News

‘हिंदूसभा रुग्णालयाचा सेवाभाव अखंडित राहावा’ – विपश्यनाचार्य पूज्य भदन्त संघकिर्तिजी महाथेरो

मुंबई, दि. २७ नोव्हेंबर : एच. जे. दोशी घाटकोपर हिंदूसभा हॉस्पिटल मध्ये कोरोनाकाळासमवेतच आताही उत्तम प्रतीच्या वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. या रुग्णालयाचा सेवेसाठी सदैव तत्परअसलेला सेवाभाव, असाच अखंडित सुरू राहावा, असे भारतीय भिक्षु संघाचे प्रमुख विपश्यनाचार्य पूज्य भदन्त संघकिर्तिजी महाथेरो उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले. एच. जे. दोशी घाटकोपर हिंदूसभा हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे ट्रस्टी अध्यक्ष मगनभाई दोशी यांच्या मार्गदर्शनानुसार बौद्ध धम्मगुरु हेतु *“नि:शुल्क विशेष आरोग्य शिबीर, औषध वितरण आणि संघदानाचा कार्यक्रम शनिवार, दि. २५ सप्टेंबर रोजी विश्व भूषण बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहीद स्मारक सभागृह, रमाबाई नगर, घाटकोपर येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. वैभव देवगिरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या आरोग्य शिबिर कार्यक्रमात विपश्यनाचार्य पूज्य भदन्त संघकिर्तिजी महाथेरो” यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वतःचा अनुभव व्यक्त करताना ते म्हणाले कि, रुग्णालयातील सगळ्यांनी माझी उत्तमरीत्या सेवा करून मला नवीन जीवनदान दिले आहे. बौद्ध भिक्षु संघाच्या वतीने त्यांनी सर्वांना शुभेच्छाही यावेळी दिल्या.

या कार्यक्रमात मुंबईसह यवतमाळ, नांदेड, आसाम, कानपूर, त्रिपुरा येथून ७० हून अधिक बौद्ध धम्मगुरू उपस्थित होते. या सर्वांच्या आरोग्याची तपासणी करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. रुग्णालयातील अनेक डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बौद्ध धम्मगुरुंना संघदान देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमात, “भिक्षु विरत्न थेरो” ( कार्याध्यक्ष, भारतीय भिक्षु संघ ) यांचे विशेष सहकार्य लाभले.

या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून रक्त, डोळे, दात, ईसीजी तसेच अन्य प्रकारच्या आजारांची तपासणी केल्यानंतर मोफत औषधेही देण्यात आली. सर्व बौद्ध धम्मगुरुंना अन्नदान आणि संघदानही प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तसेच आयोजन डॉ. रविन्द्र कांबळे व आनंद सावते यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन रविन्द्र कांबळे यांनी केले असून कार्यक्रमात सिद्धी कल्याणकारी महिला संस्थेच्या प्रमुख स्मिता कवाडे , सूर्यकांत गायकवाड, विष्णु कांबळे, विजय गोरे, ऍड.विनोद जाधव, नामदेव उबाळे, बापू धुमाळे, डॉ. रजनीकांत मिश्र, डॉ. ओमप्रकाश गजरे, डॉ. राहुल कोल्हे, डॉ.शबनम कारानी, डॉ. स्नेहा भट्टे, डॉ. नीलाक्षी धुरी , डॉ. संजय पाल , डॉ. विनायक अवकीरकर , डॉ. अक्षया वाघ, सुचिता मांजरेकर, राजश्री डुंबरे, चंद्रकांत गावडे, संजीव भावसार तसेच रुग्णालयाचे अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button