National SecurityNews

पाकिस्तानचा दहशतवाद्यांना शस्त्रे पुरविण्याचा नवा मार्ग उघड

नवी दिल्ली, दि. १८ डिसेंबर –भारतीय लष्कराने घुसखोरी विरोधी यंत्रणा तयार केल्याने पाकिस्तानला हिंसात्मक घटनांमध्ये वाढ करण्यासाठी आपले दहशतवादी तसेच शस्त्रास्त्रे भारताच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये घुसवणे कठीण झाले आहे. पाकिस्तानी आयएसआयने जास्तीतजास्त शस्त्रधारी घुसखोरांना काश्मिरात घुसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयएसआयने जम्मूकाश्मिरमध्ये शस्त्रहल्ला करण्याचा कट रचल्याचे भारतीय लष्कर व गुप्तचर संस्थांच्या लक्षात आले आहे. त्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविण्याचा एक नवा मार्ग अनुसरल्याचेही उघड झाले आहे.

आयएसआय ही संघटना बर्फवृष्टी आणि गोळीबाराच्या घटनांदरम्यान दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसवते. भारतीय सुरक्षा दले ही नियंत्रण रेषेवर एलओसीवर घुसखोर निशस्त्र आढळला तर त्याच्यावर गोळ्या झाडत नाहीत याचा आयएसआयने अभ्यास केला आहे. त्यामुळे घुसखोर पडकले जाऊ नयेत म्हणून निशस्त्र घुसखोरांना हद्दीत घुसवायचे आणि ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांस्त्रे पाठवाची ही त्यांची मोडस ऑपरेंडी अर्थात कार्यपद्धती असते. चीनमधील चीन पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर अर्थात सीपेकशी संबंधित एका कंपनीकडून मनुष्यविरहित ड्रोन मोठ्या लक्षणीय संख्येत विकत घेतल्याचेही उघड झाले आहे. भारतीय सुरक्षा दलांनी चीनमधील नोरिन्को कंपनीने तयार केलेल्या बंदुका सीपेक करारानंतर पाकिस्तानी लष्कराला भेट स्वरुपात देण्यात आल्याचेही उघडकीस आणले आहे. चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे भेट देणे हे विचार करायला लावणारे आहे.

गेल्या एका वर्षात घुसखोरीच्या काही घटनांची उदाहरण खालीलप्रमाणे –

२२-२३ सप्टेंबर, महिंद्रा बोलेरोतून जम्मूकडून दक्षिण काश्मीरकडे जाणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चीनी बनावटीचे नोरिन्को कंपनीची बंदूक होती. एके४७च्या चार बंदुका आणि तीन ग्रेनेड्स हस्तगत करण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून सांबा येथे ही शस्त्रास्त्रे उतरवण्यात आली होती.   

२३ सप्टेंबर रोजी फिरोझपूर मामदोत सेक्टरमध्ये पाच एके४७ आणि दोन पिस्तुले सापडली

२२ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी ड्रोनच्या माध्यमातून अखनून क्षेत्रात उतरवण्यात आलेल्या दोन एके ४७ बंदुका, एक पिस्तुल, तीन एके मॅगेझिन जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले.

१८ सप्टेंबर रोजी एके५६ रायफल, दोन पिस्तुले आणि चार ग्रेनेड राजोरी सेक्टरमधून ताब्यात घेण्यात आले. ही शस्त्रास्त्रेदेखील पाकिस्तानी ड्रोनच्या माध्यमातून उतरविण्यात आल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.

१४ सप्टेंबर रोजी गुरेज सेक्टरमध्ये पाकव्याप्त काश्मीर क्षेत्रातून भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याच्या घुसखोर दहशतवाद्यांच्या समुहाला तिथेच रोखण्यात आले. त्यांनी किशनगंगा नदीत उडी मारण्यापूर्वी आपल्या पाठीवरील सॅक तिथेच सोडल्या. या सॅकमध्ये नोरिन्को क्यूबीझेड९५ रायफल आणि अन्य काही शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली.

१२ सप्टेंबर रोजी बीएसएफच्या जवानांनी एके४७ रायफल, एम१६ रायफल आणि दोन पिस्तुले फिरोजपूर कुडियन येथे हस्तगत केली.

८ सप्टेंबर रोजी एक एके४७, एम४ रायफल, दोन मॅगझिन, सहा पिस्तुले आयबी सेक्टर सेक्टरमधून ताब्यात घेतली

३० ऑगस्ट रोजी एलओसीजवळ रामपूर येथे एके४७ रायफक, दोन पिस्तुले आणि २९ ग्रेनेड्स हस्तगत करण्यात आली. याच भागातून २२ जुलै रोजी एक एके४७ रायफल, पाच पिस्तुले आणि २४ ग्रेनेड्स हस्तगत करण्यात आली होती. तत्पूर्वी जानेवारीपासून सहा वेळा अशाच पद्धतीने उरी, मच्छील, केरन तसेच कथुआ येथून शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आली होती.

**

Back to top button