NewsSpecial Dayकोकण प्रान्त

बंधुता परिषद मुंबई

युथ मेडिकोस फॉर इंडिया (YMI), मेडिविजन व सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आर्य समाज हॉल, बोरा बाजार, फोर्ट, मुंबई येथे बंधुता परिषद आयोजित करण्यात आली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती देखील साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला वैद्यकीय , दंतशास्त्र, आयुर्वेद या शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व श्री दिनकर अमृतलाल पांडे, श्री दीपकभाई खंडेलवाल, श्री अजय सिंह हे मान्यवर देखील उपस्थित होते.

२ जानेवारी बंधुता परिषद या विषयाचे महत्व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, तसेच विद्यार्थांची राष्ट्र निर्मिती भूमिका यांवर मोकळ्या वातावरणात चर्चा करणे हा या मेळाव्याचा देखील उद्देश होता.कार्यक्रमाची संकल्पना व सूत्रसंचालन डॉ. संगीता आंभोरे यांनी केले. त्यांच्या उद्घाटन भाषणामधे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कराड येथील संघ शाखेला दिलेल्या भेटीबाबत तसेच त्या घटनेचे आजच्या काळातील महत्त्व याविषयी थोडक्यात माहिती दिली. त्या म्हणाल्या की बाबासाहेबांच्या भेटीची ही घटना त्यांच्या दूरदृष्टीचा आणि राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा ठोस पुरावा आहे कारण कितीही मतभेद असले तरीही मनभेद असू नये असे त्यांना वाटे व सर्व समाज एकता, न्याय व बंधुतेने एकत्र राहावा हा उद्देश ह्या भेटीमागे होता.

श्री. नागेश धोंडगे यांनी डॉ आंबेडकर हे जानेवारी 1940 रोजी कराड येथे संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा वृत्तांत विद्यार्थ्यांसोर मांडला.” मी संघाकडे आत्मीयतेने पाहतो असे म्हणून संघ कामाला शुभेच्छा ही दिल्या.” बाबासाहेब म्हणत “मी प्रथमतः भारतीय व अंतिमताही भारतीय” हाच राष्ट्र प्रथमचा भाव मनात घेऊन संघ स्वयंसेवक अविरत काम करत असतात. संघ व बाबासाहेब या दोघांच्या विचारात राष्ट्र प्रथम आहे.

डॉ. स्मिता गालफाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सखोल विचार मांडले. श्री दीपकभाई खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.डॉ कैलास सोनमानकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन या विषयावर तसेच डॉ प्रदीप जोशी यांनी संघटित होऊन काम केल्यास कोणत्याही क्षेत्रातील समस्यांवर ठोस तोडगा काढता येतो असे प्रतिपादन केले.

डॉ संगीता अंभोरे व डॉ प्रदीप जोशी यांनी आगामी काळात घेरण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी उपक्रमांची माहिती दिली व कार्यक्रमाचा समारोप करत आभार प्रदर्शन केले.

Back to top button