Opinion

समाजात जल साक्षरतेची गरज

आज २२ मार्च २०२२ जागतिक जल दिन साजरा करण्याचा दिवस. काही ठिकाणी एक सप्ताहभर सुद्धा साजरा केला जातो . प्रामुख्याने हा जागतिक जल दिन साजरा करण्याचे प्रयोजन म्हणजे समाजामध्ये पाणी या विषयावर जागरण करणे हेच होय . सर्वदूर जगामध्ये पाण्याची समस्या नाही असा देश नाही . पाण्याची समस्या म्हणजे नेमके काय पाण्याची उपलब्धता किती प्रमाणात आहे तसेच पाण्याशी निगडीत असणारे अन्य प्रश्न , उदा.पाण्याचे वितरण पाण्याचे प्रदूषण पाण्याची शुद्धता , पण्याचे मूल्य, शेतीसाठी व उद्योग धंद्यासाठी आवश्यक पाणी भूजलाचा उपसा बदलणारे पर्जन्यमान विविध कारणासाठी बांधण्यात येणारी धरणे व त्याच्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न अश्या अनेक बाबी सामोऱ्या येतात उपरोक्त प्रश्नांची जर समाधान पूर्वक सोडवणूक करावयाची असेल तर समाजामध्ये जल साक्षरता येणे आवशयक आहे . पाणी हा विषय सतत चर्चेत राहावा या विषयात आपण काय करणार आहोत यावर मंथन व्हावे या उद्देशाने जगाणे २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून निवडला आहे युएन वोटर हि संघटना या साठी दर वर्षी एक थीम देते या थीमच्या अनुषंगाने जगात विविध ठिकाणी भाषणे चारच्या सत्रे पाणी या विषयावर विविध स्पर्धा घेऊन जलजागृती केली जावी हि अपेक्षा असते गेल्या काही वर्ष्यात युएन वॉटर या संस्थेने काही थीम्स दिल्या त्या खालील प्रमाणे

:- सन -२०१६ – पाणी आणि रोजगार २०१७- पाणी विनाकारण का वाया घालवता २०१८- निसर्गासाठी पाणी २०१९- कोणालाही मागे सोडू नका २०२०- पाणी आणि हवामान बदल २०२१- पाण्याचे मूल्य जाणा चालू वर्षी – भूजल अदृश्य मानाकडून दृश्य मानाकडे चालू वर्षाची थीम ठरविताना रोम येथे युएन वॉटर च्या सभेत चर्चा होवून भूजल लक्ष केंद्रित केले जावे यावर जोर दिला गेला व म्हणूनच भूजल अदृश्य मानातून दृश्यमानाकडे हि थीम निवडण्यात आली जगातील ५० % जनतेला पिण्याचे पाणी भूजल पुरविते त्याच प्रमाणे शेती सिंचनासाठी ४०% पाणी भूजलाचेच असते एवढेच न्हवे तर उद्योगधंद्याच्या एक तृतीयांश टक्के गरजा भूजलाद्वारे पुरविल्या जातात. नद्यांना पाण्याचा स्थिर पुरवठा करण्याची जबाबदारी हि भूजल उचलते हवामान बदलामुळे पाण्याची जी समस्या निर्माण झाली आहे तेथे हि भूजल उपयोगी ठरते. एका अंदाजानुसार भारतातील वार्षिक वापरण्या योग्य भूजल हे ४३३ बिसिएम इतके आहे. यापैकी ५८% भूजल हे पावसाच्या पाण्यापासून पुनर्भरणाने मिळते उर्वरित भूजल पुनर्भरणाचे स्त्रोत म्हणजे कालव्यामधून पाझरणारे पाणी, तळे धरणे हे आहेत. भूजालचे इतके महत्व असतानाही ते दिसत नसल्याने माणसाच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम दिसून येत नाही. भूपृष्ठावरील पाण्याचे वाढते प्रदूषण यामुळे हि भूजालाकडे जास्त लक्ष देणे आव्हानात्मक झाले आहे.

महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या ८५% योजना या भूजलावर आधारित आहेत. या सर्व कारणामुळे हि थीम का निवडली याचे कारण समजू शकते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने जागोजागी असलेल्या निरीक्षण विहिरीच्या पाण्याच्या पातळीची नोंद ठेवली जाते व त्या अनुषंगाने त्या भागातील भूजलाची स्थिती कशी आहे हे ठरविले जाते. भूजल घटले आहे का वाढले आहे यातून समजून येते तथापि भूजलाचा वारेमान उपसा होत असताना भूजलाच्या संरक्षणासाठी जे नियम केले आहे त्याचे अधिक परिणामकारक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तरच भूजलाच्या साठ्याचे संरक्षण व भूजलाचे योग्य प्रकारे वापर होऊ शकतो, जे येणाऱ्या पिढ्यांच्या हिताचे ठरणार आहे. शासन व समाज हे दोन्ही घटक एकत्र येवून यासंबंधी कार्यवाही करू शकलो तरच या बेसुमार उपश्यावर नियंत्रण होऊ शकते. भूजल हे दृश्य नाही ते अधिक दृश्य करण्यासाठी जल साक्षरता निर्माण करणे गरजेचे आहे. भूजल दृश्य करण्यासाठी खालील मार्गाचा वापर करणे योग्य ठरेल.

