HinduismNewsSevaकोकण प्रान्त

“महाराष्ट्र भूषण” भक्ती सोहळ्याला राजकारणाचे ग्रहण ..

रविवारी, १६ एप्रिल २०२३ संध्याकाळपासूनच महाराष्ट्र भूषण (maharashtra bhushan) पुरस्कार सोहळा चर्चेत आला आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर पुरस्काराचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका करत आहे.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्काराची २५ लाखाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीला अर्पण केली यावरून आप्पासाहेबांच्या निर्मोही आणि निरलस स्वभावाचे दर्शन होते.

समाजासाठी, दुसर्‍यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या धरणीमातेने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसर्‍यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आपल्या श्री बैठकीच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना अगोदरच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे. दासबोधाचे निरूपण करता करता भक्तिमार्गाने श्री संप्रदायाने महाराष्ट्राच्या विशेषतः कोकणपट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणावर श्रीसांप्रदायिक तयार केले आणि त्यांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला गती दिली. आपल्या वाडवडिलांचा श्री संप्रदायाचा वारसा आप्पासाहेबांनी अत्यंत समर्थपणे नुसता सांभाळला नव्हे तर वाढवला देखील.

“कोणत्याही प्रसिद्धी आणि अपेक्षेशिवाय सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला इतका मोठा जनसागर उसळला होता.

महाराष्ट्रभूषण पुरस्कार कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी आदल्या रात्रीपासूनच राज्यभरातून अनुयायी खारघरमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे नवी मुंबईतील रेल्वे, बस स्टाॅप परिसरात गर्दी झाली होती. महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि हजारो श्रीसदस्यांच्या मदतीने १५ दिवसांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. ३०६ एकरवर जमलेल्या सुमारे २० लाख श्रीसदस्यांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

परंतु कालच्या या भव्यदिव्य कार्यक्रमात उष्माघाताने झालेल्या १२ श्री सेवकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एक प्रकारे या कार्यक्रमाला गालबोट लागले.आणि लगेच या दुर्दैवी मृत्यूवर किळसवाणे राजकारण सुरू झाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. आणि ते निमित्त साधून पुरोगामी, लिब्रांडू, डावे विचारवंत हिंदू धर्मातील आस्थेच्या प्रतीकांवर प्रश्नचिन्ह उभे करू लागले आहेत. फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आणि हिंदू देशाचा कंड शमवण्यासाठी या दुर्दैवी घटनेच्या आड सकल हिंदू समाजाला व त्याच्या आस्थेला प्रतिकांना बदनाम करण्याचे कुटील षडयंत्र सुरू झाले आहे.

वस्तुस्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊ या…

आरोप होत असल्याप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन खरंच ढिसाळ होतं का?

नाही, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचं ढिसाळ नियोजन अजिबातच नव्हतं. उत्तम नियोजन होतं. या सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचे सुमारे २५० टँकर आणि २१०० नळ बसविण्यात आले होते. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली होती. ६९ रुग्णवाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत होते. ३२ फिरते शौचालये, ४२०० पोर्टेबल शौचालये, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालये देखील बांधण्यात आली होती. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध होती. पार्कीगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. साधारणतः २० लाखाचा जनसागर तेथे उसळेल या अंदाजाने ही पर्याप्त व्यवस्था करण्यात आली होती.

अनेक श्रीसदस्य २ दिवसांपासून तिथे आले होते. सकाळची वेळच बरोबर होती. संध्याकाळची वेळ असती तर पूर्ण दुपारभर बसावे लागले असते. कार्यक्रम संपायला थोडा उशीर झाला, म्हणून ही दुर्घटना घडली असावी. सर्व श्री बैठकांमध्ये आधीच सूचना देण्यात आली होती की की वयोवृध्द, लहान मुलं आणि आजारी श्रीसदस्यांनी कार्यक्रमाला येउ नये. आपली स्वतःची सर्वतोपरी काळजी घेउनच कार्यक्रम स्थळी यावे. प्रत्येक ठिकाणी शासनाला किंवा संस्थेला दोष दिला म्हणजे प्रश्न सुटला असे होत नाही.

