NewsReligion

बौद्ध विहाराच्या जागेवर इलेक्ट्रिक डीपी करण्यास विरोध केला म्हणून बौद्ध कुटुंबावर हल्ला

औरंगाबाद, दि. २५ मे : शहरातील वाळूज भागात बौद्ध विहाराच्या जागेवर इलेक्ट्रिक डीपी करण्यास विरोध केला म्हणून त्या परिसरातील २० ते २५ जणांच्या जमावाने बौद्ध कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १६ मे रोजी ही घटना घडली असून आबेद शेख सह दहा जणांवर अ‍ॅट्रोसिटीसह गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप मुख्य आरोपींना अटक न झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

येथील परिसराच्या बाजूलाच एक बुद्ध विहार आहे. तो हटवून इलेक्ट्रीक डीपी उभारावी, असे वस्तीतील आबेद शेखसह काही जणांचे म्हणणे होते. त्याला पीडित कुटुंबाने विरोध केला म्हणून जातीय शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करीत लाकडी फळीने मारहाण केली. तसेच घरातील महिलांनी प्रतिकार केला असता त्यांनाही मारहाण केल्याची तक्रार पीडितांनी केली आहे.
 
पीडित कुटूंबातील महिलेने व्यथा मांडताना सांगितले की, “आम्ही प्रचंड दहशतीत आहोत, महिला बाहेर जाण्यास घाबरतात. पोलिसांनी कायदासुवस्था लक्षात घेता सध्या पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. पण आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.”
 
या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित कुटूंबियांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे संदीप गुरम, पोलीस ठाणे अंमलदार, वाळूज यांनी सांगितले.

Back to top button