश राज्य प्रतिनिधींचे कार्यालय ही दूरध्वनीने जोडलेले होते. यामुळे अडचणीचा झटपट निर्णय करून घेण्याची सोय झाली

सामान्य जनता प्लेग व दुष्काळ यामुळे त्रस्त झालेली होती. त्याचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून खूप साऱ्या तातडीच्या योजना या शाहूमहाराजांनी अमलात आणल्या. दरबारात स्वस्त दराने गवत विकण्याची सोय केली. ज्या गुरांना त्यांचे धनी पोसू शकत नव्हते, त्यांच्याही दाणागोटा ची सोय करण्यात आली. शेतकऱ्यांची जमीन महसुलाची तहकूब देण्यात आली. तीर्थकोटी येथील फ्लॅग रुग्णालयाला ते रोज भेट द्यायचे

दुष्काळ भागाला भेट देण्यासाठी शाहू महाराज आवर्जून जात राहिले. दुष्काळ व प्लेग यांच्या काळात शाहू महाराज अविरतपणे काम करत राहिले. ते म्हणायचे पन्हाळा राजवाड्यात मी फक्त झोपतो. इतर सारा वेळ मी कार्यालयातच असतो. सकाळचा वेळ मी शहरातील प्लेगची कामे कशी चालली आहेत यावर देखरेख ठेवतो. ग्रामीण भागातील पिकांची पाहणी स्वतः करता यावी यासाठी ४० मैल घोड्यावरून प्रवास करत असत. शेतकऱ्यांच्या जनावरावर महाराजांचे अतिशय प्रेम होते. गुराढोरांची सरकारी तबेला जेवढी म्हणून सोय करता येईल तेवढे करत राहायचे.

शाहू महाराजांनी आपल्या प्रजाजनांना प्लेगच्या व दुष्काळाच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी अविरत प्रयत्न केले. खेड्यातील लोकांना व शेतकऱ्यांना आपली गाऱ्हाणी व अडचणी प्रत्यक्ष आपल्या राजासमोर मांडता याव्यात म्हणून महाराजांनी आपले वास्तव्य पन्हाळगडावर ठेवले होते. आजूबाजूच्या खेड्यातून पहाणी करत फिरत असलेल्या निरनिराळ्या जिल्ह्यातील अधिकारांना त्यांना तिथे भेटणे सोयीचे झाले .

भयंकर प्लेगच्या दिवसात शाहूंनी स्वस्त धान्याची दुकाने उघडली. शिवाय काही अनाथालय सुद्धा उघडली. लोकात निर्माण झालेली दारिद्रय निवारण्यासाठी पाण्याचा पुरवठा तेथे त्यांनी सार्वजनिक सरकारी काम सुरू केले. शिकारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. पटकीच्या दिवसात खेड्यापाड्यांमध्ये स्वच्छता राखली. पिण्याचे पाणी दूषित होऊ नये म्हणून खबरदारी घेतली. त्या भयंकर काळामध्ये यात्रा स्थगित केल्या होत्या. प्लेगची बातमी देणाऱ्याना बक्षीस देण्यात आली. प्लेग पिडीत लोकांच्या निरीक्षणासाठी छावण्या उघडण्यात आल्या. दुर्बल आणि गरीब जनतेला मोफत अन्न पुरवण्यात आले

त्यामुळे कोल्हापूर संस्थानात दुष्काळापासून होणाऱ्या हालअपेष्टांची तीव्रता कमी झाली दुष्काळामध्ये महाराजांची उपाय योजना इतकी तातडीची दूरगामी व सर्वव्यापी होती की दुष्काळामध्ये भूक बळी पडले नाहीत आणि त्यामुळे मृत्यू मधले भर पडली नाही आपला राज्यकारभार सहानुभूतीने व कर्तव्यनिष्ठेने चालविण्यात शाहूंनी यश मिळवले. शाहू महाराजांना राज्यकारभार हा समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या सहाय्याने यशस्वीरित्या चालवायचा होता. त्यामुळे त्यांनी आपल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती दुर्बल व निरक्षर मागासवर्गीय व दरीत या बहुजनांमध्ये शिक्षण प्रसार करणे आवश्यक आहे.

राज्याची सुधारणा करणे म्हणजे नैतिक व भौतिक प्रगती. आरोग्याची सोय, शेतकीची प्रगती व उद्योगधंद्याची स्थापना .स्थानिक राज्यकारभारात आणि सार्वजनिक संस्थानात मागासवर्गीयांना मोठ्या प्रमाणात समाविष्ट द्यावे अशी छत्रपतींना वाटत होते. त्यामुळे मागासवर्गीयांना आपल्या अधिकाराविषयी जागृत व्हावे आणि त्यासाठी आपण त्या वर्गांमध्ये शिक्षण प्रसार केला तरच ही गोष्ट आपणास साध्य होईलअसा शाहूंना विश्वास होता.

त्याप्रमाणे त्यांनी मागासवर्गीयांच्या मार्गातील अडचणी दूर करण्याच्या हेतूने खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी कोल्हापुरात वस्तीगृह बांधण्यास आरंभ केला. प्रारंभिक काही विद्यार्थी त्यांनी आपल्या राजवाड्यावर ठेवले होते. परंतु सुग्रास भोजन, आयुष्य यामुळे मुले आळशी झाली आणि त्यांनी अभ्यास न करता किंवा घरातील तेवढे अनुकरण केले. अभ्यासात त्यांची प्रगती न झाल्यामुळे राहून की या बाबतीत निराशा झाली राजाराम महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी एक वस्तीग्रह सरकारी खर्चाने त्यांनी चालू ठेवले.

शाहू महाराजांचे काम म्हटले तर सर्वस्पर्शी. सगळयांना सामावून घेणारे. शिक्षण जे जाती व्यवस्थेच्या प्रश्नवर उत्तर आहे असे मानणारे महाराज. त्याचमुळे अधिकाधिक वसतिगृह महाराजांनी १९२० साली बांधली. शाहू महाराजांनी बांधलेल्या वसतिगृह आणि महाराष्ट्र शिक्षणातील बदल हा एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे. आपल्या साम्राज्यात महिलांच्या स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनेही त्यांनी काम केले. त्यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी शाळा स्थापन केल्या. १९१७ साली विधवा पुनर्विवाहास कायदेशीर केले आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले. १९२० साली देवदासी प्रथा (मुलींना देवाला अर्पण करण्याच्या प्रथेवर) बंदी आणणारा कायदा आणला.

सहकारी संस्था आणि मालासाठी बाजारपेठ निर्माण करणारे शाहू महाराज. शेतीसाठी आधुनिक उपकरणे शेतकऱ्यांनी खरेदी करता यावी यासाठी प्रयत्न केले. पिंकाचे उत्पादन वाढावे आणि तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सोय केली. त्यासाठी किंग एडवर्ड कृषी संस्था स्थापन केली. राधानगरी धरण बांधून कोल्हापूर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले.

शाहू महाराजांचे चरित्र अनेक अर्थाने आजच्या शिक्षण क्षेत्रातील धुरिणांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. सामाजिक परिवर्तनातील शिक्षणाची भूमिका आणि राज्यकारभाराचा उत्तम प्रशासकीय नमुना शाहू महाराज नेहमीच आदर्श आहेत. शाहू महाराज महाराष्ट्रातील सर्व जातींचे सर्वसमावेशक नेतृत्व राहिले आहेत. ते कुठल्या एका जातीपुरते मर्यादित राहिले नाहीत. सर्वस्पर्शी कामातून समतोलपण आणणारे शाहू महाराज.

  • संजय साळवे
Back to top button