CultureHinduismNewsSpecial Day

संत नरहरी महाराजांची भावभक्ती..

sant shiromani narahari sonar maharaj

महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे तेराव्या शतकात वारकरी संप्रदायामध्ये संताची मांदियाळी उदयास आली आहे. या सर्व संतांनी आपल्या अभंगवाणीद्वारे समाजाला प्रबोधन करण्याचे महान कार्य केले असून त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्राला साहित्यिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे संत नरहरी महाराज होत संत नरहरी महाराजांच्या जन्माचा उल्लेख जरी आढळत नसला तरी समाधी काळ हा शके १२३५ माणजेच इ.स. १३१३ मधील माघ वैद्य तृतीया असा सांगितला जातो वडील श्री. दीनानाथ हे औरंगाबादजवळील देवगिरी या ठिकाणी राहत असत तेथे त्यांचा सराफाचा सोन्याचांदीचा व्यवसाय होता. कालांतराने श्री. नरहरी महाराज पंढरीला येऊन राहिले व तेथे आपल्या वडिलांचा सोन्याचांदीचा सराफाचा व्यवसाय सुरू केला.

संत नरहरी महाराजांचे सद्‌गुरु है गुरु गैबीनाथ असून ते नाथपंथी म्हणजेच शिवपंथी होते. आपल्या गुरुविषयी त्यांच्या मनात नितांत आदर व प्रेम भक्तिभाव दिसून येतो ते म्हणतात,

उमज पडे ना हो काही। मस्तक सद्गुरुचे पाई ।।

सद्गुरु नाम हे अमृत। नरहरी गाये हृदयात ।।

आपल्या सद्गुरुला मनोभावे शरण जाणे आवश्यक असते सद्गुरुये नाम है अमृत असून त्यांच्याद्वारे आपल्या भक्तांचा उध्दार होत असतो म्हणून संत नरहरी महाराज आपल्या सद्गुरुचे चितन सदैव मनात करीत असतात.

संत नरहरी महाराज आपल्या सोन्याचांदीचा व्यवसाय प्रामाणिकपणे करीत असतांना पंढरीच्या विठोबाच्या कमरेचा करदोडा बनविण्यासाठी विठोबाच्या कमरेचे माप घेतांना त्यांना ईश्वरीय एकत्वाची अनुभूती विठोबाविषयी आलो. शिव आणि विठ्ठल म्हणजेच हर आणि हरी हे दोनही एकच असल्याचा अनुभव आला. तेव्हापासून त्यांच्या मनात विठोबाबद्दल प्रेमभक्तीभाव निर्माण झाला व विठोबाचे परमभक्त झालेत व त्यांनी भावोत्कट अभंग रचना केली

आपल्या सराफाच्या व्यवसायात असणारे साहित्य, साधने म्हणजेच त्यामधील प्रतिमांचा परमार्थाशी समन्वय साधुन समाज प्रबोधनात्मक महान कार्य केलेले आहे. ते म्हणतात,

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।

देह बागेश्वरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।।

त्रिगुणाची करुनी मुस । आत ओतीले ब्रह्मरस ।।

जीवशिव करुनी फुंकी । रात्रदिवस ठोकाठोकी ।।

विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।।

नरहरी सोनार हरीचा दास। भजन करी रात्रंदिवस ।।

ईश्वरा/ पांडुरंगा मी आपला भाविक भक्त असून मला सोनार जातीचा असल्याचा सार्थ अभिमान आहे. माझी सोनारकी ही प्रेमभाव भक्ती, आध्यात्मिक स्वरूपाची आहे कारण मी आपला विठ्ठल नामाचा व्यवहार करीत आहे/करणार आहे. या ठिकाणी “नाम” आणि “व्यवहार” हे दोन शब्द व्यापक अर्थाने महाराजांनी वापरली आहेत. नाम हे सर्वनाम असून सर्वरूप आहे दिसणाऱ्या व न दिसणान्या म्हणजेच दृश्य व अदृश्य अशा दोन्ही स्वरूपात नामाचा अंतर्भाव असतो.

ज्ञान आकलने म्हणजे ज्ञान होणे होय, अध्यात्मशास्त्रात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्मानुभूती होय ‘व्यवहार’ या शब्दाचा अर्थ सोन्याचांदीचा व्यवहार करणे हा प्रापंचिक अर्थ होय ईश्वराच्या भावभक्तीचा व्यवहार हा परमार्थिक अर्थ होय, प्रापंचिक व्यवहारात नफा तोट्याचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु शुध्दभाव भक्तीद्वारे प्राप्त होणारा आत्मिक आनंद, सत्चित आनंद म्हणजेच सच्चिदानंद हा परमार्थिक नफा होय.

