News

ग्लोबल हंगर इंडेक्स = ग्लोबल हास्यास्पद इंडेक्स

Good Joke:- ६० देशांना अन्न पुरवणारा भारत ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ मध्ये १०७ व्या क्रमांकावर

ज्या देशांना भारताने सर्वतोपरी मदत केली ते रँकिंग मध्ये भारताच्या वर कसे ?

{ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताची १०१ व्या क्रमांकावरून १०७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देशही भारताच्या पुढे आहेत. म्हणजेच या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली आहे.पाकिस्तानचे रँकिंग ९९, बांगलादेशचे रँकिंग ८४, नेपाळचे रँकिंग ८१ आणि श्रीलंकेचे रँकिंग ६४ आहे. फक्त सुदैवाने अफगाणिस्तान हा भारताच्या १०९ क्रमांकाने मागे आहे.एकूण १२१ देशांच्या या यादीत भारताची क्रमवारी सातत्याने घसरत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत ६ अंकाने घसरला आहे. भारताचा क्रमांक २०२१ मध्ये आणि २०१९ मध्ये ९४ वर होता. म्हणजेच दोन वर्षांत भारताची स्थिती खूपच वाईट झाली आहे.असे या इंडेक्सचे म्हणणे आहे.}

आता पर्यंत आपण ही बातमी वाचलीच असेल, माझ्यासारख तुमचं रक्त देखील खवळले असेल. कोरोना काळात १४० कोटी लोकसंख्या असलेल्या या आपल्या भारत देशात ६५ दिवस कडक लॉकडाउन लावून देखील एकही भूकबळी गेला नाही,केवढी मोठी उपलब्धी आहे ही हे या ४०-५० लक्ष लोकसंख्या असलेल्या देशांना हे कधीच कळणार नाही.अशी शंका येते की मुद्दाम भारताला बदनाम करण्यासाठी अश्या प्रकारचे रिपोर्ट तयार केले जातात, आणि भारताची प्रतिमा बिघडवण्याचा यथोचित प्रयत्न केला जातो.

१४० कोटींचा असलेला हा देश आणि त्यात फक्त ३००० लोकांच्या मतावरून हा अहवाल सादर करण्याची हिम्मतच कशी होते ? स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात अमेरिकेने आपल्याला जो लाल गहू ( milo ) पाठवला होता तो त्या देशात डुक्कर देखील खात नाही. म्हणजे आमची डुकराची देखील पात्रता नाही की काय ?

एकेकाळी गहू आयात करणारा ते आज जवळपास ६० देशांना गहू आपण निर्यात करणारा असा आपला प्रवास आहे.सगळ्यात मोठा धान्य उत्पादक देश म्हणून देखील आपण आता उदयास आलों आहोत . DBT माध्यमातून आपण ८० कोटी नागरिकाना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की,भारतावर अवलंबून असणाऱ्या देशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

आधी आपण ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे काय ते जाणून घेऊया…

ग्लोबल हंगर इंडेक्स आकडेवारीनुसार, कुपोषण, अर्भकांचे कुपोषण, खुंटलेली वाढ आणि बालमृत्यू या चार निर्देशकांच्या मूल्यांवर मोजला जातो. ही यादी दरवर्षी कन्सर्न वर्ल्डवाईड आणि वर्ल्ड हंगर हेल्प (जर्मनीमधील वेल्थंगरहिल्फ) नावाच्या युरोपियन एनजीओद्वारे तयार केली जाते. जगभरातील विविध देशांमधील 4 स्केलचा अंदाज घेऊन निर्देशांक तयार केला जातो.

ग्लोबल हंगर इंडेक्स स्कोअरची गणना कशी केली जाते?

