News

‘महाराष्ट्राची सांस्कृतिक तोंडओळख’ या विषयावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची ऑनलाइन कार्यशाळा

पुणे, दि. २३ सप्टेंबर : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे पुण्यातील संस्था बांधणी आणि नेतृत्त्व अध्ययन केंद्र यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापनदिनानिमित्त ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक तोंडओळख’ या संकल्पनेवर आधारित चार ‘ऑनलाईन’ कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या संकल्पनेतंर्गत ‘प्राचीन मंदिरे कशी पाहावीत’ (रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१), ‘किल्ले कसे पाहावेत’ (रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१), ‘लेणी कशी पाहावीत’ (रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१) आणि ‘संग्रहालये कशी पाहावीत’ (रविवार, १२ डिसेंबर, २०२१) आदी चार विषयांवर ही मालिका असणार आहे.

विषयांतील तज्ज्ञ अभ्यासकांची व्याख्याने आणि सादरीकरण या कार्यशाळेला लाभणार आहे. प्रत्येक कार्यशाळेचे शुल्क प्रत्येकी ४००/- रुपये असून संपूर्ण मालिकेसाठी १२००/- रुपये या सवलतीच्या शुल्कात नोंदणी करता येईल. १२ ऑक्टोबर, २०२१ ही नोंदणीची अंतिम तारीख आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी, प्रबोधिनी – ७२०८०७०८७३, संतोष गोगले-९२२६४४८४८१, राहुल टोकेकर-९८२२९७१०७९ संपर्क साधण्याचे आवाहन प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे.


 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button