EntertainmentOpinionRSS

जागो तो एक बार हिन्दू जागो तो

RSS ची तालिबान्यांशी तुलना जावेद अख्तर यांना महागात पडणार?

NDTV च्या reality check या कार्यक्रमांतर्गत श्रीनिवास जैन यांनी घेतलेल्या मुलाखतीत, जावेद अख्तर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडताना, एक वादग्रस्त विधान आपल्या नेहमीच्या शैलीत केले होते. त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांची तुलना तालिबानशी केली होती. आणि लोकांनी यांच्यापासून सावध राहायला हवे , असे म्हंटले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशाप्रकारे बदनामीकारक , खोटी आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मुलुंडचे वकील संतोष दुबे यांनी, मुलुंड कोर्टामध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात बदनामी करणे यासाठी, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ व कलम ५००( दंडासह शिक्षा) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी या तक्रारीची दखल घेत कोर्टाने जावेद अख्तर यांना ६ फेब्रुवारी २०२३ रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

https://www.ndtv.com/video/news/reality-check/javed-akhtar-on-taliban-the-idea-of-taliban-can-t-appeal-to-any-indian-says-lyricist-javed-akhtar-600442

याआधी वकील संतोष दुबे यांनी, मागील वर्षी २२ सप्टेंबर २०२१ रोजी जावेद अख्तर यांना बिनशर्त माफी मागावी व सात दिवसाच्या आत आपले वादग्रस्त वक्तव्य परत घेण्यासाठी आवाहन केले होते. माफी न मागितल्यास व आपले वक्तव्य परत न घेतल्यास , मानहानीचा म्हणजेच बदनामीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे जावेद अख्तर यांनी माफी न मागितल्यामुळे वकील संतोष दुबे यांनी , मुलुंड कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. माफी मागा अन्यथा १०० कोटींचा बदनामीचा दावा करण्यात येईल , याची जावेद अख्तर यांना चेतावणी दिली होती.

भाजप तसेच हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मंडळींमध्ये जावेद अख्तर यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली होती. जावेद अख्तर यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली होती. शिवसेनेनेही सामन्याच्या माध्यमातून जावेद अख्तर यांची कान उघडणी केली होती.

एनडीटीव्ही आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये २०१९ च्या निवडणुकीच्या आधीपासूनच हिंदुत्ववाद्यांविरोधात , भाजप आणि संघ विरोधात नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करताना, आपण त्यांच्या अनेक मुलाखतीतून स्पष्टपणे पहात होते. परंतु या सर्व गोष्टींकडे संघ किंवा इतर हिंदुत्ववादी मंडळी दुर्लक्ष करत होती. त्यामुळे निर्ढावलेल्या जावेद अख्तर यांनी ३ सप्टेंबर २०२१च्या एनडीटीव्ही च्या श्रीनिवास जैन यांच्या रियॅलिटी चेक या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या मुलाखतीत संघाची तुलना तालिबान्यांशी करण्यापर्यंत आपली मजल नेली. जावेद अख्तर हे प्रथमच असा काही प्रकार करत आहेत , असं नाही. याआधीही त्यांनी अशा प्रकारे स्वतःला प्रोग्रेसिव्ह दाखवत असताना, हिंदुत्ववाद्यांविरोधातच कायम आगपाखड करताना आपण पाहिले आहे.

