HinduismIslamNews

‘शठं प्रतिशाठ्यम’

हा विद्वेष केवळ छत्रपती संभाजी महाराजांचा नसून खरा द्वेष हिंदू काफिरांचा आहे...छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक हे केवळ निमित्त मात्र आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव (shevgaon) परिसरात छत्रपती संभाजी महाराज(chhatrapati sambhaji maharaj) यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराचा प्रकार घडला.

१४ मे ला रात्री ८ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर अचानक धर्मांध, जिहादी मुस्लिम गटाने जोरदार दगडफेक केली. ठरवून अनेक हिंदू व्यापारांच्या दुकानांना आगी लावण्यात आल्या तसेच हिंदूंच्या अनेक वाहनांना आगी लावण्यात आल्या. गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी तीव्र लाठीमार करत जमावाला पांगविले. दगडफेकीत ४ पोलीस, गृहरक्षक दलाचे ५ जवान जखमी झाले. या प्रकरणी ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतलं आहे तर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तणावाच्या वाढत्या घटना घडत आहेत. श्रीरामपुर, राहुरी, नगर शहर,नगर तालुका यानंतर आता शेवगावमध्ये दगडफेक व जाळपोळीची घटना घडली आहे.

नेमके झाले तरी काय ?

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सायंकाळी शेवगाव शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री ९च्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. याचा राग येऊन मशिदीच्या जवळ उभ्या असलेल्या धर्मांध जिहादी मुस्लिम समाजाच्या जमावाने दगडफेक सुरू केली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

रस्त्यावर दगड, विटांचा खच

या हाणामारीच्या घटनेनंतर धर्मांध, जिहादी जमावाने शहरातील हिंदूंच्या विविध दुकानांवर व फलकांवर दगडफेक केली. त्यामुळे रस्त्यावर दगड, विटांचा व फरशांचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला त्वरित आपल्या पथकासह रात्रीच शेवगाव शहरात दाखल झाले होते. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

आपबिती..

दंगलखाेरांनी साेबत दगड आणले होते. हातात शस्त्रे होती. फटाके फाेडत इंधनाचे कापडी बाेळे फेकले. आमच्या घराच्या दाराला लाथा मारल्या.. घराच्या मागील बाजूने घुसण्याचा प्रयत्न केला… मात्र, सुदैवाने यश आले नाही… आम्ही दार बंद करूनच बसलाे… खिडकीच्या फटीतून डाेकावून बाहेर पाहिल्यानंतर बाहेरील हिंसेने आमचा थरकाप उडला… अशा शब्दांत शेवगाव शहरातील हिंदू दंगल पीडितांनी आपली आपबीती सांगितली. धर्मांध जिहादी दंगलखाेरांनी निर्माण केलेली दहशत सांगतांना त्या हिंदूंच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसून येत हाेती.

साेबत इंधनाचे कॅनस् होते…

धर्मांध जिहादी(jihadi) मुस्लिम दंगलखाेरांच्या साेबत इंधनाचे कॅनस् होते असेही एका युवकाने सांगितले. वाहनांवर इंधन टाकून पेटवून देण्यात येत हाेते. वाहनाने पेट घेतल्यानंतर पेट्रोल टँकमधील इंधनाने वाहनाला लागलेली आग आणखीच भडकत हाेती. परिणामी काही मिनिटांतच वाहन खाक हाेत हाेते, असेही युवक म्हणाला.

व्यापाऱ्यांची ‘बेमुदत बंदची हाक’

शेवगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी घडलेल्या दंगलीनंतर व्यापारी संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या पूर्व नियोजित दंगलीच्या सूत्रधारांना जोपर्यंत अटक केली जात नाही, तोपर्यंत दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी एकमुखाने घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या या बेमुदत बंदला समस्त शेवगाववासियांनी एकमुखाने आणि एकदिलाने पाठिंबा दिला आहे. भारतात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तर काही भारतीयांना राग येण्याचे कारणच काय ? हा शेवगावच्या सकल हिंदू समाजाचा रोकडा सवाल आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे शहरात स्मशान शांतता पसरली आहे. यावरून हिंदू समाजाच्या वज्र निर्धाराची कल्पना यावी.सकल हिंदू समाजाच्या या वज्र निर्धाराने एरव्ही हिंदूंवर अत्याचार झाले की सुस्त व निष्क्रिय असलेले प्रशासन तसेच पोलीस खाते खडबडून जागे झाले आहे. शेवगाव दंगलीचे सूत्रधार लवकरच गजाआड झालेले दिसतील. आणि याचे श्रेय शेवगाव च्या सकल हिंदू समाजाच्या “बेमुदत बंदच्या “ वज्र निर्धारालाच द्यावे लागेल.

यानिमित्ताने हिंदू समाज आता “अब इस देश में हिंदू मार नही खायेगा” या भूमिकेवर आला आहे हे स्पष्टपणे दिसते.

शेवगावातील व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदमुळे दंगलखोरांच्या सगळ्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत. सुक्या बरोबर ओले जळत असेल तर जळू देत पण ‘शठं प्रतिशाठ्यम’ या न्यायाने भविष्यात धर्मांध मुस्लिम आक्रमक न होण्यासाठी शेवगाच्या व्यापाऱ्यांनी जमालगोटा दिला आहे. देशातील अन्य दंगलग्रस्त भागातील हिंदूंसाठी हा एक पथदर्शक व आदर्शवत निर्णय आहे. शेवगावच्या हिंदू जनतेने व्यापाऱ्यांच्या या निर्णयाला एक दिलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अशाच प्रकारे सकल हिंदू समाज जर एकवटत गेला तर धर्मांध मुस्लिमांची आक्रमकता जागच्या जागी लुळी पडल्याशिवाय राहणार नाही.

गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात विविध ठिकाणी शोभायात्रेंवर दगडफेकीचे, जाळपोळीचे प्रकार वाढल्याचे निदर्शनात येत आहे. बंगालमध्ये दुर्गा पुजा दरम्यान झालेला हिंसाचार असो की मालवणी मध्ये रामनवमीच्या दिवशी रामभक्तांवर झालेली दगडफेक असो… इतकेच काय हनुमान जयंतीला हैदराबाद मध्ये झालेली हिंदू द्वेषी घोषणाबाजी असो यावरून इतके स्पष्ट आहे की हिंदू एकत्र आल्यावर धर्मांध जिहादी मुस्लिमांची पाचावर धारण बसते.

समोरासमोर येऊन दोन हात करायला धर्मांध मुस्लिम कायमच वचकून असतात म्हणूनच मशिदी अडून दगडफेक करण्यातच धन्यता मानतात आणि वर “इस्लाम खतरे मे” (victim card) बोंबलायला मोकळे होतात.

वर्षानुवर्षे निद्रिस्त असलेला सकल हिंदू समाज आता हळूहळू जागा होतोय त्याला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव व्हायला लागली आहे. म्हणूनच सकल हिंदू मोर्चाच्या रूपाने तो आता रस्त्यावर येऊन आपल्या न्याय हक्कासाठी ठामपणे संघर्ष करीत आहे.

शेवटी इतकच म्हणू इच्छितो की,

हिंदू ऐक्य घोष हा निनादु द्या दिगंतरी
जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी ॥

Back to top button