News

महाराष्ट्राच्या दिंडीचे वारकरी.. पद्म पुरस्काराचे मानकरी.. भाग १२

padma-awards 2024 Maharashtra

महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..

पद्मश्री पुरस्कार..

डॉ. झहीर काझी (साहित्य आणि शिक्षण )

डॉ. झहीर काझी हे 2009 मध्ये अंजुमन इ इस्लाम संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून आले. डॉ. झहीर काझी यांनी वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये कार्य केले आहे. डॉ. काझी यांनी MD, DMRD, MBBS (मुंबई विद्यापीठ), FMRI (USA), MAIUM (USA) या पदव्या मिळवल्या आहेत. अंजुमन ई इस्लाममध्ये अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी अनेक विश्वस्त पदे भूषवली.

मूळचे गोमंतकीय आणि महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या डॉ. जहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. काझी हे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळालेले गोव्यातील मुस्लिम समाजातील पहिले विद्यार्थी आणि या समाजातील पहिलेच डॉक्टर आहेत.

मूळ फोंडा येथील असलेल्या डॉ. काझी यांनी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. गोव्यात एमबीबीएस करून ते मुंबईत स्थायिक झाले आणि तेथे त्यांनी सेवा देण्यास सुरुवात केली. डॉ. काझी यांचा भाऊ उद्योग विकास महामंडळात कार्यरत आहेत.

डॉ. काझी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या १५० वर्षे जुन्या अंजुमन ए इस्लाम या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. गोमेकॉमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. गोमेकॉने दिलेल्या मंचामुळेच आज आपण जगभर एक तज्ञ रेडिअलॉजिस्ट म्हणून फिरत असल्याचे डॉ. काझी अभिमानाने सांगतात. गोवा आणि कोंकणी भाषेचे मी देणे लागतो असेही ते म्हणतात.

अंजुमन ए इस्लाम या संस्थेच्या ९७ इन्स्टिट्यूटत आहेत. यातून सुमारे १ लाख गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय संस्थेतर्फे अनाथ आश्रमदेखील चालवली जातात. यामध्ये सुमारे ४०० मुले राहतात. संस्था लवकरच गोव्यात देखील तंत्र शिक्षण, कौशल्य विकास व अन्य व्यवसायिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था सुरू करणार आहे.

क्रमशः

Back to top button