गोल गोल राष्ट्रवादाची भूमिका घेत , हिंदुत्ववाद्यांना फटकारुन काढणे किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे. किंबहुना आपण त्यांच्या चित्रपटातही जर पाहिलं तर त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातूनही मुस्लिमांना सॉफ्ट कॉर्नर दाखवत हिंदूंना क्रूर दाखवण्याचा प्रकार त्यांच्या लेखणीतून नेहमीच पाझरत असतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला अनेक चित्रपटातून पाहता येतील. अब्दुलचाचा , रहिमचाचा अशी कनवाळू पात्र मुस्लिमांची दाखवताना, हिंदू पुजारी, मुनिमजी, बनिया हा मात्र बलात्कारी दाखवून हिंदूंना खलनायक ठरविवण्याचे काम या बॉलिवूडमधील मंडळींनी नेहमीच केले आहे. हिंदू मुकाट्याने सर्व गोष्टी सहन करतो याचाच फायदा घेत, बॉलीवूड ने हिंदूंच्याच पैशाने हिंदूंना संपवण्याचा जवळजवळ विडा उचललेला आहे. परंतु आता हिंदू जागृत झालेला आहे आणि त्याची प्रचिती बॉलीवूडच्या सर्व खानावळींचे चित्रपट ज्या पद्धतीने आपटून दाखवत आहे, आपल्या सगळ्यांना समोर आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही आपल्यावर केलेला आरोपांचा प्रतिकार केला नाही किंवा प्रतिवाद केला नाही.आपलं काम मोठं करून आपल्या कामातूनच त्याला उत्तर द्यावे, ही नेहमी संघाची भूमिका राहिलेली आहे. परंतु आता ज्या पद्धतीने डाव्या , फुरोगामी , लिब्रांडू मंडळींकडून विशिष्ट मत हिंदूंबाबत वा संघाबाबत तयार करण्यात येते , त्याला उत्तर देणे हे हिंदुत्वप्रेमी बुध्दीजीवींनाही गरजेचे झाले आहे. आता हिंदुत्ववादी मंडळी त्याला सडेतोड उत्तर देऊ लागली आहेत .याचाच उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे , राजेश कुंटे यांनी कॉंग्रेसच्या युवराज राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात खेचले होते. त्याचप्रमाणे आता जावेद अख्तर यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मुलुंडचे वकील संतोष दुबे यांनी त्यांच्यावर, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ व कलम ५०० नुसार बदनामीची केस टाकत कोर्टात खेचले आहे

वकील संतोष दुबे यांच्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा लढा ते शेवटपर्यंत लढणार आहेत. त्यासाठी पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे. बौद्धिक पातळीवर, आर्थिक पातळीवर सर्व बाजूंनी सक्षम आहेत आणि त्यांनी सेशन कोर्ट , हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याची तयारी केलेली आहे .आणि एकूणच जावेद अख्तर सारख्या प्रवृत्तींना ठेचून काढणे गरजेचे आहे , त्यासाठी ही केस लढणं अत्यंत गरजेचे आहे . तो माझ्या आयुष्यासाठी एक ध्येयाचा विषय असेल ,असे त्यांनी म्हटले आहे.अखेर पर्यंत मी लढत देण्यासाठी पुर्ण तयारीनिशी सज्ज आहे. मला अभिमान वाटतो की , बॉलिवूडमधील हिंदू विरोधकांना चपराक बसवणारी ही पहिलीच केस आहे .

मागील काही काळापासून हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मंडळींमध्ये ज्या प्रकारची घुसळन सुरू आहे ,पूर्वी प्रतिवाद व प्रतिक्रिया न देणाऱे आता मात्र सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि तेही कायदेशीर पद्धतीने , कटीबद्ध झालेली आहेत. जो ज्या पद्धतीने हिंदुत्वावर प्रहार करतोय, त्याला त्याच्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व मंडळी आता सरसवलेली आहेत. शांत राहील्यामुळे “कुणीही यावे आणि टपली मारून जावे” हे आता होणे नाही . “आरे ला कारे होणारच ” त्यामुळे हिंदुत्वावरती आक्षेप घेताना ,खोटे आळ घेताना व हिंदुत्ववाद्यांची बदनामी करताना यापुढे पुरोगाम्यांना, डाव्यांना दहा वेळा विचार करावा लागेल ,असा धडा त्यातून मिळावा मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02vpBRPkux4jkjWUn7CDvM4Ndr5NEtWAiaJmfWsZA7mBHwocxZ7B73dCVtAmfFuNsUl&id=100002112252455&sfnsn=wiwspmo&mibextid=RUbZ1f

Back to top button