CultureRSS

प्रताप गौरव केंद्र हे देशभक्तीचे प्रेरणा केंद्र – दत्तात्रेय होसबाळे

उदयपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी महाराणा प्रताप जयंतीच्या पूर्वसंध्येला, ‘महाराणा प्रताप जयंती समारंभ २०२१’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. येथील ‘राष्ट्रीय तीर्थ’ आयोजित या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा शनिवार, १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. यावेळी प्रताप गौरव केंद्रावर तयार करण्यात आलेल्या लघुपटाचेही लोकार्पणही होसबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी होसबाळे म्हणाले की, उदयपूर येथील प्रताप गौरव केंद्र राष्ट्रीय तीर्थ हे देशभक्तीचे प्रेरणा केंद्र आहे. हे केंद्र राष्ट्रीय धर्म, संस्कृती आणि इतिहासबोधाचे तीर्थ आहे. राष्ट्रीय तीर्थ हे नाव या केंद्राने सार्थ केले आहे. उदयपूर वीर शिरोमणी महाराणा प्रताप समितीने भव्य कलात्मक स्मारकाची कल्पना साकारली व भावी पिढ्यांनी आपले जीवन पवित्र करावे यासाठी ते देशाच्या जनतेस समर्पित केले. देश निश्चितच वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्याप्रती कृतज्ञ राहील. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर एक प्रेरक स्मारक केंद्र उभारून तीर्थाने राष्ट्रीय कार्य केले आहे.  

पुढे ते म्हणाले की, महाराणा प्रताप यांच्या नामोच्चाराने वा स्मरणाने आपल्या अंतर्मनात देशभक्तीचे दीप उजळतात. त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर येताच सर्वसामान्य व्यक्ती उत्साहपूर्ण, शौर्यपूर्ण रीतीने उभी राहते. असे अत्यंत स्फूर्तीदायक व्यक्तिमत्त्व, त्यांचे शरीरसौष्ठव, जीवनालेख सांगणारी मेवाड राणाची कहाणी ऐकताना अंगावर काटा येतो. भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप यांना अनन्यसाधारण स्थान आहे. केवळ भारतातच नव्हे तर विश्वभरातील वीरांच्या शृंखलेत महाराणा प्रताप दे प्रखर स्वातंत्र्यसेनानी कायम स्मरले जातील. राणा प्रताप यांच्या केवळ उल्लेखानेच हल्दीघाटाची ऐतिहासिक लढाई आठवते. उद्या, १३ जून अर्थात ज्येष्ठ शुक्ल तृतीया हा महाराणा प्रताप यांचा जन्मदिन आणि १८ जून हा हल्दीघाट लढाईचा विजय दिवस. हल्दीघाटाची लढाई आरवली पर्वतरांगा, घोड्यांचा खण खण आवाज, त्यांनी केलेले युद्ध यास राजस्थानी लोक संस्कृती, लोकगीत-साहित्यात अमर स्थान आहे. महाराणा प्रताप यांचे नाव उच्चारले तरी साडेसात फुटांची त्यांची बाहुबली आकृती नजरेसमोर येते. त्यांच्या जीवनकहाणीतील काही पृष्ठांत एकलिंग दैवताचे दृढ प्रतिज्ञेच्या रुपात येतात. जीवनात त्यांनी जो संकल्प केला तो पूर्ण करून दाखवला. अकबराचे सैन्य आणि महाराणा प्रतापांचे सैन्य यांची तुलना होणे शक्य नाही.

मी हल्दीघाटाच्या इतिहासाबाबत एवढेच सांगेन की, भारताच्या युद्धशृंखलांच्या इतिहासातील इतके महत्त्व क्वचितच एखाद्या लढाईस आले असेल. हल्दीघाटातील महाराणा प्रताप यांच्या युद्धाचा नीट अभ्यास होणे आवश्यक आहे. राणा प्रताप मुघलांकडून हरले नाहीत. काही पुस्तकांमध्ये इतिहासाबाबत अनेक चुकीच्या गोष्टी मिसळल्या जातात. सत्य सांगणे आवश्यक आहे हे ही वारंवार सांगावे लागते. इतिहासाची पुस्तके, इतिहासाचा अभ्यास यांच्याकडून महाराणा प्रताप यांच्यावर खूपच अन्याय झाला आहे. भारतातील व्यक्तींनी साहित्यात ज्या बाबी श्वाश्वत स्वरुपात मांडल्या त्यास इतिहासाचे पाठ्यपुस्तक लिहिणाऱ्या विद्वानांनी मात्र न्याय नाही दिला. भारताच्या प्रत्येक पिढीला राणा प्रतापांची जीवनकथा वाचण्याची संधी मिळाली पाहिजे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप समिती युवकांना अशा प्रकारच्या अभ्यास आणि संशोधनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल असे मला वाटते.

महाराणा प्रताप ५७व्या वर्षापर्यंत जगले. त्यांना जसा संघर्ष करावा लागला तेच सारे छ. शिवाजी महाराजांनाही लागू होते. राणा यांनी १२ वर्षे संघर्ष केला व पुढे ११ वर्षे शासन केले. समरवीरांच्या पराक्रमाच्या कहाणीतून लोक प्रेरणा घेतात. त्यांनी आदर्श शासनव्यवस्था उभी केली. लोकप्रिय नेते आणि प्रशासक होते. अनेक प्रकारचे आदर्श त्यांनी प्रस्थापित केले. ही सारी वैशिष्ट्ये सर्वांसमोर येणे आवश्यक आहे. युद्ध कौशल्याचा आदर्श, आदर्श पुरुष, प्रेरणा पुरुष या रुपात महाराणा प्रताप यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर मांडले पाहिजे, असेही होसबाळे म्हणाले.

**

Back to top button