१) भूजलाचे गूढ उकलणे २) जलधराची संकल्पना समजून घेवून त्यातील पाणी साठ्याचे अंदाज करण्याचे तंत्र अवगत करणे.३) भूजल उपस्याची संखीकीय माहिती गोळा करणे.४) हवामान बदलाचे भूजलावरील परिणाम शोधून काढणे.५) भूजलाकडे पाण्याची बँक म्हणून पाहावे.६) जगातील विविध संस्थांनी पुढाकार वाढविणे.आता थोडे जलसंधारणाच्या प्रचलित उपाय योजना आहेत त्या संबंधी जाणून घेवू १) लूज बोल्डर्स – डोंगरामध्ये ज्या घळी असतात त्या तेथेच असलेल्या दगड गोट्यांनी भिंत करून अडवल्यास धूप थांबण्यास मदत होते.२) सलग समतल चर- एकाच तलांकात सलग चर ६० से.मी. * ६० सेमी या आकाराचा खोदणे जेणेकरून पावसाचे पाणी त्यामध्ये भरेल व मुरण्याची प्रक्रिया चालू होईल यामध्ये खोल सलग समतोल चर १.०० मिली *१.०० मिली या आकाराने खोदल्यास अधिक उपयुक्त ठरतात.३) माती बांध – जमिनीच्या उतारानुसार जमिनीचे निरनिराळे भाग करावेत त्यानुसार माती बांध घालावे योग्य ठिकाणी सांडावा ठेवावा जेणेकरून जादा झालेले पाणी वाहून मुळ बांधला धोका होणार नाही.४) शेततळी शेतामध्ये उतार पाहून शासनाने प्रस्तावित केलल्या आकार मनाप्रमाणे तळी तयार करणे जेणेकरून त्यामध्ये पाणी साठवण करता येईल यासाठी शासन अनुदान हि देत आहे.५) कॉंक्रीट नाला बांध यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होवून जवळपासच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढते.६) छतावरील पाणी संकलन घरावरील छतावर पडणारे पाणी पाईप द्वारे एकत्र करून त्यामध्ये व त्यामध्ये गाळणी ची व्यवस्था करून ते पाणी टाकीत साठविणे किंवा बोअर पाईप द्वारे पुन्हा जलधारा मध्ये सोडणे.

या सर्व उपाय योजनांद्वारे जलसंधारण प्रभावी पणे करणे शक्य आहे. समाजासमोर ठोस स्वरुपात काही उपाय योजना मांडल्या व त्या कृतीत आणल्या तर त्याला भरभरून प्रतिसाद मिळू शकतो याचे उदाहरण द्यावायचे झाल्यास सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदी पुनर्जीवनाचे देता येईल हि नदी सांगली जिल्ह्याच्या तीन दुष्काळी तालुक्यातून ( खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ ) वाहत जावून पुढे कर्नाटक राज्यात जाते व कृष्णा नदीस मिळते. या नदीवर जागो जागी साखळी बंधारे बांधून पाणी अडविण्याची सोय लोकसहभाग व शासन यांच्या मार्फत केलील. कर्नाटक शासनाने हि त्यांच्या हद्दीतील नदीवर बंधारे बांधले व आज हि मृत झालेली १०५ कि.मी. ची नदी पुर्जीवित झाली आहे. शासन, संत व समाज यांच्या सहयोगाने सर्वच नदी खोरे विकसित करण्याचे काम चालू आहे.आता थोडं आपण आपल्या स्थरावर पाणी बचतीचे कोणते उपाय अवलुंबू शकतो ते पाहू जेणेकरून आपण हि आपल्या कुटुंबासह या चळवळीत सामील होयू शकतो. सर्व प्रथम म्हणजे स्नान करण्यासाठी फक्त १ बदली पाणी वापरण्यावर कटाक्ष ठेवावा. घरी आलेल्या लोकांना पाणी देताना ग्लास ऐवजी तांब्या भांडे पुढे ठेवावे जेणेकरून आवश्यक तेवढेच पाणी वापरले जावे. आपल्या घरी आर.ओ. वॉटर फिल्टर असेल तर मशीन द्वारे बाहेर पडणाऱ्या पाण्याचा बागेसाठी वापर करावा घरातील नळ गळती असेल तर ती वेळच्या वेळी थांबवावी तसेच नळाला मिस्ट किंवा एरिएटर बसवावे म्हणजे पाण्याची धार प्रमाणात राहील पाणी वाया जाणार नाही चला तर मग स्वतः पासूनच सुरवात करून जल दिन साजरा करूया.

लेखक – विलास चौथाई(BE.civil) निखिल कांबळे(M.Tech)

(लेखक जलसाक्षरता कामात सक्रीय आहेत )

Back to top button