NewsRSSकोकण प्रान्त

मोहनराव हे समरसता जगलेले स्वयंसेवक…

mohan dhavalikar

मोहनराव हे समरसता जगलेले स्वयंसेवक – विठ्ठल कांबळे, रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह

मुंबई, दि.३१ ऑक्टोबर – संघाच्या कोणत्याही स्वयंसेवकाला समरसता शिकवावी लागत नाही. मोहनरावांमध्ये मुळातच या समरसतेचे गुण होते असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी केले. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक कै. मोहनराव ढवळीकर यांचे नुकतेच निधन झाले. सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सानपाडा येथील विवेकानंद संकुल येथे त्यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विठ्ठल कांबळे बोलत होते. यावेळी मंचावर रा.स्व.संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक आणि रा.स्व.संघाचे नवी मुंबई सहसंघचालक धर्मेंद्रजी श्रीमाल उपस्थित होते.

मोहन ढवळीकर यांची संघनिष्ठा व तत्त्वनिष्ठा याविषयी कांबळे म्हणाले की पुढे म्हणाले , कि मोहनराव आपल्या संयमावर ठाम राहणारं व्यक्तिमत्वं होतं. सांगितलेलं कार्य शेवटपर्यत चोखपणे करण्याची त्यांची मानसिकता कायम असायची. मोहनराव आपल्या आयुष्यात आदर्श स्वयंसेवकाचे जीवन जगले. मोहनराव समरसता जगलेले स्वयंसेवक होते.

या शोकसभेत डॉ. नरेंद्र पाठक यांनीही मोहनरावांच्या स्मृतीला उजाळा दिला. ते म्हणाले की, अखिल भारतीय साहित्य परिषदेत मोहनराव ढवळीकर यांचे मोठे योगदान होते. आपल्या कार्यकाळात त्यांच्या जबाबदाऱ्या बदलत गेल्या मात्र ते स्वतः कधी बदलले नाहीत. आपल्या वयाच्या ७०व्या वर्षीदेखील त्यांना साहित्य परिषदेचे काम करायची इच्छा होती. या श्रद्धांजली सभेस कै. मोहनराव ढवळीकर यांचा वैयक्तिक सहवास लाभलेले डॉ. नंदकुमार जोशी, डॉ. नरेंद्र उपाध्याय, सतिश निकम, सुभाष कुलकर्णी, विश्व संवाद केंद्राचे मिलिंद खोत, छत्रपती शिक्षण मंडळचे प्राचार्य फडके, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर इत्यादी उपस्थित होते. मोहनराव ढवळीकर यांच्या दोन्ही कन्या मीनल व मंजुषा यांनी ही श्रद्धांजली यावेळी श्रद्धांजली अर्पण केली..

Back to top button