CultureNews

पुराणग्रंथ अभ्यासक्रमाचे १० मार्चपासून ऑनलाईन वर्ग

मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : गुजरात टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजच्या विद्यमाने पुराणग्रंथ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १० मार्च ते १४ मे २०२२ पर्यंत अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. अभ्यासक्रमामधील काही विषय हे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत. प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

३ महिन्यांच्या हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने आठवड्यातून तीन दिवस सकाळी ७:३० ते ८:४५ या वेळेत चालविण्यात येईल. या अभ्यासक्रमासाठी प्रवेशशुल्क ६ हजार रुपये असून https://www.gtu.bhishmaindics.org या लिंकवर ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीकरिता सोमवार ते शनिवार सकाळी १० ते ८ वाजेपर्यंत (9699489179 / 9309545687/व्हॉटसअप – 9175671262) या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे प्रशिक्षण वर्ग झुम कॉलद्वारे घेण्यात येईल. प्रशिक्षण सुरु असताना वर्गातील क्लास रेकॉर्डिंग्स, प्रश्न-उत्तर सत्र, ईबुक फॉरमॅट मध्ये स्टडी मटेरिअल उपलब्ध होतील तसेच करियर / रिसर्च संधीकरता मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

पाठ्यक्रमातील विषयांनुसार पुराण, पुराण धर्म आणि साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. पुराणग्रंथ हे इतिहास आणि ज्ञानाचे समृद्ध स्रोत आहेत, याविषयीची माहिती तसेच १८ महापुराण आणि १८ उपमहापुराणांचे पायाभूत ज्ञान या पाठ्यक्रमाद्वारे दिले जाणार आहे. ब्रह्मांड आणि विश्व विकासाविषयीचे विचार, पुराणांच्या माध्यमातून जीवन व्यवस्थापन आणि सामाजिक प्रबंधन प्रणाली, पुराणांच्या माध्यमातून जन सामाजिक शिक्षण, पुराणांतील विज्ञान आदींचा समावेश या अभ्यासक्रमात असणार आहे. या अभ्यासक्रमाला युनिव्हर्सिटीचे ४ क्रेडिट्स आहेत.

Back to top button