NewsRSS

दु:खद वार्ता:देशभरातील शेकडो परिवारांचे मार्गदर्शक पालक गेले

जेष्ठ स्वयंसेवक
पद्माकर गोपाळ वझे
यांचे वृद्धापकाळाने निधन…… शुक्रवार दिनांक ९/९/२०२२ रोजी जेष्ठ संघ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.त्याचा जन्म २०/९/१९२९ रोजी झाला.त्यांचे एम.ए.एल.एल.बी.शिक्षण झाले. साधारणपणे १९५१ च्या दरम्यान त्यांनी आसाम मध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम केले.प्रचारक म्हणून थांबल्यावर त्यांनी दादर, मुंबई येथे संघाचे काम केले.त्याच काळात साप्ताहिक विवेकच्या सुरवातीच्या उभारणीत योगदान दिले विवेकमध्ये त्यांनी काही वर्ष काम केले.स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी ग्लॅक्सो इंडिया मध्ये नोकरी सुरू केली.
तेथे एक्झिक्युटिव्ह (पर्सोनेल) म्हणून निवृत्त झाले.सेवा निवृत्ती नंतर ते पुण्यात स्थायिक झाले.पुण्यात भारतीय मजदूर संघ,’स्व’रूप वर्धिनी,श्रम सेवा न्यास ,ग्राम विकास संस्था इ. यांच्या उभारणीत मोठा सहभाग होता संघाच्या विविध क्षेत्रांच्या कामांशी ते जोडलेले होते.
अनेक संस्थांना त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली.गरजू व्यक्तींनाही शिक्षणासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते मदत करत असत.बुद्धीप्रामाण्य, तर्कशुद्ध विचार, अत्यंत संवेदनशीलता,गरीब व शोषित याच्या बद्दल आंतरिक कळवळा, मदतीचा स्वभाव, वक्तशीरपणा हे त्यांचे विशेष गुण होते.आज देशभर शेकडो परिवारात त्यांच्या जाण्याने जणू पालकच गेल्याची भावना आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, लहान बहीण पुतणे, पुतण्या,भाचे असा मोठा परिवार आहे.
ईश्वर गोपाळरावांना सद्गतीच देईल.

अनंतचतुर्दशीच्या दिवशी गोपाळराव अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
जणू अनंताला सांगण्यासाठीच
नाहं कामये मोक्षं स्वर्गं राज्यं
कामये दु:खतप्तानाम् आर्ति नाशनम्

सुर्यकांत परांजपे
पुणे

Related Articles

Back to top button