प्रत्येक देशासाठी ग्लोबल हंगर इंडेक्स स्कोअर 3 आयामांच्या 4 स्केलवर मोजला जातो. हे तीन आयाम आहेत –

-कुपोषण: कुपोषण म्हणजे व्यक्तीला दिवसभरासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज मिळत नाहीत. एकूण लोकसंख्येतून पुरेशा कॅलरीज मिळाल्या नसलेल्या लोकांनी गणना केली जाते.

-बालमृत्यू: बालमृत्यू म्हणजे दर 1000 जन्मांमागे 5 वर्षांच्या आत मरण पावलेल्या मुलांची संख्या.

तिसरा आयाम म्हणजे बालकांचे कुपोषण, यामध्ये 2 श्रेणी आहेत.

-चाइल्ड वेस्टिंग: चाइल्ड वेस्टिंग म्हणजे मूल त्याच्या वयाच्या मानाने खूप कमकुवत असणे. 5 वर्षांखालील मुले ज्यांचे वजन त्यांच्या उंचीसाठी कमी आहे. यावरून असे दिसून येते की त्या मुलांना पुरेसे पोषण मिळाले नाही, त्यामुळे ते अशक्त झाले.

-चाइल्ड स्टंटिंग: चाइल्ड स्टंटिंग म्हणजे ज्या मुलांची उंची त्यांच्या वयानुसार कमी आहे. म्हणजेच वयानुसार मुलाची उंची वाढली नाही. उंचीचा थेट संबंध पोषणाशी असतो.

देशातील भुकेच्या स्थितीवरून ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ मध्ये देशांना 0 ते 100 असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये 0 गुण हे सर्वोत्तम समजले जातात, याचा अर्थ एकप्रकारे त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो.

यूरोपात काय सुरु आहे आज, आपण जाणतोच ! आधी कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे पूर्ण यूरोप उध्वस्थ झाला आहे.सामाजिक ,आर्थिक आणि वैचारिक पातळीवर देखील युरोपची अधोगतीच सुरु आहे. कोरोनामध्ये युरोपची दयनीय अवस्था आपण ‘याची देही डोळा’ पहिली आहे,त्यासाठी जबाबदार असलेल्या चीनला बोलायची तुमच्या बापाची हिम्मत आहे का ? या उलट चीन आणि युरोपचा व्यापार १४० बिलियन डॉलर ने वाढला आहे.याच पैशाच्या जोरावर चीन रशियाला येनकेन प्रकारे मदत करतोय..

हे झाले युरोपचे आता भारताकडे येऊया, भारत कोरोनातून सावरून प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे. नुकतेच आपण आपल्यावर ज्यांनी अनन्वित अत्याचार केले अश्या ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो आहोत. भारत आता वर्ल्ड फार्मसी म्हणून उदयास आला आहे. विज्ञान,डिफेन्स सेक्टर,स्टार्टअप्स,विदेश नीती, स्पेस रिसर्च या आणि अश्या प्रकारच्या अनेक क्षेत्रांमध्ये भारत घोडदौड करतोय.आता भारताला अश्या छोट्या मोठ्या NGO मुळे किंवा त्यांनी केलेल्या कागाळ्यांमुळे काहीच फरक पडत नाही. उलट हेच NGO आता उघडे पडत चालले आहे.

मलेशियाचे उदाहरण बहुदा आपण विसरला असाल की, मलेशियाने UN मध्ये POK पाकिस्तानचा अविभाज्य भाग असे म्हटले होते. त्या नंतर भारताने मलेशियाचे पाम ऑइल आयात करणे सोडून दिले आहे, त्यामुळे मलेशिया मध्ये मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

“जेव्हा जंगलातील हत्ती पळतो तेव्हा त्याच्या मार्गात येणाची हिम्मत वनराज देखील करत नाही “

तसे महद प्रयासाने भारत रुपी हत्ती आता आपली ताकद दाखवण्यास सिद्ध आहे,त्याच्या मार्गात येण्याची हिम्मत कोणीही करू नये अन्यथा त्याचा चेंदामेंदा निश्चित..

Back to top button