CultureNewsSpecial Day

११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन… १९९८च्या पोखरण अणुस्फोटाला मानवंदना

आजच्या दिवशी ११ मे १९९८ रोजी भारत सरकारने पोखरण, राजस्थान येथे यशस्वी आण्विक परीक्षा केली. हा दिवस इतिहासात ‘पोखरण अणु चाचणी’ (pokhran nuclear test) आणि अंतराळातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो.

  • पोखरण येथील अणु चाचणी यशानंतर सन १९९९ पासून देशात ११ मे हा ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ (national technology day) म्हणून साजरा केला जातो.
  • ११ मे १९९८ हा दिवस म्हणजे भारताने पोखरण मध्ये केलेल्या ५ अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता.
  • याच दिवशी भारताने ‘ऑपरेशन शक्ती’(operation shakti) या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला आव्हान देत अणूबॉम्बची चाचणी करत जगात भारताचा दबदबा वाढवला होता.
  • तब्बल ५८ KG टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित करत जगाला धक्का दिला.
  • एकदा अमेरिकेच्या दबावाखाली भारताला अणूचाचणी पुढे ढकलावी लागल्याने मग दुसऱ्यांदा भारताने कुठलीही कसर ने सोडता अतिशय गुप्तपणे ही चाचणी केली.
  • दरम्यान डॉ. कलाम आणि त्यांची टीमने अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट देत अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. अखेर यानंतर अणुचाचणी यशस्वी झाली.
  • नंतर भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेले पहिले स्वदेशी विमान ‘हंसा-३’ ची यशस्वी चाचणी केली.
  • डीआरडीओने ‘त्रिशूल‘ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचे महत्त्व आणखी वाढवले.

एकंदरीत विचार करता भारताने तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीची साक्ष देणारा आजचा दिवस असल्याने येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रगती करण्याची प्रेरणा देण्यासाठी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून पाळण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी( atal bihari vajpayee) यांनी केली होती.

Back to top button