EntertainmentNews

‘चित्र भारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०२२’ आयोजन समितीची घोषणा

माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि प्रसार विद्यापीठाच्या बिशनखेडी येथील नवीन कॅम्पसमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव  .

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

भोपाळ, दि. १५ सप्टेंबर : भारतीय चित्र साधनेचा प्रतिष्ठित ‘चित्रभारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव -२०२२’  (सीबीएफएफ-२०२२) भोपाळमध्ये १८ ते २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान आयोजित केला जाणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि भारतीय चित्र साधनेचे महासचिव अतुल गंगवार यांनी मंगळवार, दि. १४ सप्टेंबर रोजी हॉटेल पलाश येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजन समिती आणि स्थळाची घोषणा केली.  

माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि  प्रसार विद्यापीठाच्या बिशनखेडी येथील नवीन कॅम्पसमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष  दिलीप सूर्यवंशी आणि सचिव अमिताभ सोनी यावेळी उपस्थित होते.  

विवेक अग्निहोत्री म्हणाले की, या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील तळागाळाशी निगडित लोकांच्या कथा समाजापर्यंत सहजपणे पोहोचू शकतील. आपण आपल्या संस्कृतीला भारतीय सिनेमाशी जोडून ती  संस्कृतीच नष्ट केली आहे. आपल्या प्रत्येक सण-समारंभात चित्रपटांतील गाणी वाजवली जातात. कथा याच राष्ट्रीय संपत्ती असतात. त्यामुळे तळागाळातील लोकांशी संबंधित कथा सिनेमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

उदारमतवादी व्यवस्थेने समस्यांचे निर्मूलन करणारे नायक संपुष्टात आणले :
अग्निहोत्री म्हणाले की, ११९० नंतर उदारमतवादी व्यवस्थेसोबत सांस्कृतिक आक्रमणही झाले. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये भारतातील सामान्य माणूस समस्यांशी लढताना आणि जिंकताना दाखवण्यात यायचे. पण आता मात्र  परदेशात जाऊन केलेली  प्रेमप्रकरणे दाखवली जातात. सामान्य माणूस चित्रपटांमधून नाहीसा  झाला.

आज सिनेमात खोटे दाखवले जात आहे. कारण भारतीय चित्रपटात चित्रपट तयार करणारे लोक हे भारतीय संस्कृतीशी संबंधित नाहीत. याचबरोबर  मागील काही काळात परदेशी कंपन्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. हल्ली बहुतांश चित्रपटांचा कॉपीराइट हा  परदेशी कंपन्यांकडे आहे.   भारतातील सर्जनशील लोकांना त्यांच्या कथा सांगण्याची संधी मिळण्याकरिता भारतीय चित्र फ़िल्म फेस्टिवल्स सारख्या  कार्यक्रमांची गरज आहे.   ते म्हणाले की, या चित्रपट महोत्सवाची थीम अतिशय आकर्षक आहे. या प्रसंगी चित्रपट महोत्सवाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले.

आयोजन समितीचे अध्यक्ष  दिलीप सूर्यवंशी म्हणाले की, भोपाळमध्ये चित्रपटांसाठी भरपूर वाव आहे. भोपाळमध्ये फिल्म इन्स्टिट्यूट स्थापन करणे असो  किंवा यासंबंधी  कोणत्याही कार्याकरिता आम्ही सदैव  तयार आहोत.

भारतीय चित्र साधनाचे  राष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०२२ हे चौथे आयोजन असून याकरीता  स्थापन करण्यात आलेल्या आयोजन समितीमध्ये उपाध्यक्ष  संजीव अग्रवाल,   मयंक विश्नोई,  बीएस यादव,  अनुपम चौकसे,   लक्ष्मेन्द्र माहेश्वरी,   लाजपत आहूजा, सह-सचिव  आशीष भवालकर, कोषाध्यक्ष  दीपक शर्मा, सह-कोषाध्यक्ष  इंदर सहोता, सदस्य डॉ. विश्वास चौहान, डॉ. अजय नारंग आणि  दिनेश जैन सहित अन्य प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग आहे.   मध्यप्रदेश सरकारने  माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. केजी सुरेश यांना समितीचे नोडल अधिकारी  पदी विराजमान केले आहे. संस्कृती विभाग, विश्व संवाद केंद्र मध्य प्रदेश, सातपुरा चलचित्र समिती आणि राजीव गांधी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हे चित्रपट महोत्सवाचे सह-आयोजक आहेत. पत्रकार परिषदेस  भारतीय चित्र साधनेचे विश्वस्त अजित भाई शाह उपस्थित होते. गंगवार यांनी चित्रपट महोत्सवाची प्रस्तावना सादर केली तर  प्रा. केजी सुरेश यांनी कार्यक्रमस्थळ आणि त्या संबंधित तयारीची माहिती दिली.

