HinduismOpinion

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर

छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – 9

भारताच्या ज्या भागात अहिंदु लोकसंख्येचे प्रमाण वाढले ,तिथे आपल्याला वेगवेगळ्या अराष्ट्रीय कारवाया वाढल्याचे दिसेल. मुस्लिम आक्रमकांनी तलवारीच्या बळावर किंवा प्रलोभने दाखवून हिंदुना बाटवल्याचे इतिहास सांगतो.

बाबर,अकबर ,शाहजहान आणि औरंगजेब अशा सर्वांनी मोठ्या प्रमाणात हिंदुना बाटवून मुसलमान केले होते. औरंगजेबाने तर हिंदुवर जझिया नावाचा कर (Tax) लावला होता.प्रत्येक हिंदुला हा कर भरणे अनिवार्य होते. हा कर लावण्यामागे औरंगजेबाचे दोन हेतू होते.

1) मोहीमांच्या खर्चांमुळे औरंगजेबाचा खजिना रिकामा होत चालला होता

2) जझिया कराच्या माध्यमातुन त्याला हिंदुना जबरदस्ती मुसलमान करायचे होते. मुस्लिम शासकांच्या अशा वृत्तीमुळेच “हाणून मारुन मुसलमान करणे” ही म्हण रुढ झाली असावी. हाणून मारुन हिंदु करणे अथवा जैन,बौध्द करणे असे आपण कधीही ऐकले नसेल. मुस्लिम आक्रमक आणि इंग्रजांनीही हिंदुना मोठ्या प्रमाणावर बाटवून मुस्लिम अथवा ख्रिश्चन केले.

एखादा हिंदु हा मुस्लिम अथवा ख्रिस्ती झाला याचा अर्थ त्याची उपासनापध्दती बदलते असे नाही तर त्याची राष्ट्रनिष्ठाही बदलते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुधर्माचे कठोर टीकाकार होते पण त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिस्तीधर्म स्वीकार करण्यास स्वच्छ नकार दिला ते म्हणाले “माझे लोक मुसलमान झाल्यास ते राष्ट्रीय भावना गमावतील आणि ख्रिस्ती झाल्यास ब्रिटीश शासनाला बळकटी येईल.” त्यामुळे त्यांनी भारतीय मातीत जन्माला आलेला बौध्दधर्मच स्वीकारला.

स्वराज्याचा सरसेनापती नेतोजी पालकर यांना औरंगजेबाने मुसलमान केले,त्यांचे नाव ठेवले “मुहम्मद कुलीखान” त्यानंतर नऊ वर्ष काबुल कंदाहारच्या मुस्लिम मुलखात राहिलेला नेतोजी आज पुन्हा रायगडावर दाखल झाला,त्याकाळी मुसलमान झालेल्या हिंदुला पुन्हा हिंदु करुन घेणे महाकर्मकठीण होते! जिथे परधर्मीयांच्या विटाळाचे पाणीही निषिध्द ठरावे ,तिथे एका मुसलमानाला शुध्द करुन पंक्तीला घ्यायचे म्हणजे अशक्य होते,पण शिवाजीमहाराजांनी एक विलक्षण क्रांतिकारक पाऊल टाकायचे ठरवले महाराजांनी नेतोजीला पुन्हा हिंदु करुन घ्यायचे ठरवले. दि. 19 जून 1676 रोजी मुहम्मद कुलीखान पुन्हा पूर्ववत नेतोजी पालकर झाला. महाराज द्रष्टे राजे होते.त्यांना आपल्या मायभूमीचे भविष्य दिसत होते. त्यामुळे “हिंदु बचाओ आणि हिंदु बढाओ” वर त्यांनी भर दिला. पुढे छत्रपती शंभुराजांनी मुसलमान झालेल्या अनेक हिंदुना पुन्हा स्वधर्मात घेतले आणि शिवरायांचा वारसा समर्थपणे चालवला,आता वेळ आपली आहे.

हिंदुना बाटवण्याचे उद्योग आजही थांबलेले नाही. लव्ह जिहादच्या माध्यमातुन हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या मुलींच्याद्वारे मुस्लिम मुले जन्माला घालायची आणि मुस्लिम लोकसंख्या वाढवून इस्लामी राज्य स्थापन करण्याचा त्यांचा डाव आहे .त्यासाठी “अखंडपणे सावधान” राहण्याची गरज आहे.

  • रवींद्र गणेश सासमकर
Back to top button