आपल्या व्यवसायामधील प्रतिमांबा वापर करताना मानवी देह हो सोनाराचे बागेश्वरी म्हणजेच शेगडी होय, या देहामधील अंतरात्मा/जीवात्मा हे सोने आहे. मानवी देहास शेगडी व अंतरात्म्यास सोने ही उपमा या ठिकाणी वापरली आहे सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा रस टाकण्यासाठी आठणी म्हणजे मूस/साचा असून या मुशीत ब्रम्हरस ओतले आहे.

मानवी स्वभाव हा या तीन गुणांनुसार असतो. ज्या गुणांचा प्रभाव अधिक तसा मानवी स्वभाव सात्विक, राजस व तामस बनतो. त्यानुसार तो कर्मे करीत असतो. अविनाशी असणारे ब्रम्हतत्व या मानवी जीवनात दिसून येते आपला जीव हा शिवाकडून आलेला असतो. या संसारात आपत्या जीवाच्या आधारे सर्वकाही संसारामधील कार्य, धडपड चालू असते. जीवन जगत असतांना माणसाला सद्विवेकी बुध्दीचा स्विकार करावा लागून त्याद्वारे कामक्रोधाचा नायनाट करावा लागतो. संत नरहरी महाराज है विठोबाचे निष्ठावंत भाविकभक्त असल्याने विठोबाचे दास्यत्व त्यांनी स्वीकारले असून सदैव अहोरात्र भजन करीत आहेत.

पढरी नगरी ही वैकुंठभूमी पाडुरंगाची असून या पंढरीला नित्यनेमाने वारकरी आषाढी-कार्तिकी या या महापर्वावर येत असल्याचे महाराज सांगतात. ते म्हणतात,

पंढरी नगरी दैवत श्रीहरी। जाती वारकरी व्रत नेमे ।।

आषाढी कार्तिकी महा पर्ने थोर । नामाचा गजर करीती तेथे ।।

साधुसंत थोर पताकांचे भार। मुखी तो उच्चार नामामृत ।।

आनंदाचा केला गोपाळकाला। हृदयी बिंबवला नरहरी ।।

पंढरी नगरी ही श्रीहरी च्या नावाने ओळखल्या जाते. या ठिकाणी विविध भागातून अनेक वारकरी हे नित्यनेमाने आषाढी व कार्तिकी यात्रेला न चुकता येत असतात. वारकन्यांसाठी ही यात्रा माणजे महापर्व ठरते. या ठिकाणी विठोबाच्या नामाचा गजर मोठया प्रेमाने, आनंदाने व भावभक्तीने करतांना दिसतात, साधुसंत जन आपल्या खांद्यांवर पताकांचे भार घेऊन आपल्या मुखातून अमृतसमान असलेल्या विठोबाच्या नामाचा उच्चार करीत असतात, आषाढी व कार्तिकीचा दुसन्या दिवशी मोठ्या आनंदाने सर्वजण गोपाळकाला करतात, असा हा पाडुरंग माझ्या हृदयात बिबला असल्याचे महाराज सांगतात.

नाम हे फुकाचे फुकाचे । देवा पंढरीरायाचे ।।

नाम अमृत हे सार । हृदय जपा निरंतर ।।

नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचे आगर ।।

नाम सर्वांमध्ये सारं । नरहरी जपे निरंतर ।।

विठोबाच्या नामासाठी कोणतेही मूल्य द्यावे लागत नाही, कारण ते निशुल्क आहे म्हणजेच फुकटचे आहे ईश्वराचे नाम है अमृताचे सार आहे. माणून आपल्या हृदयात निरंतर जपत राहावे, पांडुरंग हा प्रेम सुखाचा आगार महणजे कोठार आहे ते प्रेम सुख त्यांच्या नामामुळे प्राप्त होत असते. असे साराचे सार संतांचे माहेर असणारे नाम मी सदैव निरंतर जपत असल्याचे संत नरहरी महाराज सांगतात

प्रारब्धाची गती ही निराळी असुन माणसाने जीवन जगतांना प्रत्येक कर्म विचारपूर्वक व सद्विवेक बुध्दीने करावे, असे महाराज सांगतात.

