NewsRSS

‘भविष्य का भारत’च्या उर्दू अनुवादाचे सोमवारी प्रकाशन

नवी दिल्ली, दि. ३१ मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ‘भविष्य का भारत’ या व्याख्यानमालेच्या पुस्तकाचे उर्दूअनुवादाचे प्रकाशन राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्या हस्ते हे प्रकाशन ५ एप्रिल रोजी, नवी दिल्ली येथे होणार आहे.

‘मुस्तकबिल का भारत’ असे या पुस्तकाचे नाव असून परिषदेच्या डॉ. शेख अकिल यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशातील बुद्धिजीवींसोबत २०१८ साली विज्ञान भवन येथे ‘भारताचे भविष्य – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन‘ या विषयावर संवाद साधला होता. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांचा उहापोह तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन सरसघचालकांनी केले होते. या व्याख्यानमालेचे गेल्या तीन वर्षांत अनेक भाषांमध्ये रुपांतर झाले आहे. आता उर्दूमध्येही हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे.

**

Back to top button