ChristianityECONOMYHinduismOpinionWorld

भारताची लूट…

भारताशी(bharat) संबंध आल्यावर इंग्रजांच्या शब्दकोशात हिंदी व अन्य भारतीय भाषांचा समावेश होत गेला. आता तर ‘जुगाड’, ‘दादागिरी’, ‘सूर्यनमस्कार’, ‘अच्छा’, ‘चड्डी’ इत्यादि शब्द सुद्धा ऑक्स्फोर्ड इंग्लिश शब्दकोषात समाविष्ट झाले आहेत. पण या ऑक्स्फोर्ड इंग्रजी शब्दकोषात येणारा पहिला हिंदी शब्द कोणता होता?

तो शब्द होता ‘लूट’(loot)…!

विलियम डार्लिंपल (William Darlymple) ने ईस्ट इंडिया कंपनीवर एक सविस्तर पुस्तक लिहीले आहे. ‘The East India Company : The Original Corporate Riders’ या पुस्तकात ते लिहीतात –
‘One of the very first Indian words to enter the English language was the Hindustani slang for plunder: “loot”. According to the Oxford English Dictionary, this word was rarely heard outside the plains of north India until the late 18th century, when it suddenly became a common term across Britain.’
(इंग्रजी भाषेच्या शब्दकोषात सर्व प्रथम समाविष्ट होणारा स्थानीय भारतीय शब्द होता ‘लूट’. ऑक्सफोर्ड शब्दकोषानुसार 18 व्या शतकापर्यंत हा शब्द उत्तर भारतीय क्षेत्राच्या बाहेर कधीकधीच ऐकू येत असे. पण अचानकच हा शब्द ब्रिटनमध्ये (कधीतरीच) सहजतेने उपयोगात येऊ लागला.)

असे म्हणतात कि ईस्ट इंडिया कंपनीवर इंग्लंडच्या संसदेचे नियंत्रण होते. जर हे सत्य असेल तर ईस्ट इंडिया कंपनीने भारताला जे मनसोक्त लुटले त्यात इंग्लंडची संसद, अर्थात ब्रिटीश शासन सुद्धा सहभागी होते.

क्रिस व्होल्टे लिहीतात, ‘The East India Company would have a tradition of smuggling, piracy, trafficking, all kinds of fraud, privatizing government functions, private militaries and looting. All enabled by that first charter.’
(In his blog ‘Holte’s Thoughts’ on Sunday August 6, 2017)
(सदैव तस्करी, बौद्धिक चोरी, समुद्री दरोडे, सरकारी व्यवस्थांचे खाजगीकरण, खाजगी सेने सहित सर्व प्रकारच्या फसवणुकीत आणि धोकेबाजीत सामिल राहण्याची ईस्ट इंडिया कंपनीची परंपरा होती. या साऱ्या वाईट परंपरा त्यांच्या पहिल्या घोषणापत्राद्वारेच तयार केल्या होत्या.)
(6 ऑगस्ट 2017, रविवार, होल्ट द्वारा लिखित ब्लॉगनुसार)

क्रिस व्होल्ट पुढे लिहीतो, ‘The reality of East India Company, was that it was basically an organization of pirates, privateers in that everything they did was ‘legal’, at least from the point of view of the British Crown.’
(वास्तविक ईस्ट इंडिया कंपनी (east india company )मुळात समुद्री दरोडेखोरांचे आणि लुटारुंचे एक मोठे संघटन होते. परंतू ब्रिटीश राजपरिवाराच्या दृष्टीने ही कंपनी जे करत होती ते सर्व कायदेशीर होते.)

इंग्रज किती लुटारु होते ते त्यांनी बंगालवर कब्जा करताच क्षणी दाखवून दिले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबाचा पराभव केल्यानंतर इंग्रजांनी सुसंस्कृतपणा तर सोडाच, साधा विवेक ही दाखवला नाही. त्यांनी लुटाऱ्यां सारखे, बंगालच्या पूर्ण खजिन्याला १०० जहाजात भरून नवाब महालातून कलकत्याच्या त्यांच्या मुख्यालयात, ‘फोर्ट विलियम’ मध्ये, पोहोचविले.

त्याकाळी बंगाल (bangal) हा अत्यंत संपन्न प्रांत होता. बंगालचा खजिना अत्यंत समृद्ध होता. अश्या संपन्न खजिन्याचे ब्रिटीशांनी काय केले? त्यातील अधिकांश हिस्सा इंग्लंडमध्ये पाठवण्यात आला. आणि त्याच पैशातून वेल्स प्रांतातील पोविसच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला गेला. त्या किल्ल्याची मालकी नंतर रॉबर्ट क्लाईव्हच्या कुटुंबाकडे आली.

बंगालच्या या लुटीनंतर सत्तेत असल्यामुळे इंग्रज बंगालला लुटतच राहिले. परंतू काही वर्षांनी जेव्हा बंगालमध्ये महाभयानक असा दुष्काळ पडला, तेंव्हा या इंग्रज शासकांनी काय केले?.. काहीच नाही…!

१७६९ ते १७७१ ही तीन वर्षे अतिशय भयंकर दुष्काळाची होती. मात्र लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या इंग्रजांनी काय केले? त्यांनी एवढी प्रचंड लूट केली होती, त्या लुटीतील छोटासा तरी हिस्सा या दुष्काळग्रस्तांना दिला का? तर उत्तर नकारार्थी आहे.

या महाभयंकर दुष्काळात जवळपास एक कोटी जनतेचा जीव गेला. अर्थात एक तृतीयांश लोकसंख्या मारली गेली. परंतू कंपनी बंगालचा सर्व महसूल इंग्लंडमध्ये ( england) पाठवत राहिली. इकडे बंगालमध्ये जनता आपला जीव गमवत राहिली. क्रिस व्होल्टे लिहीतात, ‘The East India Company was devoted to organized theft. Bengal’s wealth rapidly drained into Britain.’
(ईस्ट इंडिया कंपनी संघटित रुपाने दरोडे घालत होती, लुटत होती. त्या काळात, तत्कालीन बंगाल प्रांतातील अधिकांश संपत्ती ब्रिटनने हडपली होती.)

बंगालमध्ये दुष्काळामुळे झालेले मृत्यु हे नैसर्गिक संकट नव्हते तर तो एक प्रकारचा नरसंहार होता !
(शनिवार दिनांक १७ जून ला प्रकाशित होणाऱ्या विनाशपर्व या पुस्तकातील अंश)

लेखक – प्रशांत पोळ

Back to top button