NewsPolitics

जय श्रीराम आणि छ. शिवाजी महाराजांचा गौरव करणारे फलक झळकविल्याबद्दल केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना अटक

त्रिवेंद्रम, दि. १८ डिसेंबर –  नुकत्याच झालेल्या पलक्कड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करताना जय श्रीराम लिहिलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले फलक झळकाविल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजपाने पलक्कड महापालिकेसह दोन महापालिकांमध्ये तसेच २४ ग्रामपंचायतीत विजय प्राप्त केला आहे. या विजयाचा आनंदोत्व साजरा करताना जय श्रीराम लिहिलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले फलक पलक्कड नगरपालिकेच्या इमारतीवर झळकविण्यात आले. पालिकेच्या सचिवांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधितांवर भादसं कलम यु/एस १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button