News

फुटबॉलच्या मैदानावर आयसिसच्या दहशतवाद्यांकडून ५० हून अधिक जणांचा शिरच्छेद

नवी दिल्ली, दि. ११ नोव्हेंबर : मोझाम्बिकच्या काबो डेलगाडो प्रांतातील फुटबॉलच्या मैदानावर आयसिसच्या दहशतवाद्यांनी ५० जणांचा शिरच्छेद केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दहशतवादी केवळ शिरच्छेद करून थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या मृतदेहाचे तुकडेही केले.

मिळालेल्या माहितीनुसार, काबो डेलगाडो प्रांतात बेकारी आणि गरीबीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. या समस्येचा फायदा घेत आयसिसचे दहशतवादी काबो डेलगाडो प्रांतात हिंसेचे थैमान घालत आहेत.  तसेच मोझाम्बिकमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी आयसिसचे दहशतवादी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आयसिसच्या दहशतवाद्यांनी ‘अल्ला हू अकबर’ असे म्हणत मोझाम्बिकच्या काबो डेलगाडो प्रांतात काही गावांवर छापा टाकला. अनेकांना शस्त्रांचा धाक दाखवून पळवून नेले. यापैकी ५० हून अधिक जणांना फुटबॉल मैदानावर ठार केले.  

दहशतवाद्यांच्या हिंसक थैमानामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घरदार सोडून सुरक्षित ठिकाणाच्या दिशेने पलायन सुरू केले आहे. आयसिसमध्ये ब्रेन वॉश करुन दहशतवाद्यांना एकाच धर्माचे विशिष्ट विचार शिकवले जात आहेत. यानंतर प्रशिक्षण देऊन आणि शस्त्र हाती सोपवून हिंसक कारवायांसाठी नियुक्त केले जात आहे.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button