HinduismOpinion

छत्रपती शिवाजीमहाराजांकडुन ख्रिस्ती पाद्र्यांचा शिरच्छेद

छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – ७

गोवा म्हणजे आमची पवित्र भूमी! याच भूमीत कधीकाळी कंदब,सातवाहन घराण्यांनी राज्य केले. गोवा म्हणजे मौजमजा करण्याचे मुक्त अभयारण्य नव्हे,तर ती श्रीशिव-शंभूछत्रपतींच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे.

इसवी सन 1497 साली पोर्तुगिज भारतात आले आणि इसवी सन 1510 साली पोर्तुगिजांनी गोवा ताब्यात घेतला.
त्यानंतर 6 मे , 1542 रोजी सेंट झेविअर गोव्यात आला. सेंट Saint या शब्दाचा मराठी अनुवाद “संत” असा केला जातो. पण संत आणि Saint या दोन शब्दात धरती-आकाशाइतका फरक आहे. संत म्हणजे करुणा,संत म्हणजे त्याग, संत म्हणजे रंजल्या,गांजल्यांना “आपुले” म्हणणारे पण सेंट झेविअर असा संत नव्हता. त्याने गोव्यात इन्क्विझिशन सुरु करण्याची मागणी केली. इन्क्विझिशन म्हणजेच पवित्र न्यायसभा. ही न्यायसभा नसून अन्यायसभा होती.
गोव्यातील जनतेवर अमानुष शब्दही फिका ठरावा इतके अत्याचार सुरु झाले. हिंदुना बाटवून ख्रिश्चन करणे नित्याचेच झाले होते.

गोव्याच्या व्हाॅईसराॅयने एकदा असा हुकुम काढला की, गोव्यात फक्त रोमन कॅथाॅलिक ख्रिश्चनच राहतील. जर हिंदुंना इथे रहायचे असेल तर त्यांनी ख्रिश्चनधर्माचा स्वीकार करावा ,अन्यथा आपले घरदार,शेतीवाडी सोडुन गोवे सोडुन निघुन जावे. गोव्यातील हिंदुनी या प्रकरणाची तक्रार शिवाजीमहाराजांकडे केली. हे ऐकल्यानंतर महाराज संतप्त झाले,त्यांनी तिसवाडीतील एक गावच उचलुन आणायला सांगितले.मराठ्यांनी सुमारे दीड हजार लोकांना पकडून महाराजांसमोर हजर केले,त्यात चार जेझुईट ख्रिश्चन पाद्री होते. हा अन्यायकारक हुकुम काढण्यात या चौघांचाही सहभाग होता. त्या चारही पाद्र्यांना समोर बोलावून महाराज त्यांना म्हणाले “तुम्ही आता आमच्या भुमीवर उभे आहात.आमचा धर्म स्वीकारणार का?पाद्र्यांनी त्याला नकार देताच त्यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश महाराजांनी दिला व त्यांची मस्तके गोव्याच्या व्हाॅईसराॅयकडे पाठवून दिली. या घटनेने भयभीत होऊन व्हाॅईसराॅयने आपला हिंदुविरुध्दचा हुकूम मागे घेतला.

शिवाजीमहाराजांनी बार्देशवर स्वारी केली,त्याला हिंदुचा छळ हेच मुख्य कारण होते. वरील घटना घडली त्यावेळी इंग्रजांचा एक वकील गोव्यात होता,त्याने ती हकीकत दि.30 नोव्हेंबर 1667 रोजी लिहीलेल्या पत्रात ईस्ट इंडिया कंपनीला कळवली आहे.

छ.शिवाजीमहाराज हे हिंदुधर्मरक्षक होते.प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणार्या या जाणत्या राजाला पोर्तुगिजांचा प्रजेवरील अन्याय सहन होणे शक्यच नव्हते. गोव्यात हिंदु जनतेवर अन्याय सहन केला जाणार नाही,असा इशाराच त्यांनी या कृतीतून पोर्तुगिजांना दिला होता.


– रवींद्र गणेश सासमकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button