उल्लेखनीय बाब अशी की सांस्कृतिक राजधानी म्हणून नामांकित असलेल्या भोपाळमध्ये आयोजित या तीन दिवसीय चित्रपट महोत्सवात देशभरातील नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत.  चित्रपट निर्मिती क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी  विविध श्रेणींमधील  पुरस्कृत चित्रपटांना १०  लाख रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. भारतीय चित्र साधना ही चित्रपट क्षेत्रातील भारतीय विचारांसाठी काम करणारी एक समर्पित संस्था आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर दर दोन वर्षांनी ‘चित्र भारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव’ आयोजित करते. याशिवाय वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम आणि स्थानिक स्तरावरील चित्रपट  समीक्षा, चित्रपट प्रदर्शन, चर्चा, प्रशिक्षण आणि लघुपट महोत्सव संस्थेद्वारे आयोजित केले जातात. दर दोन वर्षांनी होणारा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा  १८ ते २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीबीएफएफ सहा वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात परतत आहे. चित्रभारतीच्या या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ   मध्य प्रदेशच्या या भूमीपासूनच झाला आहे. राज्याचे बहु-सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या इंदूर येथे २०१६ मध्ये प्रथमच याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी राजपाल यादव, मनोज तिवारी, मधुर भांडारकर, केव्ही विजयेंद्र प्रसाद यांसारख्या सेलिब्रिटींनी आपले अनुभव यावेळी उपस्थितांसमोर व्यक्त केले होते.   त्यानंतर दुसरा चित्रभारती चित्रपट महोत्सव २०१८ – राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.  या चित्रपट महोत्सवात ७०० हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. तर, सीबीएफएफ – २०२०  चे आयोजन गुजरातच्या कर्णावती येथे करण्यात आले होते. यावेळी  सुभाष घई आणि अब्बास-मस्तान यांसारखे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांसह इतर दिग्गजही उपस्थित होते.  

लॉकडाऊन कालावधीत चित्रपट निर्मितीविषयीचे उपक्रम  सक्रिय ठेवण्याची आणि कोरोना हेल्थ प्रोटोकॉलवर जागरूकता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन , भारतीय चित्र साधनाने ऑनलाइन कोविड -१९  शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल देखील आयोजित केले होते. यासाठी २५० हुन अधिक प्रवेशअर्ज प्राप्त झाले होते.   या चित्रपटांच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

भारतीय चित्र साधना भारताच्या परंपरा आणि विविधतेचा आदर करून करते  आणि दृकश्राव्य क्षेत्रात याचे  जतन आणि प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.  सीबीएफएफचे  प्रत्येक संस्करण सामाजिक आणि राष्ट्रीय प्रासंगिकतेच्या विषयांवर प्रवेशअर्ज मागविण्यात येतात.  यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचे स्मरण करणारे आहे.  त्यामुळे ‘भारतीय स्वातंत्र्य संग्राम’ आणि ‘स्वतंत्र भारताची ७५ वर्षे’ या विषयांवरही  प्रवेशअर्ज मागवण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी १ सप्टेंबरपासून महोत्सवासाठी आपले चित्रपट पाठवण्यास सुरुवात केली आहे. या १० विषयांवर चित्रपट प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.  भारतीय स्वातंत्र्य संघर्ष, स्वतंत्र भारताची ७५ वर्षे, अनलॉकडाउन, वोकल फॉर लोकल, गाव सुखी-देश सुखी, भारतीय संस्कृती आणि मूल्य, नावीन्य-रचनात्मक कार्य, पर्यावरण आणि ऊर्जा, कुटुंब, शिक्षण आणि कौशल्य विकास हे विषय ठरविण्यात आले आहेत.   भारतीय चित्रपट निर्माते 1 सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले प्रवेश अर्ज पाठवू शकतात. अधिक माहिती चित्र भारती (http://chitrabharati.org) च्या  वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Back to top button