News

रवींद्र वैद्य व स्मिता घैसास यांची एमएसएमईच्या केंद्रीय बोर्डावर नियुक्ती

मुंबई, दि.१३ फेब्रुवारी(वि.सं.कें.) –  केंद्रीय सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MSME Board वर महाराष्ट्रातून प्रसिध्द उदयोजक रवींद्र वैद्य (औरंगाबाद) व स्मिता घैसास (पुणे)यांची नियुक्ति करण्यात आली आहे. रवींद्र वैद्य हे श्री गणेश प्रेस एंड कोट प्रा ली चे एम डी  तर स्मिता घैसास या मे.मिनीलेक ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज च्या एम.डी आहेत. उदयोगक्षेत्रात दोघांचेही विशेष नाव असून अनेक सामाजिक संघटनेत योगदानही आहे .

सध्या रवींद्र वैद्य हे लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तर स्मिता घैसास या अ.भा.लघु उद्योग भारतीच्या उपाध्यक्ष आहेत.महाराष्ट्रातील उदयोजकांच्या अनेक समस्या या नियुक्तीमुळे केंद्र सरकारपर्यंत पोहोचतील असा विश्वासअनेक उदयोजकांनी व्यक्त केला आहे.व संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक उदयोजकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच महात्मा गांधी इन्स्टीट्यूट  फाॅर रूरल ईंडस्ट्रीयलायझेशन  (MGIRI)या केंद्र सरकारच्या संस्थेवर महाराष्ट्रातील वर्धा येथील उदयोजक शशी भूषण  वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्या अ. भा. लघुउद्योग भारती चे उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील उदयोजक दुष्यंत आठवले यांची केंद्र सरकार MSME अंतर्गत एससी-एसटी माॅनीटरींग समितीच्या सदस्यपदी नियुक्ति करणयात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button