News

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या वडिलांची कन्या होणार पेट्रोलियम इंजिनीयर !

असे म्हटले जाते कि, जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हातात घेतलेल्या कुठल्याही कामाला यश हे मिळतेच. हेच म्हणणे पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या एका वडिलांच्या कन्येने सत्यात उतरवले आहे. या कन्येचे नाव आर्या राजगोपाल असून कानपूरमधील पेट्रोलियम इंजिनीयररिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी तिला प्रवेश मिळाला आहे.

आर्याने धैर्य आणि दृढ निश्चयाने हे यश संपादित केले आहे. आर्याचे वडील राजगोपाल मुलीचे भविष्य उज्वल होण्यासाठी गेली 20 वर्ष पेट्रोल पंपावर काम करत आहेत. वडिलांचे कष्ट आणि तिची मेहनत या दुहेरी संगमाने तिला तिच्या यशाचा मार्ग गाठता आला.

आर्याच्या जिद्द आणि चिकाटीबद्दलचे कौतुक करत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हरदीप सिंह पुरी यांनी आर्या आणि तिच्या वडीलांचा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले,’आर्याने तिचे वडील श्री राजगोपाल यांचे आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्रासोबत जोडल्या गेलेल्या आम्हा सर्वांची मान उंचावली आहे आहे. बाप-लेकीची ही जोडी नवीन भारतासाठी रोल मॉडेल ठरली आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा.’

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन श्रीकांत माधव वैद्य यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून लिहिले की, ‘इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राजगोपाल यांची मुलगी आर्या हिची प्रेरणादायी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. आर्याने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळवून सर्वांची मान उंचावली आहे. आर्याला शुभेच्छा. ‘

Back to top button