मुळातच नियोजन ढिसाळ असते तर चेंगराचेंगरी सारखी दुर्घटना घडायला हवी होती पण ती घडली नाही. त्याअर्थी नियोजन नक्कीच ढिसाळ नव्हते. उष्माघाताचा त्रास ही अकल्पित दुर्घटना होती…

या अपघातामुळे मात्र आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या अनुयायांवर हिंदु धर्मदेष्ट्यांकडून जहरी टीका केली जाऊ लागली आहे. इतक्या लोकांना बोलवायची काय गरज होती ? असा देखील प्रश्न विरोधकांकडून विचारला जाऊ लागला आहे. श्रद्धेला मोल नसते. तिथे आलेला २०-२२ लाखांचा जनसागर हा स्वेच्छेने, आपखुशीने आणि श्रद्धेने आलेला होता. बिर्याणीच्या लालसेने रोजनदारीवर बोलवलेली ती भाड्याची माणसं नव्हती.संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत जमलेला जनसागरातील एकही भक्त उठून गेला नाही. यापेक्षा सद्गुरूंवरच्या निष्ठेचे दुसरे काय उदाहरण द्यावे ?

आपल्याला उन्हात बसावे लागणार याची पूर्ण कल्पना श्री साधकांना होती कारण २०/२२ लाख जनता जनार्दनासाठी मंडप उभारणे निव्वळ अशक्यप्राय होते.

हिंदू किती अजागळ, भोंगळ, बेशिस्त, अंधश्रद्धा पाळणारे आहेत हे मांडण्याचा पुरोगामी लिब्रांडू आणि डाव्यांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ शकतो. किंबहुना तो होणारच. भोळ्या-भाबड्या जनतेला साधुसंत आपल्या मागे फरफटत नेतात असादेखील बेअकली युक्तिवाद या हिंदू अपशकुन्यांकडून केला जाईल. या घटनेच्या निमित्ताने हिंदू धर्म किंवा हिंदू श्रद्धास्थानावर प्रचंड आघात केले जातील. मात्र शिष्याची आपल्या गुरुवरील श्रद्धा, या भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य परंपरा हा या अश्रद्ध पुरोगाम्यांच्या आकलनापलीकडचा विषय आहे. कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे श्री सदस्य असल्यामुळे व आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आपले गुरु मानत असल्यामुळे या पुरोगाम्यांचा अधिकच जळफळाट झाला असावा.केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी याना देण्यात आला त्यामुळे राजकीय विरोधकांचा अधिकच पोटशूळ उठला असावा…

अशा कार्यक्रमासाठी जनतेचा, ( १३ कोटी आकडा सांगितला जात आहे) पैसा खर्च करणे योग्य आहे का ? असा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. पण मुळातच हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत अर्थात जनतेने जनतेसाठीच आयोजित केलेला कार्यक्रम होता. आम्हाला इतकेच विचारायचे की, गेली अनेक वर्षे दरवर्षी दिली जाणारी “हज सबसिडी” हा सुद्धा जनतेचाच पैसा आहे ना? पण तो भारत सरकारचा खर्च, धर्मांध मुस्लिमांचे लांगूलचालन करणाऱ्या या ढोंगी लबाड व दुतोंडी पुरोगाम्यांना कधीच का बरे दिसत नाही?

हिंदू धर्मातील भक्ती संप्रदाय कसा भरकटलेला आहे. एकाच व्यक्तीच्या मागे धावल्याने अनेकांचे नुकसान होऊ शकतं अशी कोल्हेकुई देखील सुरू झाली आहे. पण त्याने सकल हिंदू समाजाचे काहीच बिघडत नाही. अनेक अफजल, औरंग्या आले; त्यांनी आमचा धर्मनाश करण्याचा खूप प्रयत्न केला, अनन्वित अत्याचार केले, हिंदू श्रद्धा स्थानांवर घाणाचे घाव घातले पण भागवत धर्माची पताका आसमंतात फडकतच राहिली कारण भक्तीला मोल नसते.

आता असा आरोप करण्यात येत आहे की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सन्मान सोहळ्याचा राजकीय फायदा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये आम्हाला पडायचे नाही मात्र रायगडचे खासदार (जे आज विरोधी पक्षात आहेत) त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्यक्त केलेले आपले मनोगत, आरोप करणाऱ्यांनी जरूर ऐकावे. (त्याची लिंक येथे दिली आहे.)

याउलट आप्पासाहेब धर्माधिकारी यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” दिल्याने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचीच उंची अधिक वाढली आहे असे आमचे ठाम म्हणणे आहे.

Back to top button