प्रारब्धाची गती । कदाकाळी न सोडीती ।।

जे जे कर्माचे फळ । तेथे भोगावे सकळ ।।

ज्याचे बीज पेरियले । त्याचे त्यास फळ आले ।।

ज्याने जैसे आचारीने । तैसे त्याच्या फळा आले ।।

नरहरी म्हणे नाम थोर । नाम साराहूनी सार ।।

माणूस आपल्या प्रारब्धानुसार जीवन जगत असतो की जीवनात येणारे सुख दुःख हे सर्वकाही प्रारब्धाच्या अधीन असते. माणसाचे कर्म जशा प्रकारचे असतात तसे पुण्यकर्म आणि पापकर्म म्हणजेच चांगले कर्म आणि वाईट कर्मानुसार प्रारब्ध तयार होते. पुण्य कर्माचे चांगले फळ व पाप कर्माचे वाईट फळ हे त्यानुसार माणसास भोगावे लागतात. आपण जशाप्रकारे बीज पेरीत असतो तशा प्रकारचे त्या बीजाला फळ लागते. जशा प्रकारचे माणसाचे आचरण असेल, भविष्यात त्यानुसार फळ प्राप्त होत असते. संत नरहरी महाराज सांगतात, पांडुरंगाचे नाम सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असून ते साराचे सार आहे.

मानवी देह हा अष्टधा प्रकृतीचा असतो. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पाच तत्वे आणि रज, तग आणि सत्व है तीन गुण असे एकूण आठ तत्वानुसार मानत्ती देह बनलेला असतो, ते म्हणतात,

शरीराबी होय माती । कोणी न येती सांगाती ।।

सारी अवघे कामे खोटी । अंती जाणे मसणवटी ।।

गोत घरे टाकुनी सारी । शेवटी गावाचे बाहेरी ।।

ऐसे स्वप्नवत असार । नरहरी जोडी तसे कर ।।

मानवी शरीर हे नाशिवंत आहे मृत्यू हा एक दिवस येणार आहे पण केव्हा व कधी येणार हे सांगता येत नाही शेवटी या शरीराची माती होऊन जाते आपली बायकापोर, सगेसोयरे, इष्टमित्र तसेच साधनसामुग्री, संपत्ती वैभव यापैकी आपल्यासोबत काहीही येत नाही. मानवी जीवनात आल्यानंतर या संसारात सतत धडपड, उलथापालथ केली तरी ती सर्व वायफळ ठरते. संसार हा मृगजळासारखा असतो एक दिवस सर्वांना हे जग सोडून स्मशानात जावे लागते. येथे आपले काहीही उपाय चालत नाही. आपले जीवन स्वप्नासारखे असते. स्वप्नात घडणाऱ्या घटना व प्रसंग सर्व दृष्य हे वास्तवात नसते असे संत नरहरी महाराज विनम्रपणे हात जोडून सागतात

संपूर्ण सृष्टीमधील चराबरात पांडुरंगाचे अस्तित्व असल्याचे प्रतिपादन करून प्रत्येक अणुरेणूत ईश्वरीय तत्त्व दिसून येत असल्याचे सांगतात.

जग हे अवघे सारे ब्रारूप। सर्वाभूती एक पांडुरंग ।।

अनुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेले। सर्वा घटी राहिले अखंडित ।।

भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मी खेळे अखंडित ।।

अखंडित वस्तू हृदयी बिंबली । गुरुकृपे पाही नरहरी ।।

या संपूर्ण जगामध्ये ईश्वरतत्व म्हणजेच ब्रम्हतत्व हे अखंडपणे व्यापलेले आहे. त्यामध्ये कधीही खंड पडत नसून ते अखंडपणे अस्तित्वात असते या संसारात संपूर्ण मायाजाळ असून मायाजाळाच्या प्रभावाने माणूस हा भ्रमिष्ट होऊन जातो. त्याला काहीही सुचत नाही. संसारामधील माया ही खरी वाटते. या मायेचा नाश होण्यास भगवताला पांडुरंगाला काया, बाबा व मनाने समर्पित व्हावे लागते. आपल्या हृदयात सदैव त्या विठोबाचे नामस्मरण करावे लागते, तो विठोबा अखंडपणे मनात विचल्यास मायेचा नाश होतो. सद्गुरूच्या कृपेने हे सर्व काही शक्य होत असून परब्रम्हाची ओळख होत असल्याचे महाराज सांगतात.

संत नरहरी महाराजांच्या पावन स्मृतीला व त्यांच्या समाज प्रबोधनात्मक अभंगवाणीला मी शतशः नमन करीत आहे.

लेखक :- डॉ. शांताराम बुटे..

Back to top button