News

देवभूमीतच देवाचा अपमान

God’s Own Country तच भगवंताच्या उत्सवावर आगपाखड का ?

कालच लोकसत्ताचे एक ट्विट वाचनात आले, “धावपट्टीवरून ‘देवा’ची मिरवणूक काढण्यासाठी केरळातील विमानतळावर पाच तास उड्डाणे स्थगित” काय म्हणावे या विकृत मानसिकतेला.आमचे देव,धर्म,संस्कृती,परंपरा यांनी लोकसत्ताचे काय घोडे मारले आहे हे अनाकलनीय आहे.फक्त लोकसत्ताच नाहीतर इतर अनेक हिंदू विरोधी समाज माध्यमांनी अश्याच प्रकारे ट्विट्स केले आहेत.

पद्मनाभस्वामी:-भक्ती आणि शक्तीचा अतूट संगम,

पद्मनाभस्वामी मंदिर (padmnabhswami temple) सौंदर्याने आणि अध्यात्मिक अनुभूतीने परिपूर्ण असं हे मंदिर म्हणजे एक मोठं रहस्यच आहे..! हे मंदिर विष्णू देवाला समर्पित असून मंदिराच्या गर्भागृहात शेषनागवार शयन मुद्रेत भगवान विष्णुंची महाकाय मूर्ती विराजमान आहे.९ व्या शतकातील ग्रंथांमध्ये या मंदिराचा स्पष्ट उल्लेख आढळतो. १८ व्या शतकात त्रावणकोर राजा ने पद्मनाभ मंदिराचा जीर्णोद्धार केला.१७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत:ला ‘पद्मनाभ दास’ म्हणजेच ‘प्रभूचा सेवक’ अशी उपाधी दिली. त्यानंतर त्रावणकोर घराण्याने स्वत:ला भगवान पद्मनाभाच्या चरणी अर्पण केलं आणि सर्व संपत्ती मंदिराला दान केली.आणि यापुढे पद्मनाभ दास म्हणूनच राज्य कारभार केला.

शाही कुटुंब मंदिराच्या संपत्तीचे राखणदार म्हणून आजही कार्यरत आहे.देवदर्शनासाठी आले तर शाही कुटुंबातील सदस्य मंदिराबाहेर पडताना पायाला लागलेली वाळू सुद्धा मंदिराच्या परिसरातच झाडून टाकतात,स्वतःसोबत मंदिरातून काहीही नेत नाही.

अल्पसि अरटटू महोत्सव म्हणजे काय ?

अल्पसि अरटटू महोत्सव म्हणजे “भगवंताचे शाही स्नान” वर्षातून दोनदा हा उत्सव साजरा केला जातो.मंदिर ते समुद्रापर्यंत शोभायात्रा निघते,अनादी काळापासून हा उत्सव सुरु आहे.

१९३२ साली तत्कालीन त्रावणकोर राजाने एअरपोर्ट बनवण्यासाठी शोभायात्रा ज्या रस्त्यावरून जाते ती जमीन सरकारला दान केली.आणि एक अट अशी घातली की वर्षातून दोनदा भगवंताची शोभायात्रा या मार्गावरून जाऊ देण्यात यावी. तेव्हा पासून ज्या वेळी शोभायात्रा या मार्गावरून जाते तेव्हा एअरपोर्ट बंद ठेवण्यात येते.

इतकी संपन्न परंपरा आपल्याला लाभलेली असताना वर्षातून दोनदा काहीं काळासाठी एअरपोर्ट बंद ठेवायला लागला तर बिघडलं कुठे ? कोरोना काळात तर तब्बल वर्षभर एअरपोर्ट बंदच होते.मुळात जागा दान म्हणून मिळाली आहे आणि दानात मिळालेल्या गायींचे दात मोजू नये ही उक्ती महाज्ञानी कुबेरांना ठाऊक नसणे महाआश्यर्य आहे .

लोकसत्ताला फक्त आणि फक्त हिंदू सणांना,समारंभाला,उत्सवाला टार्गेट करायचे आहे.मुद्दाम दिवाळीत फटाके फोडू नका (श्वसनाला त्रास होतो ),मकर संक्रांतीला पतंग उडवू नका (पक्षांना त्रास होतो ),होळीला रंग लावू नका(पाण्याची बचत करा ),दसऱ्याला आपट्याची पाने वाटू नका (पर्यावरणाचे नुकसान होते ) .. आदी.

फक्त हिंदू सणांवर,परंपरेवर तुमचा आक्षेप का ?

तुमची हिंमत आहे का हाच नियम मुसलमानांनां लावण्याची ? रस्त्यावर नमाज पठाण करतात, आमचे आराध्य असलेल्या गोमातेची निर्घृणपणे कुर्बानी देतात ,बकरी ईदला सार्वजनिक ठिकाणी किती बोकड कापले जातात याची तर गणतीच नाही. यावर काही लिहण्याची हिम्मत आहे तुमच्यात ? नसेल तर तुम्ही नामर्द आहात हे मान्य करा…

Back to top button